Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: एजंटानी चक्क ‘आरटीओ’ अधिकाऱ्यांच्या ठोकल्या बनावट सह्या; 11 जणांविरूद्ध गुन्हा दाखल
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

एजंटानी चक्क ‘आरटीओ’ अधिकाऱ्यांच्या ठोकल्या बनावट सह्या; 11 जणांविरूद्ध गुन्हा दाखल

Surajya Digital
Last updated: 2023/07/11 at 3:19 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)》 मोरोची येथे बसला धडकल्याने दुचाकी चालत ठार● झोपेत असताना तीक्ष्ण शस्त्राने वार ; लक्ष्मीटाकळी येथील घटना

○ सोलापुरातील घटना; कार्यालयातूनच घेतले अर्ज

सोलापूर : वाहन मालक व वाहन मालक प्रतिनिधींनी संगनमत करून खासगी वाहनांवरील बॅंकांचा कर्जाचा बोजा उतरविणे व दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी शासकीय अर्जावर सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अमरसिंह गवारे व विजय तिराणकर यांच्या बनावट सह्या केल्या.  Agents forged signatures of ‘RTO’ officials; A case has been registered against 11 people in Solapur या प्रकरणी तिराणकर यांनी ११ जणांविरूद्ध विजापूर नाका पोलिसांत फिर्याद दिली आहे.

 

आरटीओ कार्यालयाजवळ बसून वाहन मालकांची कामे करणाऱ्या एजटांनी चक्क आरटीओ अधिकाऱ्यांच्याच बनावट स्वाक्षऱ्या केल्याची गंभीर बाब समोर आली आहे. सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी तिराणकर यांच्या फिर्यादीवरून मुस्कान नदीम शेख, परमेश्वर मरगू गाडीवडार, जाविद मन्सुर पठाण, मकवाना संजय बाबुलाल, योगेश्वर सुरेश दळवे, रफिक अल्लाद्दीन फुलारी, इरण्णा भुताळी गायकवाड, भंडारी शिलेषबाबा साहेबलाल,रियाज बेलिफ, रिझवान व अय्याज यांच्याविरूद्ध पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

 

तत्पूर्वी, आरटीओ अधिकाऱ्यांनी त्यासंबंधीची सखोल चौकशी केली. त्यात ११ जणांनी २३ जून ते ४ जुलै २०२३ या काळात अशा प्रकारचे गंभीर कृत्य केल्याची बाब समोर आली. त्यानंतर आरटीओ अधिकाऱ्यांनी विजापूर नाका पोलिस ठाणे गाठले. संशयित सध्या पसार झाले असून वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण हनपुडे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांचा शोध सुरु आहे.

 

● बनावट रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मिळविण्यासाठी आरटीओ कार्यालयातून घेतले अर्ज

 

अकरा जणांनी खासगी वाहनांवरील बॅंकांचा बोजा उतरवून दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र म्हणजेच बनावट रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मिळविण्यासाठी आरटीओ कार्यालयातून अर्ज घेतले. त्यावर सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या केल्या. अंतिम मान्यतेसाठी ते अर्ज त्याच अधिकाऱ्यांकडे पाठविले. त्यावेळी फिर्यादी विजय तिराणकर यांच्या नजरेत ही बाब पडली. आपण तर त्या अर्जांवर कोणतीही स्वाक्षरी केली नाही, तर या अर्जांवर सह्या केल्या कोणी, याची पडताळणी त्यांनी स्वत: केली. त्यावेळी ११ लोकांनी केलेली बनावटगिरी समोर आली आणि त्यांनी पोलिसांत धाव घेतली.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

》 मोरोची येथे बसला धडकल्याने दुचाकी चालत ठार

सोलापूर – चुकीच्या दिशेने येऊन बसला धडकल्याने दुचाकी वरील संतोष सुभाष भोसले (वय ३७ रा.मोरोची ता.माळशिरस) हे गंभीर जखमी होऊन मरण पावले. हा अपघात रविवारी दुपारच्या सुमारास मोरोची येथील उड्डाणपुलाजवळ घडला .

 

संतोष भोसले हे आपल्या दुचाकीवरून मोरोची उड्डाण पुलाजवळील प्राथमिक उपकेंद्रा जवळून वेगाने निघाले होते. त्यावेळी समोरून येणाऱ्या एमएच ४०-एक्यू-६२९० या क्रमांकाच्या बसला समोरून धडकल्याने ते गंभीर जखमी होऊन उपचारापूर्वीच मयत झाले होते. या अपघाताची नोंद नातेपुते पोलिसात झाली. बसचे चालक सतीश लिंगदेव यादव (रा. पुळूजवाडी ता.पंढरपूर ) यांनी पोलिसात दाखल केली. पुढील तपास हवालदार घोळवे करीत आहेत .

● झोपेत असताना तीक्ष्ण शस्त्राने वार ; लक्ष्मीटाकळी येथील घटना

सोलापूर – पोलिसाकडे दिलेल्या तक्रारीत आपल्या मामाचे नाव का गोवले ? या कारणावरून घरात घुसून तिक्ष्ण शस्त्राने केलेल्या मारहाणीत ४३ वर्षीय इसम जखमी झाले. ही घटना लक्ष्मीटाकळी (ता. पंढरपूर) येथे रविवारी सकाळच्या सुमारास घडली. या प्रकरणात पंढरपूर तालुक्याच्या पोलिसांनी राहुल मेटकरी (रा.कोर्टी ता. पंढरपूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 

औदुंबर विलास गाढवे (वय ४३ रा.लक्ष्मी टाकळी) असे जखमीचे नाव आहे. ते रविवारी सकाळच्या सुमारास आपल्या घरात झोपले होते. त्यावेळी राहुल मेटकरी याने परवानगीशिवाय घरात प्रवेश केला आणि तू माझे मामा शंकर शेजाळ आणि बबलू मेटकरी यांची नावे तक्रारीत का घातले. असे म्हणून तीक्ष्ण शस्त्राने त्यांच्या डोक्यात आणि हातावर वार करून पसार झाला. अशी नोंद पोलिसात झाली. हवालदार नलावडे पुढील तपास करीत आहेत .

 

 

You Might Also Like

पंढरपूरातील चंद्रभागा नदीत बुडून एका तरुणाचा मृत्यू

राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्दे राजकीय पक्ष व हितसंबंधांच्या पलीकडील – उपराष्ट्रपती

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणात 50 टक्के पाणीसाठा

सोलापूर-दिल्ली विमानसेवा नोव्हेंबरपासून सुरू होणार

मोहोळ तालुक्‍यातील लांबोटी येथे पोलिसांच्या चकमकीत सराईत गुन्हेगार ठार

TAGGED: #Agents #forged #signatures #RTO #officials #case #registered #11people #Solapur, #एजंट #चक्क #आरटीओ #अधिकारी #ठोकल्या #बनावट #सह्या #सोलापूर #गुन्हा #दाखल
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीवरील स्थगिती उठवली
Next Article ‘ नरेंद्र मोदींना पुरस्कार देण्यास हरकत काय? काँग्रेस नेत्याचा सवाल

Latest News

ग्रुपने लालपरी बुक करा; कमी तिकिटात विठ्ठल दर्शनाला जा
महाराष्ट्र June 20, 2025
राहुल गांधींना मिळाला नवा सरकारी बंगला
महाराष्ट्र June 20, 2025
आदिवासी समाजाच्या गावात १७ प्रकारच्या योजना राबविणार – मुख्यमंत्री
महाराष्ट्र June 20, 2025
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते धरणगावात ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन
महाराष्ट्र June 20, 2025
अफगाणिस्तानच्या पश्चिम भागात ४.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप
महाराष्ट्र June 20, 2025
शासकीय अधिकाऱ्यांनी मनात अपेक्षा न ठेवता काम करावे – हसन मुश्रीफ
देश - विदेश June 20, 2025
पंढरपूरातील चंद्रभागा नदीत बुडून एका तरुणाचा मृत्यू
सोलापूर June 20, 2025
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आघाडीचा लवकरच निर्णय – शरद पवार
राजकारण June 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?