मुंबई : दिवाळीच्या उत्सवात संपूर्ण देश आनंद साजरा करत असताना अभिनेत्री रुबिना दिलैक हिच्या एका ट्विटमुळे सोशल मीडियावर मोठा गदारोळ झाला. लोकप्रिय टीव्ही मालिका ‘छोटी बहू’ मधील ‘राधिका’ म्हणून घराघरांत पोहोचलेली आणि तिच्या परखड वक्तव्यांसाठी ओळखली जाणारी रुबिना पुन्हा एकदा चर्चेत आली — यावेळी ती ‘अँटी हिंदू’ असल्याच्या आरोपांमुळे.
काय होती रुबिनाची पोस्ट?
दिवाळीच्या काळात रुबिनाने सोशल मीडियावर लिहिलं होतं —
“सर्व संबंधितांना ! दिवाळी संपली आहे, (आता) फटाके फोडणे थांबवा… 10 नोव्हेंबरपासून पहाटे 3 वाजेपर्यंत फटाके सतत फोडले जात आहेत.. आता पुरे झालं.. वायू प्रदूषण आधीच आहे, ध्वनी प्रदूषण झोप हिरावून घेतंय…”
या पोस्टनंतर काही नेटिझन्सनी तिच्यावर टीकेची झोड उठवली. अनेकांनी तिच्या मताला विरोध करत, ती हिंदू सणांना विरोध करत आहे असा आरोप केला. सोशल मीडियावर तिच्यावर ट्रोलिंगचा भडका उडाला, तर काहींनी तिचे शो आणि चित्रपट बॉयकॉट करण्याचे आवाहनही केले.
ट्रोलर्सना दिलं जोरदार प्रत्युत्तर
वाद वाढल्यानंतर रुबिनाने टीकाकारांना प्रत्युत्तर देत लिहिलं —
“हिंदूविरोधी??? तुम्ही खरोखरच वेडे आहात का?”
तिने पुढे आणखी एक पोस्ट शेअर करत स्पष्ट केलं की —
“मी सणांच्या विरोधात नाही, पण इतरांच्या झोपेला आणि आरोग्याला हानी पोहोचवणाऱ्या गोष्टींच्या विरोधात आहे.”
सोशल मीडियावर गाजलेली पोस्ट
रुबिनाच्या या वक्तव्यावर काहींनी तिचं समर्थन केलं, तर काहींनी तिच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. दिवाळीच्या काळात झालेल्या या ट्विटमुळे अभिनेत्री सोशल मीडियाच्या केंद्रस्थानी राहिली आणि “अँटी हिंदू” या आरोपांमुळे मोठा वाद निर्माण झाला.