Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: धनुष्यबाणावर प्रतिक्रिया न देण्याच्या राज ठाकरेंच्या सुचना, वेळ आल्यावर…
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

धनुष्यबाणावर प्रतिक्रिया न देण्याच्या राज ठाकरेंच्या सुचना, वेळ आल्यावर…

Surajya Digital
Last updated: 2022/10/09 at 10:23 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ ‘वडिलांनी आयुष्यभर जे कमवले ते मुलाने एका मिनिटात गमावले’

मुंबई : शिवसेनेच्या धनुष्यबाण विषयावर कोणतीही प्रतिक्रिया न देण्याच्या सुचना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना दिल्या असल्याची माहिती समोर आली आहे. आपल्या पक्षातील कोणत्याही नेत्याने अथवा प्रवक्त्यांनी याविषयावर बोलणे टाळावे असे राज ठाकरेंकडून सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे राज ठाकरे यांनी खुद्द मुख्य प्रवक्त्यांना फोन करून याबाबत सूचना केल्या आहेत. Raj Thackeray’s suggestion not to react on Dhanushyabana, when the time comes…politics

 

निवडणूक आयोगाने काल शनिवारी शिवसेना पक्षाचे चिन्ह गोठवले. तसेच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे दोन्ही गटाला शिवसेना हे नाव थेट वापरण्यासही मनाई केली. यावरुन मागील 24 तासांपासून राजकीय रणकंद सुरु आहे. त्यात उद्धव ठाकरे यांनी आज फेसबूक लाईव्हद्वारे संवाद साधत त्यांची रोखठोक भूमिका मांडली.

परंतु मागील 24 तासात राज ठाकरे यांनी काहीही वक्तव्य केले नव्हते. तसेच मनसेची कोणतीही भूमिका समोर आली नव्हती. मात्र, आता राज ठाकरे यांनी एक ट्वीट करत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

“सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर माझ्या कोणत्याही महाराष्ट्र सैनिकांनी, कुठल्याही माध्यमांवर अथवा सोशल मीडियावर बोलू किंवा लिहू नये. मी योग्य वेळेस पक्षाची ह्या सगळ्यावर भूमिका मांडेन.” असे ट्विट राज ठाकरे यांनी केले आहे. याचाच अर्थ राज ठाकरे हे सर्व पाहत असूनही वेट अँड वॉचची भूमिका घेणे पसंत करत असल्याचे दिसत आहे. मात्र, लवकरच ते यावर उघड भूमिका घेतील हेही दिसत आहे.

 

सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर माझ्या कोणत्याही महाराष्ट्र सैनिकांनी, कुठल्याही माध्यमांवर अथवा सोशल मीडियावर बोलू किंवा लिहू नये.

मी योग्य वेळेस पक्षाची ह्या सगळ्यावर भूमिका मांडेन.

— Raj Thackeray (@RajThackeray) October 9, 2022

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

मी योग्य वेळेस पक्षाची ह्या सगळ्यावर भूमिका मांडेन, असं राज ठाकरे यांनी लिहलं आहे. यापूर्वीही राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना असा संदेश दिला आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणावर राज कधी आणि काय भूमिका घेतात? याकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागलं आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगाकडे सर्वात मोठी मागणी केलीय. शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तीन पर्यायांपैकी एक नाव आम्हाला द्या, अशी मागणी उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे केली आहे. तसेच उगवता सूर्य, मशाल, त्रिशूळ या तीन चिन्हांपैकी एक चिन्ह आम्हाला लवकर द्या. आम्हाला जनतेसमोर जायचे आहे, असेही उद्धव ठाकरेंनी फेसबुकवरुन म्हटले आहे.

या संवादाच्या शेवटी उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना पुढचा धोका सांगितला. आज कोजागिरी पौर्णिमा आहे, दिवस आणि रात्र वैऱ्याची आहे. तुम्ही जागे राहा, अजिबात झोपू नका. शांत डोक्याने आत्मविश्वासाने ही लढाई जिंकायची आहे, त्यानंतर आपल्याला आव्हान देणारं कुणीच नसेल, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मात्र शिंदे गटाकडून अजून कोणतिही अधिकृत भूमिका जाहीर केली नाही. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आज उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी चिन्ह आणि नाव देखील जाहीर केली. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका घेण्यात आली नाही.

 

□ ‘वडिलांनी आयुष्यभर जे कमवले ते मुलाने एका मिनिटात गमावले’

 

शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह गोठविण्यात आले आणि दोन्ही गटांना शिवसेना हे पक्षाचे नावही वापरता येणार नाही, असा आदेश निवडणूक आयोगाने दिला. यानंतर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली. वडिलांनी आयुष्यभर जे कमवले ते मुलाने एका मिनिटात गमावले. आयुष्यभर सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी जी मेहनत केली, ते चिन्ह गेले, असेही ते म्हणाले.

You Might Also Like

शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री

महाराष्ट्रातील भाजपा कार्यकर्त्यांना लाभणार रवी नामक ‘दादा’ !

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दोन वारकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू

अपूर्व हिरे बुधवारी भाजपामध्ये करणार प्रवेश

TAGGED: #RajThackeray's #suggestion #nottoreact #Dhanushyaban #timecomes... #politics, #शिवसेना #धनुष्यबाण #प्रतिक्रिया #राजठाकरे #सुचना #वेळआल्यावर...
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर । झाडाची फांदी तोडताना विजेचा शॉक बसून एकाचा मृत्यू
Next Article माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदेंचा मोबाईल चोरण्याचा प्रयत्न

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?