छत्रपती संभाजीनगर, ७ ऑगस्ट –
महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे गुरुवारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. सकाळच्या सुमारास त्यांचे शहरात आगमन झाले.
या वेळी भाजप आमदार, नेते आणि कार्यकर्ते यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. फुलंब्री विधानसभा मतदारसंघाच्या भाजप आमदार अनुराधा चव्हाण यांनीही मंत्री बावनकुळे यांची भेट घेऊन मतदारसंघातील विविध महत्त्वपूर्ण विषयांवर त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.