Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: रवींद्र जाडेजा आयसीसी कसोटी अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत पहिल्या क्रमांकावर राहणारा पहिला खेळाडू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

रवींद्र जाडेजा आयसीसी कसोटी अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत पहिल्या क्रमांकावर राहणारा पहिला खेळाडू

admin
Last updated: 2025/05/14 at 5:52 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

मुंबई, 14 मे (हिं.स.)।रवींद्र जाडेजाने एका विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. आयसीसीने कसोटी अष्टपैलू खेळाडूंची नवीन क्रमवारी नुकतीच जाहीर केली आहे,ज्यामध्ये रवींद्र जडेजा ४०० रेटिंग गुणांसह अव्वल स्थानावर आहे. जाडेजाने रचलेला विश्वविक्रम म्हणजे तो आयसीसी कसोटी अष्टपैलू खेळाडूंच्या श्रेणीत सर्वाधिक दिवसांपर्यंत पहिल्या क्रमांकावर राहणारा पहिलं खेळाडू ठरला आहे

रवींद्र जडेजाने ९ मार्च २०२२ रोजी वेस्ट इंडिजच्या जेसन होल्डरला मागे टाकून जगातील नंबर वन टेस्ट अष्टपैलू खेळाडू बनला होता. तेव्हापासून ३८ महिने होऊन गेले तरीही रवींद्र जडेजा ११५२ दिवसांपासून सतत पहिल्या क्रमांकावर राहिला आहे. २०२२ मध्ये जेव्हा रवींद्र जडेजा जगातील नंबर वन टेस्ट अष्टपैलू खेळाडू बनला होता, तेव्हा त्याला ही कामगिरी करण्याची दुसरी संधी मिळाली होती. कारण त्याआधी, तो ऑगस्ट २०१७ मध्ये एका आठवड्यासाठी नंबर वन या जागेवर आला होता.

ताज्या कसोटी अष्टपैलू क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखण्यासाठी रवींद्र जडेजाची थेट स्पर्धा बांगलादेशच्या मेहदी हसन मिराजसोबत होती, त्याचे ३२७ रेटिंग गुण आहेत. नवीन क्रमवारीत, मेहदी हसनने मार्को जॅन्सनला मागे टाकून क्रमांक 2 चे स्थान मिळवले होते. मार्को जॅन्सनने एक स्थान गमावले आहे आणि तो आता तिसऱ्या क्रमांकावर आला आहे, त्याच्या नावे २९४ रेटिंग गुण आहेत.

तसेच पॅट कमिन्स हा चौथ्या क्रमांकाचा अष्टपैलू खेळाडू ठरला आहे. तर बांगलादेशचा शाकिब अल हसन पाचव्या स्थानावर विराजमान आहे. जडेजा वगळता टॉप १० मध्ये दुसरा कोणताही अष्टपैलू खेळाडूचा समावेश नाही. त्याच्यानंतर, अक्षर पटेल कसोटी अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत १२ व्या क्रमांकावर आहे.

You Might Also Like

केदारनाथ मार्गांवर जंगलछट्टीजवळ दरड कोसळल्याने दोघांचा मृत्‍यू, तीन जखमी

हैदराबाद : विमानतळावर बॉम्ब स्फोटाची धमकी

काश्मीर मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी स्वीकारली जाणार नाही – पंतप्रधान मोदी

अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, इराणकडून इस्राइल विरोधात युद्धाची घोषणा

कोणताही देश दहशतवादाला पाठिंबा देत असेल तर त्याला त्याची किंमत मोजावी लागेल – पंतप्रधान मोदी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article महाराष्ट्रातील खाद्य संस्कृती जगभरात पोहोचण्याची गरज : विष्णू मनोहर
Next Article म्यानमार सीमेवरील चकमकीत 10 अतिरेकी ठार

Latest News

संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ
महाराष्ट्र June 18, 2025
केदारनाथ मार्गांवर जंगलछट्टीजवळ दरड कोसळल्याने दोघांचा मृत्‍यू, तीन जखमी
देश - विदेश June 18, 2025
आंध्रप्रदेश : गजरला रवीसह 3 जहाल नक्षलवादी ठार
महाराष्ट्र June 18, 2025
अकोला : अल्पवयीन मुलीवर अत्याचार
महाराष्ट्र June 18, 2025
नाशिकरोड-द्वारका उड्डाणपुलाचा मार्ग होणार मोकळा, खासदार वाजेंच्या मागणीला यश
Top News June 18, 2025
हैदराबाद : विमानतळावर बॉम्ब स्फोटाची धमकी
देश - विदेश June 18, 2025
निराधार बालकांना मिळणार आधार; बेवारस मुलांना मिळणार सन्मानाची ओळख
महाराष्ट्र June 18, 2025
भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेच्या शिष्यवृत्तीने दिलं स्वप्नांना बळ
महाराष्ट्र June 18, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?