Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापुरातील हॉटेल पॅराडाईज डान्सबारवर छापा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

सोलापुरातील हॉटेल पॅराडाईज डान्सबारवर छापा

Surajya Digital
Last updated: 2021/06/11 at 9:40 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

सोलापूर : गुन्हे शाखा, सोलापूर शहर गुन्हे शाखेेने रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास हॉटेल पॅराडाईज डान्सबारवर छापा टाकून अश्लिल व विभत्स नृत्य करणाऱ्या  ८ नृत्यांगना, व त्यांच्यावर पैसे उधळणाऱ्या २९ इसमांना ताब्यात घेतले.

आषाढी वारीसाठी 10 महत्त्वाच्या पालख्यांना परवानगी, 20 बसमधून येणार मानाच्या 10 पालख्या https://t.co/Juy9rLG9ke

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 11, 2021

या छाप्यातील कारवाईमध्ये सुमारे ४८लाख,९८ हजार,३३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. शहर अॉनलॉक होताच धनदांडगे आणि गब्बर गंड पैसे उधळण्यासाठी कसा मार्ग काढतात यावर शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय साळुंखे व त्यांच्या पथकाने कारवाई केली.

सध्या कोविड-१९ संसर्गजन्य रोगाचे अनुषंगाने जमावबंदीचे आदेश असताना सुद्धा शिवाजी नगर बाळे येथील हॉटेल पॅराडाईजचे मालक बाबा जाफर पठाण हा त्याचे हस्तक संजय पोळ व मॅनेजर मुकेशसिंग बायस यांचेकरवी हॉटेल पॅराडाईज ऑर्केस्ट्राबार चालवित होता.

अलर्ट! महाराष्ट्रासाठी पुढचे 3 दिवस धोक्याचे https://t.co/0nZ01DthND

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 11, 2021

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

शेतकऱ्यांनी कृषी योजनांचा लाभ घ्यावा, पालकमंत्री भरणे यांचे आवाहन https://t.co/NSHLFwSqCp

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 11, 2021

सदर डान्सबारमध्ये महिला अर्धनग्न अवस्थेत डान्स करुन अश्लिल हावभाव करुन डान्स करीत व काही इसम त्यांचे अंगावर चलनी सदृश्य नोटा उधळून त्यांचे अंगाला स्पर्श करीत आहेत. अशी खात्रीलायक मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन ही छाप्याची कारवाई केली.ऑर्केस्ट्राबारमध्ये आलेल्या ग्राहकांना विनापरवाना मदय पुरविल्याचे कारवाईत निष्पन्न झाले.

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे पोलीस उपायुक्त बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा संजय साळुंखे, पोलीस निरीक्षक  संजय क्षिरसागर, निखिल पवार ,संदीप शिंदे, शैलेश खेडकर ,  फौजदार सुहास आखाड यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल महिला पोलीस कॉन्स्टेबल पोलीस होमगार्ड या पथकाने ही कामगिरी पार पडली.

आदेश ! कोरोना लस न घेतल्यास सिम कार्ड बंद होणार https://t.co/4lOipb8Bjv

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 11, 2021

* यांच्यावर गुन्हा दाखल

पोलीसांनी येथून  संजय  पोळ (वय-४१ वर्षे, सैफुल, सोलापूर) मुकेशसिंग  बायस (वय-४७ वर्षे, , वसंतविहार सोलापूर),  अजिंक्य अशोक देशमुख (वय-३०, रा, रमण नगर, अक्कलकोट रोड), मयुर लक्ष्मण पवार (वय-३५, .देवणी, जि.लातूर), विजय शिवशंकर तिवारी (वय-४७, रा-, कलबुर्गी, कर्नाटक),  विशाल राजेंद्र कोळी (वय-२६, रा-कृष्णा नगरी, सैफुल ) ,नितिन आप्पासाहेब सासणे (वय-३४, रा-जय मल्हार नगर, बाळे),   गोपाळ बाबु जाधव (वय-४८, रा-सेटलमेंट फ्रि कॉलनी नं.६) गोपाळ बाबु जाधव (वय-४८, रा-सेटलमेंट फ्रि कॉलनी नं.६), सुधाकर संदिपान माने (वय-२७, रा कोंडी),

श्रीकांत प्रल्हाद शिंदे (वय-२२, , गुळवंची), आकाश गणेश कांबळे (वय-२७, रा-बुधवार पेठ, मिलींद नगर), मारूती केत (वय-३७, रा मुळेगाव तांडा),  रजनिश भोसले (वय-३४, रा.  जोशी गल्ली), सचिन सुरेश जाधव (वय-३५, , दमाणी नगर) , अमर देविदास जमादार (वय-२७,रा- जुनी मिल चाळ), आकाश गुरव (जुना पुना नाका), दीपक सुंदर सिंग चव्हाण (भूषण नगर) प्रकाश वाघमारे (सात रस्ता सोलापुर) ,पुरुषोत्तम बने (उत्तर कसबा सोलापूर), अमिताब वाघमारे (सिद्धार्थ हौसिंग सोसायटी), प्रसाद लोंढे (अवंती नगरी), प्रवीण कुमार शिंदे (विजापूर), प्रशांत गायकवाड (विजापूर रोड सोलापूर), प्रभाकर फताटे (अक्कलकोट रोड सोलापूर), राजकुमार कडबगाव (अक्कलकोट), निसार मुजावर (भवानी पेठ), संतोष कदम (शेळगी) अशा 24 जणांविरोधात व मिळून आलेल्या ८ नर्तिका यांच्याविरोधात फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

टायर फुटून अपघात, लातूरच्या दोघांचा मृत्यू, एक जखमी
https://t.co/GAzCKba1Ho

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 11, 2021

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #Read #hotel #Paradise #Dancebar #Solapur, #सोलापुरातील #हॉटेल #पॅराडाईज #डान्सबारवर #छापा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article शेतकऱ्यांनी कृषी योजनांचा लाभ घ्यावा, पालकमंत्री भरणे यांचे आवाहन
Next Article पाच वर्षे, त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांना मास्क घालावे का ?

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?