लातूर, 20 ऑगस्ट – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी लातूर जिल्ह्यातील पूरग्रस्त बांधवांना मदतीचा हात दिला आहे.
मुसळधार पावसामुळे उदगीर तालुक्यातील बोरगावसह अनेक गावांमध्ये मोठे नुकसान झाले. विशेषतः दलित वस्तीतल्या घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. या परिस्थितीत उदगीर शहर शाखेच्या स्वयंसेवकांनी पुढाकार घेऊन पूरग्रस्त कुटुंबांना मदतीसाठी ४० शिधा किटचे वाटप केले.