Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: लखनौला हरवून आरसीबी क्वालिफायर १ मध्ये दाखल
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
खेळ

लखनौला हरवून आरसीबी क्वालिफायर १ मध्ये दाखल

admin
Last updated: 2025/05/28 at 4:08 PM
admin
Share
3 Min Read
SHARE

लखनऊ, 28 मे (हिं.स.)।रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मंगळावारी(दि. २७) इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकावर हक्क सांगताना क्वालिफायर १ सामन्याचं तिकीट पक्कं केलं. बंगळुरूने लखनौ सुपर जायंट्स संघाला ६ विकेट्सने पराभूत केले.या विजयासह आता बंगळुरूचे १४ सामन्यानंतर ९ विजयांसह १९ गुण झाले असून पंजाब किंग्स पाठोपाठ ते दुसर्‍या क्रमांकावर आहेत.

या सामन्यात लखनौने बंगळुरूसमोर विजयासाठी २२८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग बंगळुरूने १८.४ षटकात ४ विकेट्स गमावत २३० धावा करून पूर्ण केला. अमरावतीचा जितेश शर्मा बंगळुरूसाठी हिरो ठरला.त्याने कर्णधारपदाला शोभेल अशी दणदणीत अर्धशतकी खेळी केली. विराट कोहलीनेही अर्धशतक करत योगदान दिले. या विजयानंतर आता २९ मे रोजी बंगळुरूला पंजाब किंग्सविरुद्ध मुल्लनपूर येथे क्वालिफायर १ सामना खेळायचा आहे. दरम्यान, बंगळुरूने यशस्वी पाठलाग केलेले हे सर्वोच्च लक्ष्यही ठरले. याशिवाय आयपीएलमधील यशस्वी पाठलाग झालेले हे तिसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च लक्ष्य ठरले. त्यांनी राजस्थान रॉयल्सने पाठलाग केलेल्या २२४ धावांच्या लक्ष्याला मागे टाकले.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून फिल सॉल्ट आणि विराट कोहली यांनी सलामीला फलंदाजी करताना चांगली सुरुवात केली.पण ६ व्या षटकात फिल सॉल्टला आकाश महाराज सिंगने दिग्वेश राठीच्या हातून ३० धावांवर झेलबाद केले. त्यानंतर ७ व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर विल्यम ओरुर्कीने रजत पाटीदारला ७ चेंडूत १४ धावांवर बाद केले. विराटने २७ चेंडूत त्याचे यंदाच्या हंगामातील ८ वे अर्धशतक पूर्ण केले. विराटला अर्धशतकानंतर १२ व्या षटकात आवेश खानने बाद केले. लाँग ऑफला आयुष बडोनीने त्याचा झेल घेतला. त्याने ३० चेंडूत १० चौकारांसह ५४ धावांची खेळी केली.तो बाद झाल्यानंतर कर्णधार जितेश शर्माने फटकेबाजीला सुरुवात केली.जितेश आणि मयंक यांच्यात नाबाद १०७ धावांची भागीदारी झाली. जितेश ३३ चेंडूत ८ चौकार आणि ६ षटकारांसह ८५ धावांवर नाबाद राहिला. मयंक अगरवालने २३ चेंडूत ५ चौकारांसह नाबाद ४१ धावा केल्या.

लखनौकडून विल्यम ओरुर्कीने २ विकेट्स घेतल्या, पण त्याने तब्बल ७४ धावा खर्च केल्या. अन्य दोन विकेट्स आकाश महाराज सिंग आणि आवेश खान यांनी घेतल्या.तत्पुर्वी, बंगळुरूचा कर्णधार जितेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे प्रथम फलंदाजी करताना लखनौने २० षटकात ३ बाद २२७ धावा उभारल्या होत्या. लखनौकडून रिषभ पंतने ६१ चेंडूत ११८ धावांची शतकी खेळी केली. तसेच मिचेल मार्शने ३७ चेंडूत ६७ धावा केल्या. मॅथ्यू ब्रिट्झकेने १४ आणि निकोलस पूरनने १३ धावा केल्या.बंगळुरूकडून गोलंदाजी करताना नुवान तुषारा, भुवनेश्वर कुमार आणि रोमारियो शेफर्डने प्रत्येकी १ विकेट घेतली.

You Might Also Like

दिग्वेश राठीच्या फिरकीची कमाल, ५ चेंडूत ५ फलंदाजांना केले बाद

बंगळुरूसारखी चेंगराचेंगरी टाळण्यासाठी बीसीसीआयकडून त्रिसदस्यीय समिती

आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताला मिळाले सुवर्णपदक

आयपीएल गाजवल्यानंतर वैभव सूर्यवंशीचे बिहारमध्ये जंगी स्वागत

मुंबई इंडियन्स संघाने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करत केली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article शाळाबाह्य सर्वेक्षणास मुहूर्त मिळेना
Next Article वसतिगृहातील समस्या : प्रहारची इमाबक विभागात धडक

Latest News

विद्यार्थिनींकडून कोणतेही शुल्क घेऊ नका – चंद्रकांत पाटील
महाराष्ट्र June 22, 2025
सोलापूरचे महापालिका उपायुक्त लोकरेंना आ. देशमुख यांनी झापले
सोलापूर June 22, 2025
वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात
महाराष्ट्र June 22, 2025
संजय राऊतांनाही गुवाहटीला यायचे होते; शहाजीबापूंचा मोठा गौप्यस्फोट
सोलापूर June 22, 2025
सोलापूर – करमाळ्यात कुंटणखाण्यावर छापा
सोलापूर June 22, 2025
सोलापूर – जिल्ह्यात अवकाळीने 64 कोटींच्या पिकांचे नुकसान
सोलापूर June 22, 2025
“ट्रम्पची नोबेलसाठी शिफारस यासाठीच केली होती का…?”
देश - विदेश June 22, 2025
कर्नाटक : सोशल मीडियावरील खोट्या बातम्यांना कायद्याने आळा घालणार
देश - विदेश June 22, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?