Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: रशियाने युक्रेनियन नौदलाचे मोठे जहाज बुडवले
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

रशियाने युक्रेनियन नौदलाचे मोठे जहाज बुडवले

admin
Last updated: 2025/08/29 at 5:26 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

कीव, २९ ऑगस्ट. रशिया आणि युक्रेन यांच्यात गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेला युद्ध थांबण्याचं नाव घेत नाही. रशियाने जमिनीनंतर आता समुद्राला लक्ष्य केलं आहे. गुरुवारी (२८ ऑगस्ट) रशियाने युक्रेनच्या नौदलाच्या एका जहाजावर ड्रोन हल्ला केला. हे जहाज एक टोही (रेकी) जहाज होतं आणि ते बुडाल्याची माहिती समोर आली आहे.

रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितलं की हे जहाज “लगुना-श्रेणीचं” मध्यम आकाराचं जहाज होतं, ज्यामध्ये रेडिओ, इलेक्ट्रॉनिक, रडार आणि ऑप्टिकल उपकरणं होती. हे जहाज विशेषतः टोही मोहिमांसाठी डिझाइन केलं गेलं होतं. हा हल्ला डेन्यूब नदीच्या डेल्टा भागात झाला, ज्याचा काही भाग युक्रेनच्या ओडेसा प्रदेशात येतो. रशियन मीडिया या घटनेची पुष्टी केली आहे.

युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी देखील या हल्ल्याची पुष्टी केली आहे. या हल्ल्यात एका खलाशाचा मृत्यू झाला असून अनेक खलाशी जखमी झाले आहेत. युक्रेनी प्रवक्त्यांनुसार, हल्ल्यानंतरच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बहुतांश खलाशी सुरक्षित आहेत, पण काही लोक अजूनही बेपत्ता आहेत.

‘सिम्फेरोपोल’ हे जहाज २०१९ साली लॉन्च करण्यात आलं होतं आणि २०२१ मध्ये युक्रेनच्या नौदलात सामील करण्यात आलं. याची खासियत म्हणजे कीवकडून २०१४ नंतर लॉन्च झालेलं हे सर्वात मोठं जहाज आहे. हे मुख्यतः टोही आणि देखरेखीच्या मोहिमांसाठी वापरलं जातं. हे अत्याधुनिक सेन्सर आणि रडार प्रणालींनी सुसज्ज आहे. दुसरीकडे, रशियन टेलीग्राम चॅनलने या घटनेला युक्रेनच्या नौदल क्षमतेवर एक मोठा धक्का असल्याचं म्हटलं आहे. रशियन मीडियाच्या माहितीनुसार, ही पहिली वेळ होती जेव्हा एखाद्या नौदलाच्या जहाजावर यशस्वीपणे समुद्री ड्रोनद्वारे हल्ला रकरण्यात आला. ही घटना दाखवते की आधुनिक युद्धामध्ये मानवरहित नौदल प्रणाली किती प्रभावी ठरू शकतात.

अलीकडच्या महिन्यांमध्ये रशियाने नौदल ड्रोन आणि इतर मानवरहित प्रणालींच्या उत्पादनात मोठी गती आणली आहे. ड्रोन आता या युद्धात निर्णायक भूमिका बजावत आहेत. रशियाने असा दावा केला आहे की त्यांनी कीवमधील एका प्रमुख ड्रोन कारखान्यावर क्षेपणास्त्र हल्ला केला. ही जागा तुर्कीच्या ‘बायरकटार’ ड्रोनच्या उत्पादनासाठी सज्ज केली जात होती. यावरून स्पष्ट होतं की युद्धात आता हवाई आणि नौदल ड्रोनचे महत्त्व झपाट्याने वाढत आहे.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article खा.शरद पवार यांनी घेतली नांदेड पूर परिस्थितीची माहिती
Next Article पालघर जिल्ह्यात ९० गावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’ संकल्पना यशस्वी

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?