Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: महाराष्ट्र मेट्रोमध्ये भरती, ५० हजार ते २ लाखापर्यंत पगार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsअर्थाअर्थमहाराष्ट्र

महाराष्ट्र मेट्रोमध्ये भरती, ५० हजार ते २ लाखापर्यंत पगार

Surajya Digital
Last updated: 2021/09/28 at 7:01 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने विविध पदांसाठी भरती काढली आहे. मेट्रोमध्ये मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ उप महाव्यवस्थापक, उपव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, वरिष्ठ विभाग अभियंता, विभाग अभियंता, कनिष्ठ अभियंता, वरिष्ठ तंत्रज्ञ आणि खाते सहाय्यक या पदांसाठी भरती होणार आहे. विविध पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १४ ऑक्टोबर आहे. अधिक माहिती Mahametro.org येथे मिळेल.

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRCL) ने अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ उप महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, वरिष्ठ स्थानक नियंत्रक/ वाहतूक नियंत्रक/ आगार नियंत्रक/ ट्रेन ऑपरेटर, वरिष्ठ पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी १४ ऑक्टोबर २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी विहित नमुन्यातून पदांसाठी अर्ज करू शकतात. अधिकृत अधिसूचनेनुसार ९६ पदे भरली जाणार आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया mahametro.org या अधिकृत वेबसाईटवर सुरू करण्यात आली आहे.

अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना १,००,००० ते २,६०,००० रुपये वेतनश्रेणी दिली जाणार आहे. वरिष्ठ उप महाव्यवस्थापक पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना ८०,००० ते २,२०,००० रुपये वेतनश्रेणी दिली जाणार आहे. उपमहाव्यवस्थापक पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना ७०,००० ते २,००,००० रुपये वेतनश्रेणी दिली जाणार आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक पदासाठी अर्ज करणार्‍या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून पूर्णवेळ B.E. / B.Tech पदवी प्राप्त केलेली असावी. सिव्हिल इंजिनीअर पदासाठी अर्ज करण्यासाठी सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये B.E. / B.Tech असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रतेच्या संपूर्ण तपशीलांसाठी, उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना पहावी लागेल.

इच्छुक उमेदवारांनी १४ ऑक्टोबर २०२१ रोजी किंवा तारखेच्या आधी ऑनलाइन अर्ज करू शकतात. महा मेट्रो पुणे महानगर वेबसाइटवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे. दरम्यान अर्जाच्या संपूर्ण कालावधीत कोणत्याही कारणास्तव ऑनलाइन अर्ज सादर करण्यात कोणत्याही नेटवर्क समस्या/व्यत्ययासाठी जबाबदार राहणार नाही.

* अशी आहे वयोमर्यादा

अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक – ५३ वर्षे

वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक- ४८ वर्षे

उपमहाव्यवस्थापक – ४५ वर्षे

सहाय्यक व्यवस्थापक – ३५ वर्षे

वरिष्ठ स्टेशन नियंत्रक/वाहतूक नियंत्रक/आगार नियंत्रक/ट्रेन ऑपरेटर- UR- ४० वर्षे, OBC- ४३ वर्षे, SC/ST- ४५ वर्षे

वरिष्ठ विभाग अभियंता- ४० वर्षे

विभाग अभियंता – ४० वर्षे

कनिष्ठ अभियंता – ४० वर्षे

वरिष्ठ तंत्रज्ञ – ४० वर्षे

खाते सहाय्यक – ३२ वर्षे

You Might Also Like

‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का

स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष

भिंगारमध्ये श्री संत जनार्दन स्वामी महाराज दिंडीचे राष्ट्रवादीच्या वतीने भक्तीभावाने स्वागत

केडगाव हत्येचा लागला छडा , 3 अटकेत

कोल्हापूर जिल्हा म्हणजे कुस्तीची पंढरी – रविंद्र चव्हाण

TAGGED: #Recruitment #Maharashtra #Metro #salary #2lakh, #महाराष्ट्र #मेट्रो #भरती #५०हजार #२लाखापर्यंत #पगार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापुरात औरंगाबाद वक्फ बोर्डाचे विभागीय कार्यालय लवकरच होणार
Next Article एफआरपी थकवणा-या २७ साखर कारखान्याची नावे ‘लाल’ यादीत, शेतक-यांनी ठरवावे कुठे ऊस द्यावा

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?