Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: रस्ता मला मानसिक, शारीरिक त्रास देतोय; महिलेची पोलिसात तक्रार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

रस्ता मला मानसिक, शारीरिक त्रास देतोय; महिलेची पोलिसात तक्रार

Surajya Digital
Last updated: 2020/12/07 at 11:27 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

औरंगाबाद : आपण अनेक तक्रारीचे प्रकार पाहिले असतील, परंतु कोणी रस्त्याच्या विरोधात तक्रार केल्याचे ऐकिवात नसेल. पण औरंगाबादेत अशीच एक तक्रार झाली आणि तीही एका महिलेने केली आहे.

औरंगाबाद शहरात राहणाऱ्या संध्या घोळवे-मुंडे यांनी चक्क रस्त्याविरोधात पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली आहे. राज्यातील अनेक रस्ते सध्या खड्डेमय झाले आहेत. त्यातूनच अनेक चाकरमान्यांना प्रवास करीत आपल्या इच्छित स्थळी पोहोचायला वेळ लागतो. संध्या मुंडे तर गेल्या 14 वर्षांपासून या रस्त्याच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळलेल्या आहेत.

संध्या मुंडे या फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालयात प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून काम करतात. गेल्या 14 वर्षांपासून त्या औरंगाबाद ते फुलंब्री रस्त्यांने अप-डाऊन करतात. त्यामुळे त्या रस्त्याच्या प्रवासाला कंटाळल्या आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

औरंगाबाद ते फुलंब्री हा तीस किलोमीटरचा रस्ता. गेल्या तीन वर्षांपासून औरंगाबाद जळगाव रस्त्याचं काम सुरू आहे. त्यामुळे असंख्य त्रासांना त्यांना सामोरं जावं लागतं आहे. याच कामाचा कंत्राटदार काम सोडून गेला. रस्त्याचे काम अर्धवट झाल्याने तब्बल एक वर्ष नागरिकांचे हाल सुरू होते.

कंटाळलेल्या संध्या मुंडे यांनी वैतागून थेट फुलंब्री पोलीस स्टेशन गाठले. त्यांनी औरंगाबाद- फुलंब्री या रस्त्याविरोधातच पोलिसात तक्रार केली आहे. ‘हा रस्ता मला मानसिक, शारीरिक , आर्थिक त्रास व्हावा या हेतूने धक्काबुक्की आणि अडवणूक करीत आहे. हा रस्ता सुधारेल अशी मला अशा होती. मात्र तसे न होता हा रस्ता दिवसेंदिवस प्राणघातक बनत चालला आहे,’ असं त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.

“या रस्त्यामुळे अनेक प्रकारच्या वेदना रोज सहन कराव्या लागत आहे. आमच्या भावना प्रशासनापर्यंत पोहोचण्यासाठी तक्रार दिली आहे. प्रशासनाने या बाबत संबंधितांवर कारवाई केली नाही तर न्यायालयाकडे दाद मागणार आहे”

– संध्या घोळवे-मुंडे

You Might Also Like

‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का

स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष

भिंगारमध्ये श्री संत जनार्दन स्वामी महाराज दिंडीचे राष्ट्रवादीच्या वतीने भक्तीभावाने स्वागत

केडगाव हत्येचा लागला छडा , 3 अटकेत

कोल्हापूर जिल्हा म्हणजे कुस्तीची पंढरी – रविंद्र चव्हाण

TAGGED: #रस्ता #मानसिक #शारीरिक #त्रास #देतोय #महिलेची #पोलिसात #तक्रार, Ourangabaad-sandhya-gholawe
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article चंद्रकांत पाटलांचे शरद पवारांना प्रत्युत्तर, काहीही झालं तरी कृषी कायदा रद्द होणार नाही
Next Article केंद्र सरकारचा 2 हजाराचा सातवा हफ्ता गुरुवारपासून खात्यावर होणार जमा

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?