Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कच्च्या तेलाच्या किमती घटल्या; पेट्रोल स्वस्त होणार? त्यात रशियाची भारताला ऑफर, स्वस्तात कच्चे तेल व युरिया देणार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsअर्थाअर्थदेश - विदेश

कच्च्या तेलाच्या किमती घटल्या; पेट्रोल स्वस्त होणार? त्यात रशियाची भारताला ऑफर, स्वस्तात कच्चे तेल व युरिया देणार

Surajya Digital
Last updated: 2022/03/16 at 1:55 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

नवी दिल्ली : रशिया-युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. त्यात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये चढ-उतार होत असल्याचं पाहायला मिळत आहे. कच्च्या तेलाच्या किमती आज प्रति बॅरल 100 डॉलरच्या खाली आल्या आहेत. ही भारतातील पेट्रोलियम कंपन्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. आज सकाळी 7.15 वाजता नायमॅक्सवर कच्चे तेल प्रति बॅरल $0.59 वाढल्यानंतर $97.24 प्रति बॅरलवर आले आहे.

देशातील पेट्रोल  आणि डिझेलचे दर मात्र स्थिर आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सातत्यानं किमतींमध्ये होणाऱ्या चढ-उतारांमध्ये देशातील किमती मात्र स्थिर आहेत. भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे आजचे दर जारी केले आहेत. आजही देशातील इंधन दरांत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

कच्च्या तेलाच्या किमती आज प्रति बॅरल 100 डॉलरच्या खाली आल्या आहेत. ही भारतातील पेट्रोलियम कंपन्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. आज सकाळी 7.15 वाजता नायमॅक्सवर कच्चे तेल प्रति बॅरल $0.59 वाढल्यानंतर $97.24 प्रति बॅरलवर आले आहे. त्याच वेळी, ब्रेंट क्रूड 0.74 टक्क्यांनी वाढल्यानंतर प्रति बॅरल $100.65 वर व्यापार करत आहे.

Crude oil prices fell; Will petrol be cheaper? Russia will offer India cheap crude oil and urea

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

रशियाने भारताला मोठी ऑफर दिली आहे. भारत आमच्याकडून डिझेल, पेट्रोल आणि युरिया स्वस्तात खरेदी करु शकते, असे रशियाने म्हटले आहे. त्यानंतर भारतानेही यावर विचार करण्याची तयारी दर्शवली आहे. भारत जवळपास 80 टक्के कच्चे तेल आयात करते. तर रशियाकडून भारताला 2 ते 3 टक्के कच्चे तेल मिळते. जर भारताने रशियाकडून कच्चे तेल स्वस्तात खरेदी केले, तर देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होऊ शकतात.

युद्धानंतर अर्थव्यवस्थेबद्दल सांगायचे झाले तर रशियाने भारताला स्वस्तात कच्चे तेल आणि इतर वस्तू देण्याची ऑफर दिली आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तात असेही म्हटले आहे की भारत आता रशियाच्या ऑफरवर विचार करत आहे. रशियाने केवळ कच्चे तेल स्वस्तात देण्याची ऑफर दिली नाही तर इतर वस्तूही स्वस्तात देण्याची ऑफर रशियाने भारताला दिली आहे. त्याचे पेमेंटही डॉलरमध्ये नाही तर रुपयाचे रुबलमध्ये रूपांतर करून केले जाईल असे सांगण्यात येत आहे. अशा परिस्थितीत भारताने रशियाचा प्रस्ताव मान्य केल्यास भारताला महागाईपासून मोठा दिलासा मिळू शकतो.

पाश्चात्य देश आणि अमेरिकेची रशियाबद्दल कठोर भूमिका आहे, त्यामुळे भारताला हा प्रस्ताव मान्य करणे अडचणीचे होऊ शकते. रशियावरील निर्बंधही सातत्याने वाढत आहेत. अशा परिस्थितीत रशियावर बंदी आल्यानंतरही भारताला ही ऑफर स्वीकारणे शक्य आहे का? कारण अनेक देश रशियाशी व्यापार करण्यास कचरतात? भारताने रशियाची ऑफर स्वीकारली तर भारताला किती मोठा फायदा होऊ शकतो. मात्र याचे परिणाम काय होईल हे अद्याप सांगता येणार नाही.

You Might Also Like

सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

‘द बंगाल फाइल्स’वरून विवेक अग्निहोत्रींविरुद्ध नवा एफआयआर

बिहारचा औंठा-सिमारिया ६ पदरी पूल पूर्ण; २२ ऑगस्टला पंतप्रधान करतील उद्घाटन

मुनीरच्या वक्तव्याला पाकिस्तानी गृहमंत्र्यांची दुजोरी

भारत-पाकिस्तान परिस्थितीवर अमेरिका दररोज लक्ष ठेवून – परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ

TAGGED: #Crudeoil #prices #petrol #cheaper #Russia #India #cheap #urea, #कच्च्या #तेल #किमती #घटल्या #पेट्रोल #स्वस्त #रशिया #भारत #ऑफर #युरिया
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article आयपीएल – मनसेने मुंबईत ताज हॉटेलसमोरील बस फोडल्या
Next Article सिद्धू यांच्यासह काँग्रेसच्या 3 प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा

Latest News

सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
देश - विदेश August 18, 2025
‘द बंगाल फाइल्स’वरून विवेक अग्निहोत्रींविरुद्ध नवा एफआयआर
देश - विदेश August 18, 2025
त्र्यंबकेश्वर मंदिरात सुरक्षारक्षकांकडून भाविकांना मारहाण
महाराष्ट्र August 18, 2025
सोलापुरात डीजेमुक्त गणेश मंडळांना विशेष बक्षीस
सोलापूर August 18, 2025
शेतकऱ्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष; महाडीबीटी पोर्टलमुळे लाभार्थी वंचित
सोलापूर August 18, 2025
सोलापुरात जिल्हा परिषदेची दोन एकरांची फाईल गायब
सोलापूर August 18, 2025
बिहारचा औंठा-सिमारिया ६ पदरी पूल पूर्ण; २२ ऑगस्टला पंतप्रधान करतील उद्घाटन
देश - विदेश August 18, 2025
वंदे भारतला जोडणार चार डबे; ३१२ प्रवाशांना अतिरिक्त सुविधा
सोलापूर August 18, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?