मुंबई, 06 जून (हिं.स.) : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) चलनविषयक धोरण समितीने (एमपीसीने) धोरण आढाव्यात रेपो दर 50 बेसिस पॉइंट्सने कमी करून 5.5 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज, शुक्रवारी याबाबत दिली. एमपीसीने लिक्विडिटी ॲडजस्टमेंट सुविधेअंतर्गत पॉलिसी रेपो रेट हे तात्काळ लागू होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, एकीकडे, दर कपातीमुळे सामान्य लोकांवरील गृहकर्जाचा भार कमी होईल तर दुसरीकडे, त्यांच्या मुदत ठेवींवरील (एफडी) व्याज देखील कमी होईल.
आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा म्हणाले की, एमपीसीने लिक्विडिटी ॲडजस्टमेंट सुविधेअंतर्गत पॉलिसी रेपो रेट 50 बेसिस पॉइंट्सने कमी करून 5.5 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. हे तात्काळ लागू होईल. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा पदभार स्वीकारल्यानंतर तिसऱ्यांदा रेपो रेट जाहीर केले. यापूर्वी त्यांनी दोन वेळा 25-25 बेसिस पॉइंट्सनी 50 बेसिस पॉइंट्सनी कमी केला आहे. एकीकडे, दर कपातीमुळे सामान्य लोकांवरील गृहकर्जाचा भार कमी होईल तर दुसरीकडे, त्यांच्या मुदत ठेवींवरील (एफडी) व्याज देखील कमी होईल.
रेपो दरात 50 बेसिस पॉइंट्स कपात झाल्याने येत्या काही दिवसांत गृह, वैयक्तिक, वाहन आणि ठेवींवरील व्याजदर कमी होणार आहेत. परिणामी, स्थायी ठेव सुविधा (एसटीएफ) दर 5.25 टक्क्यांवर समायोजित केला जाईल. मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी (एमएसएफ) दर आणि बँक दर 5.25 टक्क्यांवर समायोजित केले जातील. यावेळी गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी भारताच्या जीडीपीबाबतही अंदाज वर्तवला. चालू आर्थिक वर्षात सकल राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा वेग 6.5 टक्के राहू शकतो असे म्हलोत्रा म्हणाले. तिमाहीनुसार ही टक्केवारी एप्रिल ते जूनदरम्यान 2.9 टक्के, जुलै ते सप्टेंबरदरम्यान 3.4 टक्के, ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान 3.9 टक्के तर पुढील वर्षी जानेवारी ते मार्च या चौथ्या तिमाहीत हा दर 4.4 टक्के इतका राहू शकतो असे त्यांनी सांगितले. ——————-