Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पहलगामच्या दहशतवाद्यांवर 20 लाखांचे बक्षीस जाहीर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

पहलगामच्या दहशतवाद्यांवर 20 लाखांचे बक्षीस जाहीर

admin
Last updated: 2025/05/13 at 5:31 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

पोलिसांनी उर्दू भाषेत लावले दहशतवाद्यांचे पोस्टर्स

श्रीनगर, 13 मे (हिं.स.) : पहलगाम येथील नरसंहारातील 3 दहशतवाद्यांवर पोलिसांनी 20 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. पहलगाम येथे 3 जिहादी दहशतवाद्यांनी 26 हिंदू पर्यटकांचे टार्गेट किलींग केले होते.

जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथील बैसरन खोऱ्यात 22 एप्रिल रोजी लश्कर-ए-तोयबाची शाखा असलेल्या द रेझिस्टन्स फ्रंटच्या (टीआरएफ) दहशतवाद्यांनी निरपराध हिंदू पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून ठार केले होते. यामध्ये आसिफ फुजी, सुलेमान शाह आणि अबू तल्हा या दहशतवाद्यांचा समावेश असल्याची माहिती पुढे आली होती. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या 9 तळांवर हल्ला चढवून सुमारे 100 दहशतवाद्यांना यमसदनी धाडले. परंतु, पहलगाम हल्ल्याला 20 दिवस उलटूनही या दहशतवाद्यांचा थांगपत्ता लागलेला नाही.

या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी जम्मू-काश्मीर पोलिस ठीक-ठिकाणी छापेमारी करीत आहे. जम्मू-काश्मीर खोऱ्यातील पहलगाम येथे 4 ते 5 जिहादी दहशतवादी घटनेच्या एक महिना आधीपासून सक्रीय होते. दहशतवाद्यांनी स्थानिकांच्या मदतीने पहलगामची रेकी देखील केली होती. त्यामुळे बक्षीस जाहीर केल्यानंतर स्थानिकांकडून या दहशतवाद्यांची माहिती मिळू शकलेत या अपेक्षेने पोलिसांनी या दहशतवाद्यांचे छायाचित्र असलेले पोस्टर्स जारी केले आहेत.

You Might Also Like

पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा

एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद

‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत

राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article केंद्राची आंतरजातीय विवाह योजना बंद
Next Article पंतप्रधान मोदी अचानक पोहोचले आदमपूर एअरबेसवर

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?