Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मराठमोळ्या ऋतुजा रावणला ‘मिस इंडिया’चे उपविजेतेपद
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

मराठमोळ्या ऋतुजा रावणला ‘मिस इंडिया’चे उपविजेतेपद

Surajya Digital
Last updated: 2021/01/03 at 1:07 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : मीरा रोडला राहणारी मराठमोळी तरुणी ऋतुजा रावण  हिने राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचा झेंडा फडकवला. दिल्लीत आयोजित डियाडेम मिस इंडिया 2020  मध्ये द्वितीय उपविजेतेपद पटकावलं. मीरा रोडमधील घरी आल्यावर ऋतुजा रावणचा सत्कार करण्यात आला.

ऋतुजा रावण सध्या एका विमान सेवा कंपनीत एअर हॉस्टेस म्हणून नोकरी करते. Diadem Miss India 2020 च्या 2nd runnerup होण्यापर्यंत ऋतुजाचा प्रवास सोप्पा नव्हता. त्याचं कारण म्हणजे या क्षेत्रातील अनुभव अगदीच नगण्य होता.

नवीन क्षेत्र आणि प्रचंड स्पर्धा याची माहिती असतानाही केवळ आत्मविश्वास आणि मेहनतीच्या बळावर तिने यश मिळवलं. वडिलांचं छत्र हरपलं असतानाही आपल्या आईचा आधार, या ताकदीवर ऋतुजा रावणने या स्पर्धेत सहभागी होण्याचे ठरवले… अँड रेस्ट इज द हिस्ट्री.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

दिल्लीत एनसीआरच्या गुरुग्राम येथील किंग्डम ऑफ ड्रीम्समध्ये ब्युटी पेजेन्ट डियाडेम मिस इंडिया आणि मिसेस इंडिया लिगेसी 2020 चं आयोजन करण्यात आलं होतं. देश पातळीवर अनेक राज्यातून 25 स्पर्धक सहभागी झाल्या होत्या. मीरा रोडच्या ऋतुजा रावणने तृतीय स्थान पटकावत महाराष्ट्रचा झेंडा राष्ट्रीय पातळीवर फडकवला.

पहिल्या तीन क्रमांकात येईन, याची कल्पनाही नसल्याचं ऋतुजा रावण म्हणाली. माझी कल्पना प्रत्यक्षात साकार झाल्याचं पाहून मला अत्यानंद होत आहे. राष्ट्रीय स्तरावर मला माझ्या महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करायला मिळालं, याचा मला सार्थ अभिमान वाटतो. आज जरी मी विजेती असले, तरी मी मला मिळालेल्या अनुभवावरुन, माझी आई आणि सर्वच मित्रमंडळी यांच्या सहकार्याच्या आधारावर पुढे भारताचे पर्यायाने महाराष्ट्राचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी बांधील असेन, तसा यशस्वी प्रयत्न मी नक्कीच करेन, असा विश्वासही ऋतुजाने व्यक्त केला.

“मी एवढी मोठी नक्कीच नाही की तुम्हाला सल्ला द्यावा, तरीही एक सांगते की पराजीत होण्याचा भीतीने आपण आपला मार्गच सोडून द्यावा आणि स्पर्धेत भाग घ्यायच्या अगोदरच पराजय स्वीकारावा, असे करु नका. सर्वच मुलींनी अगदी विचारपूर्वक आपला मार्ग निवडावा आणि पूर्ण प्रयत्न, तयारी आणि मेहनत याच्या जोरावर स्वतःला झोकून द्यावे, मग पहा जग तुमच्या पाठीशी असेल”

ऋतुजा रावण – मिस इंडिया, उपविजेता

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #मराठमोळ्या #ऋतुजारावण #मिस इंडिया #उपविजेतेपद
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article केंद्राकडून शिष्यवृत्तीचे ५७१ कोटी मिळणार
Next Article शिवसेना गोत्यात येईल, काँग्रेस नेत्यांने केले भाष्य, चव्हाणांनीही दिले प्रत्युत्तर

Latest News

test
Top News December 5, 2025
Как страх неудачи повышает чувство азарта
Top News December 5, 2025
Gleichwohl dies Markt nv casino stieg erst inoffizieller mitarbeiter fruhen nineteen
Top News December 5, 2025
По какой причине мозг выявляет паттерны даже и в хаосе
Top News December 5, 2025
По какой причине головной мозг откликается на случайные победы особенно ярко
Top News December 5, 2025
Почему мы лучше откладываем в памяти моменты риска, чем эпизоды умиротворения
Top News December 5, 2025
По какой причине мы ярче фиксируем в памяти эпизоды опасности, чем моменты спокойствия
Top News December 5, 2025
Зачем человек превозносят душевные подъемы
Top News December 5, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?