Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पाणीप्रश्नी नाराजी व्यक्त करीत सत्ताधारी नगरसेवक चढले पाण्याच्या टाकीवर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

पाणीप्रश्नी नाराजी व्यक्त करीत सत्ताधारी नगरसेवक चढले पाण्याच्या टाकीवर

Surajya Digital
Last updated: 2021/09/11 at 4:29 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर : महापालिकेतील प्रभाग १६ मधील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक संतोष भोसले यांनी आज पाणी प्रश्नी प्रशासन आणि सत्ताधारी यांच्या विरोधात रोष व्यक्त करीत सिनेस्टाईल आंदोलन केले. यावेळी भोसले यांनी अनेक आरोप केले.

आपल्या प्रभागात गेल्या काही दिवसापासून पाणी पुरवठा विस्कळीत आहे. हीच स्थिती शहरात सर्वत्र आहे. महापौर आणि पदाधिकाऱ्यांसमोर बैठका होवून प्रशासन पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत नाही. ऐन सणासुदीत लोकांना पाणी मिळत नाही. नागरिक लोकप्रतिनिधींवर टीका करत आहेत. अधिकारी वर्ग जाणीवपूर्वक राजकारण करत आहेत. यंदा मुबलक पाऊस झाला, धरणात आणि बंधाऱ्यात पाणी असूनही शहरवासियांना चार दिवसाआड पाणी मिळत आहे, असं संतोष भोसले यांच म्हणणं आहे.

सणासुदीला शहरात सुरळीत पाणीपुरवठा करू अशी बैठक महापालिका आयुक्त पि. शिवशंकर यांनी घेतली, बैठक होवून पंधरा दिवस झाले तरी पाणीपुरवठा सुरळीत नाही. डेंग्यूचा प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असतानाही महापालिका प्रशासन निष्काळजीपणा करीत आहे. डेंग्यूमुळे लहान बालके मृत्यूमुखी पडले आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

मनपा प्रशासनाच्या गलथान कारभाराच्या विरोधात सत्ताधारी नगरसेवक असूनही मी मरायला तयार असल्याचे सांगत भाजपचे नगरसेवक संतोष भोसले यांनी आज शनिवारी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले.

आज सकाळी त्यांनी सोशल मिडियावर पोस्ट टाकून आपण याप्रश्नी पाण्याच्या टाकीवरुन उडी मारण्याचा प्रयत्न करणार आहोत, असं जाहिर केलं आणि ११ च्या सुमारास ते पोलीस आयुक्तालयासमोरील टाकीवर चढले. बराच वेळानंतर पोलीसांनी त्यांना खाली आणलं आणि पालिका आयुक्तांशी चर्चा करुन प्रश्न मार्गी लावण्याचं सांगितलं. सत्ताधारी असुन आपण आंदोलन करत आहात असे पत्रकारांनी विचारले असता संतोष भोसले म्हणाले, सत्तेवर असून उपयोग काय? महापौरांसमोर चर्चा करुनही काहीच उपयोग होत नाही, हालचाली होत नाहीत. पाण्यावाचून शहरवासियांचे हाल होत असल्याचे सांगितले.

उजनीत मुबलक पाणी असतानाही नियोजन नसल्याने पाणीपुरवठा सुरळीत नाही. दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला तरच डेंग्यूचे प्रमाण कमी होणार आहे. लहान मुले डेंग्यूमुळे मरत आहेत. प्रशासनाला लाज वाटली पाहिजे. चारचाकी वाहनात आरामात फिरणाऱ्या अधिकाऱ्यांकडून बैठकीत असल्याचे कारण सांगितले जाते. कागदावर बैठका होतात. सत्ताधारी नगरसेवक असलो तरी आंदोलन करणार. सत्ताधाऱ्यांचा वचक नसल्यामुळेच अधिकारी राजकारण करत आहेत. आयुक्तांनीच सांगितले आहे की, सत्ताधाऱ्यांचे ऐकायचे नाही, असा आरोपही केले.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Expressing #displeasure #waterissue #ruling #corporator #climbed #watertank, #पाणीप्रश्नी #नाराजी #व्यक्त #सत्ताधारी #नगरसेवक #चढले #पाण्याच्या #टाकीवर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article साकीनाका बलात्कार प्रकरण पीडितेचा मृत्यू, आरोपीला 10 दिवसांची पोलीस कोठडी
Next Article पालिकेतील कर्मचारी बनला सराईत गुन्हेगार; 50 मोबाइलवर मारला डल्ला

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?