Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कुत्र्यांना वाचवण्यासाठी हवी मदत; सोलापुरात पोलिसांना उल्लू बनवण्याचा प्रकार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

कुत्र्यांना वाचवण्यासाठी हवी मदत; सोलापुरात पोलिसांना उल्लू बनवण्याचा प्रकार

Surajya Digital
Last updated: 2022/09/24 at 12:38 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)○ परिक्षा देण्यासाठी गेलेल्या महिलेचे अपहरण

सोलापूर : चक्क पोलीसांनाच ‘उल्लू’ बनवण्याचा प्रकार सोलापुरात घडला आहे. पण ‘खाकी’वर्दीनं इंगा दाखवला असता प्रकार उघडकीस आलाय. भानगड काय आहे ? जाणून घेण्यासाठी वाचा ‘सुराज्य डिजिटल’ ची ही बातमी. Help Needed to Rescue Dogs; In Solapur, police are turned into owls

 

दारूच्या नशेत पोलीसांना खोटी माहिती देणार्‍या मुस्ती येथील इसमावर वळसंग पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. वळसंग पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार रोहित नागनाथ थोरात यांनी वळसंग पोलीसात दिलेल्या फिर्यादी नुसार दिनांक 23 सप्टेंबर रोजी मध्यरात्री आरोपी सादुल राणू गायकवाड (वय वर्षे 25,रा. मुस्ती, ता. दक्षिण सोलापूर ) याने डायल 112 वर कॉल करून अकरा कुत्र्यांना वीष देऊन मारल्याचे म्हटले. आणखीन बाकी कुत्र्यांना मारणार आहे. त्याकरिता पोलीस मदत हवी आहे, अशी खोटी माहिती दिली.

 

आपण पोलीसांना देत असलेली माहिती खोटी आहे. याची त्याला पूर्ण कल्पना असताना देखील त्याने दारूच्या नशेत कॉल करून शासकीय सेवकाला खोटी माहिती दिली आहे. म्हणून फिर्यादीने सदर आरोपी विरुद्ध भादवी कलम 177 प्रमाणे कायदेशीर फिर्याद दिली आहे. सदर आरोपी विरुध्द वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

अधिक तपास वळसंग पोलीस ठाण्याचे सपोनि अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोना बंदीछोडे करीत आहेत.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

○ परिक्षा देण्यासाठी गेलेल्या महिलेचे अपहरण

सोलापूर : परीक्षा देण्यासाठी गेलेल्या महिलेचे अपहरण केल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना दि.२२ सप्टेंबर रोजी सकाळी पावणे नऊ ते सव्वानऊ वाजण्याच्या दरम्यान गव्हर्नमेंट पॉलीटेक्निक कॉलेज बी १ परीक्षा हॉल येथे घडली.
याप्रकरणी ऋत्विक दशरथ राठोड (वय-२३,रा. माशाळ नगर, ज्ञान प्रबोधिनी शाळेजवळ, विजापूर रोड) यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.त्यांच्या फिर्यादीवरून विलास शेट्टीबा चौगुले, मनीषा विलास चौगुले (दोघे.रा.सोलापूर) यांच्यासह एका अनोळखी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,  दि.२२ सप्टेंबर रोजी गव्हर्नमेंट पॉलीटेक्निक कॉलेज बी १ या परीक्षा हॉलमध्ये फिर्यादी व फिर्यादीची पत्नी आले.त्यावेळी फिर्यादी यांच्या पत्नीला पेपर देण्याकरिता पतीने हॉलमध्ये सोडून बाहेर गेले.  त्यादरम्यान फिर्यादी ऋत्विक यांच्या पत्नीचे आई-वडील त्या ठिकाणी येऊन फिर्यादी व ऋतुजा हिचा विवाह मान्य नसल्याने तिला फिर्यादीपासून दूर ठेवून अटकाव करण्यासाठी संगणमत करून जबरदस्तीने घेऊन जाऊन तिचे अपहरण केले, असे फिर्यादीत म्हटले आहे. घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शेख हे करीत आहेत.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Help #Needed #Rescue #Dogs #Solapur #police #turned #owls, #कुत्रा #वाचवण #हवी #मदत #सोलापूर #पोलिस #उल्लू #प्रकार #दक्षिणसोलापूर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article प्रशासकानी कठोर पावलं उचलली असती तर लक्ष्मी बॅंक वाचली असती
Next Article कुर्डूवाडी रस्त्यावर आयशर – ट्रकची धडक, एक ठार तर एक जखमी

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?