Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अपात्रतेबाबत मुख्यमंत्र्यांसह सोळा आमदारांना नोटीस, उत्तरासाठी सात दिवसांची मुदतवाढ
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

अपात्रतेबाबत मुख्यमंत्र्यांसह सोळा आमदारांना नोटीस, उत्तरासाठी सात दिवसांची मुदतवाढ

Surajya Digital
Last updated: 2023/07/08 at 12:04 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

मुंबई : शिंदे गटाच्या 16 आमदार विरुद्धच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर लवकरच निर्णय घेणार आहेत. राहुल नार्वेकर यांनी आज मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह 40 आमदारांना तसेच ठाकरे गटाच्या 16 आमदारांना नोटीस दिली आहे. Notice to sixteen MLAs including Chief Minister regarding disqualification, Assembly Speaker Rahul Narvekar extends seven days for reply केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शिवसेनेच्या घटनेची प्रत आपल्याला मिळाली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासह 16 शिवसेना आमदारांविरुद्धच्या अपात्रतेच्या याचिकांवर लवकरच सुनावणी
सुरु होणार आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांना तसेच ठाकरे गटाच्या 16 आमदारांना नोटीस दिली आहे. त्यानंतर पुढील 7 दिवसांपर्यंत त्यांना उत्तर देण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. सत्तासंघर्षातील 16 आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांकडे सोपवले होते. या प्रक्रियेवर गती आली आहे. येत्या काही दिवसांत हा निर्णय होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह इतर आमदारांना नोटीस जाणार दिली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज त्यांना नोटीस देण्याची शक्यता आहे. निलंबित आमदार प्रकरणात पुढे कायदेशीर भूमिका काय याची विचारणा केली जाणार.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांना अपात्र ठरवण्यात यावं यासाठीची ठाकरे गटाची याचिका विधानसभा अध्यक्षांकडे दाखल आहे. त्यासाठी ठाकरे गटाकडून अनेकदा स्मरण पत्र ही देण्यात आलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावी असे निर्देश दिले आहेत. यामुळे आता राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदेंसह इतर आमदारांना नोटीस दिलीय. या कार्यवाहीची सुरुवात झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर 90 दिवसांच्या विधानसभा अध्यक्षांना निर्णय घेण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शिवसेनेच्या घटनेची प्रत आपल्याला मिळाली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 शिवसेना आमदारांविरुद्धच्या अपात्रतेच्या याचिकांवर लवकरच सुनावणी सुरु होणार आहे, असं राहुल नार्वेकर यांनी काल शुक्रवारी (7 जुलै) सांगितलं होतं. राहुल नार्वेकर यांनी निवडणूक आयोगाकडे शिवसेनेच्या घटनेची प्रत मागितली होती. ही प्रत त्यांच्या कार्यालयाला मागील आठवड्यात मिळाली आहे. आता आम्ही सुनावणी सुरु करु, असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे.

ही प्रक्रिया प्रत्यक्षात कधी सुरु होणार असं विचारलं असता नार्वेकर यांनी ‘लवकरच’ असं उत्तर दिलं होतं. राहुल नार्वेकर यांच्या या वक्तव्यानंतर आमदारांच्या अपात्रतेबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.

ठाकरे गटाने या आठवड्याच्या सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करुन आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकांवर जलद सुनावणी करण्यासाठी अध्यक्षांना निर्देश द्यावेत, अशी मागणी केली आहे. आमदार सुनील प्रभू यांनी मुख्य व्हिप म्हणून 2022 मध्ये एकनाथ शिंदे आणि इतर 15 बंडखोर आमदारांविरुद्ध अपात्रतेची याचिका दाखल केली होती. नंतर सुनील प्रभू यांनी ठाकरे गटाच्या वतीने या महिन्यात पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने 11 मे रोजीच्या निकालात विधानसभा अध्यक्षांना याचिकांवर मुदतीत निर्णय घेण्याचे निर्देश दिले असतानाही राहुल नार्वेकर हे जाणूनबुजून सुनावणीला उशीर करत असल्याचा दावा केला, याचिकेत करण्यात आला होता.

 

You Might Also Like

शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री

महाराष्ट्रातील भाजपा कार्यकर्त्यांना लाभणार रवी नामक ‘दादा’ !

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दोन वारकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू

अपूर्व हिरे बुधवारी भाजपामध्ये करणार प्रवेश

TAGGED: #Notice #sixteen #MLAs #ChiefMinister #regarding #disqualification #Assembly #Speaker #RahulNarvekar #extends #sevendays #reply, #अपात्र #मुख्यमंत्री #सोळा #आमदार #नोटीस #उत्तर #सातदिवस #मुदतवाढ #विधानसभा #अध्यक्ष #राहुलनार्वेकर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article Students news सोलापूर : आयटीआय प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना 11 जुलै पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
Next Article ‘राष्ट्रवादीतील फूट हा पवारांनी ठरवून केलेला कार्यक्रम’, जुन्या सहका-याचा आरोप

Latest News

उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
हिमाचल प्रदेशमध्ये प्रवाशांनी भरलेली बस उलटली; ४४ प्रवासी जखमी
Top News July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?