पुणे, 24 मे, (हिं.स.)।
: पाहेलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर च्या माध्यमातून बदला घेतला. पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून दिल्याबद्दल भारतीय सैन्याचे अभिनंदन करण्यासाठी, त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी, देश सैन्यासोबत असल्याचे दाखवून देण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने शनिवारी ‘भारत जिंदाबाद रॅली’ चे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला सुनीता वाडेकर, संघमित्रा गायकवाड, मंगल रासगे व रिपब्लिकन पक्षांच्या महिलांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून ‘भारत जिंदाबाद रॅली’ ला सुरुवात झाली. भारत माता की जय.., पाकिस्तान मुर्दाबाद.., भारतीय सैन्याचा विजय असो.., अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. रॅलीत सहभागी कार्यकर्त्यांनी फक्त तिरंगी झेंडे हातात घेतलेले होते.
रिपाइंचे शहराध्यक्ष संजय सोनवणे, परशुराम वाडेकर, रोहिदास गायकवाड, असित गांगुर्डे, शैलेंद्र चव्हाण,अशोक कांबळे, अशोक शिरोळे, मोहन जगताप, महेंद्र कांबळे, महिपाल वाघमारे, शाम सदाफुले, बसवराज गायकवाड, वसंत बनसोडे, भगवान गायकवाड, वीरेन साठे, सुनिता वाडेकर, हिमाली कांबळे, संघमित्रा गायकवाड, मंगल रासगे, सुन्नाबी शेख, यांच्यासह रिपाइं चे पदाधिकारी कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले होते.
भर पावसात निघालेल्या या ‘भारत जिंदाबाद रॅली’ मध्ये कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. बंड गार्डन पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गायकवाड सर व रिपब्लिकन पक्षाच्या ज्येष्ठ पदाधिकारी यांच्या हस्ते हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. यानंतर शहराध्यक्ष संजय सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. राष्ट्रगीताने ‘भारत जिंदाबाद रॅली’ चा समारोप झाला.