मुंबई, 16 मार्च (हिं.स.)। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज मुंबई येथील त्यांच्या निवासस्थानी आरएफएल ॲकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी भेट घेतली.
या विद्यार्थ्यांनी पालक आणि शिक्षकांना रोबोटिक्स आणि एआयसंबंधी मार्गदर्शन करणारा ‘रेझिंग फ्युचर इनोव्हेटर्स’ प्रकल्प तयार केला आहे. या प्रकल्पाचा डेमो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सर्व विद्यार्थ्यांनी सादर केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले.