पुणे : कोणाच्या कलेला कधी आणि कोणत्या माध्यमातून संधी मिळेल सांगता येत नाही. याचा प्रत्यय या बारामतीच्या रिक्षावाल्याकडून येतो.
वाजले की बारा गाण्याने राज्यातील रसिक प्रेक्षकांच्या मनात घर करून गेलेल्या बारामती तालुक्यातील गुनवडी गावच्या बाबजी कांबळे या रिक्षा चालकास आता मराठी चित्रपटाची ऑफर आली आहे. त्यामुळे त्याचे कौतुक होत आहे.

‘चल रे फौजी’ आणि ‘कवच’ या आगामी दोन चित्रपटांमध्ये बाबजी कांबळे हे अभिनय करणार आहेत. आज चित्रपट-दिग्दर्शक घनशाम येडे यांनी बारामतीत येऊन बाबजी कांबळे यांची भेट घेऊन त्यांना चित्रपटाची ऑफर दिली.

बाबजी कांबळे यांची ही लावणी महाराष्ट्रातील घराघरात पोहोचले आहे. गॅस पॉइंट सेंटरवर बराच वेळ लागणार असल्याने मोकळ्या वेळेत काय करायचे असा प्रश्न समोर आला. तेव्हा इतर रिक्षाचालकांनी त्यांना गाण्यावर डान्स करण्याची सुचना केली आणि ‘वाजले की बारा’ या गाण्यावर अप्रतिम नृत्य कांबळे यांनी केले. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

‘सुराज्यडिजिटल‘नेही त्याचा व्हिडिओ आणि बातमी घेतली होती. त्याची दखल राज्यभरातील सर्व प्रसारमाध्यमांनी घेतली आणि पाहता पाहता बाबजी कांबळे हे महाराष्ट्रात एका रात्रीत ‘बारामतीचा रिक्षावाला’ या नावाने प्रसिद्ध झाले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्याची दखल घेत बारामतीत यापूर्वी काम केलेले व सध्या ‘अलख निरंजन’, ‘एलिजाबेथ एकादशी’ अशा काही चित्रपटांचे निर्माते, दिग्दर्शक असलेल्या घनश्याम येडे यांनी बालाजी कांबळे यांना फोन केला आणि भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार येडे हे बारामतीत आले. त्यांनी स्वतः पुष्पगुच्छ बरोबर आणला होता. तो पुष्पगुच्छ बाबजी कांबळे यांना देत यांनी बाबजी कांबळे यांचे कौतुक केले. आणि त्यांना थेट आपल्या आगामी दोन चित्रपटात चांगल्या प्रकारची भूमिका घेण्याची इच्छा व्यक्त केली. या इच्छेने कांबळे हे भारावून गेले होते.

घनश्याम येडे, निर्माता-दिग्दर्शक – महाराष्ट्राच्या मातीत खूप कला दडलेली आहे. कांबळे यांची कला पाहिल्यानंतर त्या कलेचा आदर करणे कौतुक करणे ही माझी जबाबदारी होती.
