Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: रशियाकडून युक्रेनमध्ये ४०० ड्रोन, ४० बॅलेस्टिक मिसाईलने प्रतिहल्ला, मोठे नुकसान
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

रशियाकडून युक्रेनमध्ये ४०० ड्रोन, ४० बॅलेस्टिक मिसाईलने प्रतिहल्ला, मोठे नुकसान

admin
Last updated: 2025/06/06 at 8:45 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

कीव, ६ जून, (हिं.स.) : युक्रेनच्या ‘ऑपरेशन स्पायडर वेब’ अंतर्गत रशियाच्या हवाई तळांवर झालेल्या ड्रोन हल्ल्याचा बदला घेत रशियाने 5 जूनच्या रात्री मोठ्या प्रमाणावर प्रतिहल्ला केला आहे. कीवसह युक्रेनच्या अनेक प्रमुख शहरांवर रशियाने सुमारे ४०० हून अधिक ड्रोन आणि ४० हून जास्त बॅलेस्टिक मिसाईलने प्रतिहल्ला केला. रशियाने केलेल्या या हल्ल्याने युक्रेन हादरले आहे. या हल्ल्यामुळे कीवमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

रशिया आणि युक्रेन यांच्यात २०२२ पासून सुरू असलेले युद्ध २०२५ मध्ये अधिक आक्रमक झाले आहे. काही दिवसांपूर्वी युक्रेनने रशियाच्या ४ एअरबेसवर ड्रोन हल्ले करत त्यांची ४० लढाऊ विमाने उद्ध्वस्त केली होती. आतापर्यंत झालेल्या हल्ल्यांपैकी रशियातील हा हल्ला सगळ्यात मोठा होता. त्यामुळे याचा बदला घेणारच, असा पवित्रा पुतिन यांनी घेतला. त्याचे प्रत्युत्तर आज दिसून आले.

किवच्या महापौरांनी दिलेल्या माहितीनुसार १६ जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. युक्रेनच्या राजधानीत सोलोमिंस्की, होलोसिव्स्की, डार्नित्स्की, निप्रोव्स्की आणि शेचनेवकिव्स्की या भागांमध्ये स्फोट झाल्याचे स्थानिक प्रशासनाने सांगितले. हवाई संरक्षण यंत्रणांनी ड्रोन आणि क्षेपणास्त्र पाडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यातून निर्माण झालेल्या मलब्यामुळे अनेक ठिकाणी आग लागली. कीवचे महापौर विटाली क्लिट्स्को यांनी नागरिकांना सुरक्षित स्थळी आश्रय घेण्याचे आवाहन केले आहे.

या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर युक्रेनभरात हवाई हल्ल्याचा इशारा दिला गेला असून, ल्विव, लुत्स्क, खमेलनित्स्की आणि टर्नोपिलमध्येही स्फोट झाल्याचे वृत्त आहे. रशियाने TU-95 बॉम्बवर्षक विमानांमधून हा हल्ला केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, उत्तर युक्रेनमधील चेर्निहाइव भागात पाडलेल्या ड्रोनमधून झालेल्या स्फोटात एका अपार्टमेंटचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या भागातही बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांमुळे झालेल्या स्फोटांची नोंद झाली आहे.

रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवर बोलताना युक्रेनच्या हल्ल्याचा तीव्र प्रत्युत्तर देण्याची ग्वाही दिली होती, आणि त्यानंतरच हा हल्ला झाला असल्याचे निरीक्षकांचे म्हणणे आहे. युद्धपातळीवर सुरू असलेल्या या कारवाईमुळे दोन्ही देशांमध्ये तणाव अधिकच तीव्र झाला आहे.

—————

You Might Also Like

हाफिज सईदला कुठल्याही परिस्थीतीत भारताला सोपवणार नाही- तल्हा सईद

“भारतात दंगली घडवण्याचा पाकिस्तानचा डाव होता”- पंतप्रधान

आयसीआयसीआय बँकेत 4.58 कोटींची फसवणूक, महिला मॅनेजरला अटक

नांदेड एक्स्प्रेसमध्ये दरोडा, झटापटीत डॉक्टर दाम्पत्य जखमी

मुंबईसह केरळमध्ये ईडीची छापेमारी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article हाफिज सईदला कुठल्याही परिस्थीतीत भारताला सोपवणार नाही- तल्हा सईद
Next Article बकरी ईद – जनावरांच्या कत्तलीसाठी प्रतिबंधित बाबी

Latest News

पुढील चार आठवड्यांसाठी राज्याच्या हवामानाचा अंदाज जाहीर
महाराष्ट्र June 6, 2025
बकरी ईद – जनावरांच्या कत्तलीसाठी प्रतिबंधित बाबी
महाराष्ट्र June 6, 2025
हाफिज सईदला कुठल्याही परिस्थीतीत भारताला सोपवणार नाही- तल्हा सईद
देश - विदेश June 6, 2025
क्रीडा क्षेत्राला चालना देण्याचे काम सरकार करतंय – बावनकुळे
महाराष्ट्र June 6, 2025
जनतेच्या मनात आहे, तेच होईल, मनसे युतीबाबत उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
राजकारण June 6, 2025
आदिवासी बांधवांच्या न्याय्य हक्कांचे रक्षण होणार – अशोक उईके
महाराष्ट्र June 6, 2025
“भारतात दंगली घडवण्याचा पाकिस्तानचा डाव होता”- पंतप्रधान
देश - विदेश June 6, 2025
सिंधू पाणी करार – पाकिस्तानकडून भारताला पुन्हा अणुयुद्धाची धमकी
महाराष्ट्र June 6, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?