Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: नांदेड एक्स्प्रेसमध्ये दरोडा, झटापटीत डॉक्टर दाम्पत्य जखमी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

नांदेड एक्स्प्रेसमध्ये दरोडा, झटापटीत डॉक्टर दाम्पत्य जखमी

admin
Last updated: 2025/06/06 at 8:17 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

मुंबई, ६ जून, (हिं.स.) : नांदेड विशेष एक्स्प्रेस ट्रेनमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्याने डॉक्टर दाम्पत्यावर हल्ला करून लुटीचा प्रयत्न केला आहे. या झटापटीत डॉ. दिपाली देशमुख ट्रेनमधून खाली पडल्या, तर त्यांना वाचवण्यासाठी पती डॉ. योगेश देशमुख यांनी उडी मारल्याने त्यांचा डावा हात तुटला आहे. ही घटना 6 जून रोजी पहाटे ३.३० च्या सुमारास घडली होती.

पनवेलमधील कामोठे येथे राहणारे देशमुख दाम्पत्य व त्यांची ९ वर्षांची मुलगी श्रद्धा हे नातेवाइकांकडे जाण्यासाठी लोकमान्य टिळक टर्मिनस (कुर्ला टर्मिनस) येथून एलटीटी-नांदेड विशेष ट्रेनच्या S-4 बोगीत प्रवास करत होते. झोपेत असताना एका अनोळखी व्यक्तीने डॉ. दिपाली यांच्या पर्सवर हात टाकला. त्यांनी प्रतिकार करताच चोरट्याने त्यांना चालत्या ट्रेनमधून खाली फेकले.

घटनेचा आवाज ऐकून वरच्या सीटवर झोपलेले डॉ. योगेश देशमुख जागे झाले. पत्नी खाली पडल्याचे पाहताच त्यांनीही ट्रेनमधून उडी मारली, ज्यात त्यांचा हात तुटला. घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी तपास सुरू केला असून कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मागील ४ दिवसांत दुसरा रेल्वे दरोडा

या घटनेपूर्वी, २ जून रोजी जयपूर-बांद्रा एक्स्प्रेसमध्ये अंधेरीजवळ एका दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवून लुटण्यात आले होते. चोरांनी ७ लाख रुपयांचा मुद्देमाल असलेली बॅग पळवली होती. या प्रकरणात बोरिवली रेल्वे पोलिसांनी अज्ञात चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

रेल्वेतील सुरक्षेच्या दृष्टीने या घटनांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. रेल्वे पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात केली आहेत.

You Might Also Like

काश्मीर मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी स्वीकारली जाणार नाही – पंतप्रधान मोदी

अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, इराणकडून इस्राइल विरोधात युद्धाची घोषणा

कोणताही देश दहशतवादाला पाठिंबा देत असेल तर त्याला त्याची किंमत मोजावी लागेल – पंतप्रधान मोदी

भारत-कॅनडा करणार उच्चायुक्तांची पुनर्स्थापना

ट्रम्प यांच्या पोस्टमुळे तेहरानमध्ये भीतीचं वातावरण, लोकांनी सोडले शहर

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article नागपुरात 238 गोवंशीयांची सुटका, 24 लाखांच्या मुद्देमालासह तस्कर टोळी जेरबंद
Next Article आयसीआयसीआय बँकेत 4.58 कोटींची फसवणूक, महिला मॅनेजरला अटक

Latest News

पालखी सोहळ्यासाठी ३५०० पोलिसांचा बंदोबस्त, साध्या आणि वारकऱ्यांच्या वेशातही पोलीस
महाराष्ट्र June 18, 2025
काश्मीर मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी स्वीकारली जाणार नाही – पंतप्रधान मोदी
देश - विदेश June 18, 2025
वारकरी भक्तीयोग’कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता सर्वांनी पुढाकार घ्यावा – चंद्रकांतदादा पाटील
Top News June 18, 2025
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, इराणकडून इस्राइल विरोधात युद्धाची घोषणा
देश - विदेश June 18, 2025
‘जारण’ ने १२ दिवसांत कमावले ३.५ कोटी
महाराष्ट्र June 18, 2025
कोणताही देश दहशतवादाला पाठिंबा देत असेल तर त्याला त्याची किंमत मोजावी लागेल – पंतप्रधान मोदी
देश - विदेश June 18, 2025
भारत-कॅनडा करणार उच्चायुक्तांची पुनर्स्थापना
देश - विदेश June 18, 2025
ट्रम्प यांच्या पोस्टमुळे तेहरानमध्ये भीतीचं वातावरण, लोकांनी सोडले शहर
देश - विदेश June 18, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?