Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: बीसीसीआयच्या बोर्ड रूमला सचिन तेंडुलकरचे नाव
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

बीसीसीआयच्या बोर्ड रूमला सचिन तेंडुलकरचे नाव

admin
Last updated: 2025/05/18 at 3:23 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

मुंबई, 18 मे (हिं.स.)।बीसीसीआयने क्रिकेटचा देव म्हणून ख्याती असलेला सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान दिला. बीसीसीआयने शनिवारी(दि.१७) त्यांच्या मुंबई मुख्यलायतील एका बोर्ड रूमला सचिन तेंडुलकरचे नाव दिले. भारतीय क्रिकेट संघाच्या यशात सचिन तेंडुलकरचा सिंहाचा वाट आहे. त्याच्या योगदानाची दखल घेऊन बीसीसीआयने त्याला सन्मानित केले. बीसीसीआयच्या मुंबई मुख्यालयात ‘एसआरटी १००’ नावाचा बोर्ड रूम दिसणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, स्वत: सचिन तेंडुलकरने या रुमचे उद्घाटन केले.

बोर्ड रूमचे उद्घाटन केल्यानंतर सचिन तेंडुलकर भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. “बीसीसीआयच्या सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानतो, हे अविश्वसनीय आहे. कारण मी प्रत्यक्ष जीवनात असे पहिल्यांदाच पाहत आहे. माझी सुरुवात येथूनच झाली. बीसीसीआयच्या बोर्ड रूमला माझे नाव देणे, हा खरोखरच माझ्यासाठी खूप हृदयस्पर्शी क्षण आहे”, असे सचिन तेंडुलकरने बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. दरम्यान, बीसीसीआयने सचिन तेंडुलकर आधी मुंबई मुख्यलायतील एका रूमला भारताचे माजी फलंदाज सुनील गावस्कर यांचे नाव दिले आहे.

सचिन तेंडुलकर हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी फलंदाज आहे. सचिनने त्याच्या कारकिर्दीत ४८.५२ च्या सरासरीने एकूण ३४ हजार ३५७ धावा केल्या आहेत. यात विश्वविक्रमी १०० शतकांचा समावेश आहे. सचिन कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये अनुक्रमे १५ हजार ९२१ धावा आणि १८ हजार ४२६ धावा करून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. मास्टर ब्लास्टरच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके (५१ शतके) करण्याचा विक्रमही आहे. त्यामुळेच बीसीसीआयने बोर्ड रूम रूमला एसआरटी १०० असे नाव दिले आहे.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मॅक्सिकन नौदलाचे जहाज न्यूयॉर्कच्या ब्रुकलीन ब्रिजला धडकले, अनेकजण जखमी
Next Article तांत्रिक बिघाडमुळे इस्रोचे EOS-09 मिशन अपयशी

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?