Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: खुशखबर : रेल्वे विभागाने 1 लाख 40 हजाराहून जादा जागांसाठी काढली भरती, डिसेंबरमध्ये परीक्षा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsअर्थाअर्थदेश - विदेश

खुशखबर : रेल्वे विभागाने 1 लाख 40 हजाराहून जादा जागांसाठी काढली भरती, डिसेंबरमध्ये परीक्षा

Surajya Digital
Last updated: 2020/09/06 at 7:27 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : युवकासाठी एक नोकरीची खुशखबर आहे. अनेकांना केंद्र सरकारची नोकरी मिळण्याची सुवर्णसंधी आली आहे.  रेल्वे विभागाने  तब्बल 1लाख 40 हजार 640 रिक्त पदांसाठी लवकरच परीक्षा घेणार असल्याचे घोषित केले आहे. येत्या डिसेंबरमध्ये परीक्षा होणार आहेत. लवकरच या परीक्षांचे वेळापत्रकही जाहीर केले जाणार आहे. गेल्या 5 महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे.

कोरोना महामारीमुळ देशावर आर्थिक संकट कोसळले असून गेल्या तिमाहीत जीडीपीत मोठी घट झाल्याचे दिसून आले. त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मंत्रालय आणि संबंधित विभागांना अवास्तव असा खर्ज टाळण्याचे बजावले आहे. तसेच, मंत्रालयीन विभागातील कामकाजासाठी कागदाचा अनावश्यक वापरही बंद करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मात्र, नोकर भरती थांबविण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे, केंद्र सरकारला विविध विभागातील जागांची भरती करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

भारतीय रेल्वेकडून रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन पडल्याने या पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. तसेच, पुढील तारखाही निश्चित करण्यात आल्या नव्हत्या, त्यातच लॉकडाऊनमुळे सरकारी नोकरी होणार की नाही? याबाबतही शंका निर्माण झाली होती. मात्र, रेल्वेने डिसेंबर महिन्यात परीक्षा घेण्यात येतील, असे सांगितले आहे. 15 डिसेंबर 2020 पासून रेल्वेच्या रिक्त जागांसाठी परीक्षा घेण्यात येणार आहे.

* देशभरातून  2.42 कोटी अर्ज

देशभरातील 1,40,640 जागांसाठी रेल्वेकडे तब्बल 2.42 कोटी अर्ज आले आहेत. या अर्जांची छाननीप्रक्रिया पूर्ण झाली असून ही परीक्षा संगणकीकृत असणार असल्याची माहिती आहे. रेल्वेकडे तीन श्रेणींसाठी हे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये एनटीपीसीसाठी (तांत्रिक नसलेल्या, गार्ड, लिपीक, क्लर्क) 35,208 जागा रिक्त आहेत. तर,  1663 जागा मंत्रालयीन स्तरावर आहेत. उर्वरीत 1,03,769 जागा ( ट्रॅकमन, सफाई, पॉईँटमन) यांसाठी आहेत. परीक्षा घेण्यासाठी विशेष सूचना व नियमावली तयार करण्यात आली आहे. कोरोना लॉकडाऊन, सामाजिक अंतर पालन करुनच या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे, गेल्या 5 महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना दिलासा मिळणार आहे.

You Might Also Like

एअर इंडियाची विमाने दुरुस्तीसाठी तुर्कीऐवजी आता अन्य देशांत पाठवणार

सिक्कीम : लष्करी छावणीत भूस्खलन, तिघांचा मृत्यू, ९ जवान बेपत्ता

नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत डी गुकेशने मॅग्सन कार्ल्सनवर मिळवला आश्चर्यकारक विजय

राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली

TAGGED: #रेल्वेभरती #1लाख40हजार #डिसेंबर #परीक्षा #2.42कोटीअर्ज #प्रतीक्षा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article आमदार अनिल बाबरांना कोरोनाची लागण; सांगलीत आतापर्यंत सहा आमदार बाधित
Next Article आरआर आबांच्या मुलापाठोपाठ पत्नी आमदार सुमन पाटीलही कोरोनाबाधित

Latest News

एक पेड माँ के नाम…… पालकमंत्री बावनकुळे यांचा उपक्रम
महाराष्ट्र June 2, 2025
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 26 निरीक्षकांची बदली
महाराष्ट्र June 2, 2025
एअर इंडियाची विमाने दुरुस्तीसाठी तुर्कीऐवजी आता अन्य देशांत पाठवणार
देश - विदेश June 2, 2025
सिक्कीम : लष्करी छावणीत भूस्खलन, तिघांचा मृत्यू, ९ जवान बेपत्ता
देश - विदेश June 2, 2025
नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत डी गुकेशने मॅग्सन कार्ल्सनवर मिळवला आश्चर्यकारक विजय
देश - विदेश June 2, 2025
एसटीला देशात क्रमांक एकची परिवहन संस्था करण्याचे ध्येय – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 2, 2025
पावसाळ्यात, नैसर्गिक आपत्तीत पशुधनाची घ्या अशी काळजी
महाराष्ट्र June 2, 2025
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?