सोलापूर : प्लॉट नावावर करुन देण्याच्या मागणीसह चारित्र्यावर संशय घेत विवाहितेचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी माढा पोलिसात नवरा, सासू आणि सासरा अशा तिघांवर खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली.
माढ्यातील शुक्रवार पेठेत ही घटना घडली. सना इरफान मोमीन (वय २७) असे मयताचे नाव आहे. मयताचे वडील महंमदमुसा गुलामदस्तगीर अन्सारी (व ५२. रा. शालिमार कॉलनी एम.आय. डि. सी. उस्मानाबाद) यांनी दिली आहे. इरफान रजाक मोमीन, रजाक मकबूल मोमीन, आसिया रजाक मोमीन अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. मयताचे लग्न इरफान रजाक मोमीन याच्या बरोबर झाले होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
लग्नानंतर दोन महिन्यापासून तिला सासरी नवरा इरफान रजाक मोमीन, सासरा रजाक मकबूल मोमिन, सासू आशिया रजाक मोमीन यांनी दोन महिने व्यवस्थित नांदून घेतले. त्यानंतर, तुझ्या आई-वडिलांनी लग्नामध्ये आम्हाला काहीही दिले नाही. मानपान केला नाही म्हणत तिचा छळ सुरू केला. तर उस्मानाबाद येथील प्लॉट आमच्या नावावर कर असे म्हणत तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन वेळोवेळी मारहाण केली. त्यानंतर सतत तिचा मानसिक व शारीरिक छळ सुरू होता. शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास तिचा नवरा इरफान रजाक मोमिन याने सनाचा गळा दाबून जीवे मारल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.