Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: दुःखद ! फ्लाईंग सिख, पद्मश्री मिल्खा सिंग यांचे निधन, क्रिडा क्षेत्रात हळहळ
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsखेळदेश - विदेश

दुःखद ! फ्लाईंग सिख, पद्मश्री मिल्खा सिंग यांचे निधन, क्रिडा क्षेत्रात हळहळ

Surajya Digital
Last updated: 2021/06/19 at 8:16 AM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

चंदीगड : भारताचे महान धावपटू ‘फ्लाईंग सिख’ मिल्खा सिंग यांचे निधन झाले. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर गेल्या 30 दिवसांपासून चंदीगडमधील पीजीआयएमईआर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांनी शुक्रवारी रात्री 11.30 वाजता वयाच्या 91 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी 1958 च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक मिळवले होते. गेल्याच आठवड्यात मिल्खा सिंग यांच्या पत्नी निर्मला कौर सिंग यांचे निधन झाले होते.

Sad to hear that our legendary sprinter milkha sing is no more RIP🙏🙏🙏
Thanks for making us proud pic.twitter.com/5THGdtQkU9

— Mangesh Thakur (@Mangesh35876705) June 19, 2021

“श्री मिल्खा सिंग यांच्या निधनामुळे आपण एक महान क्रीडापटू गमावला आहे. असंख्य चाहत्यांच्या मनात त्यांच्यासाठी खास स्थान होतं. त्यांच्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वानं अनेकांना प्रेरणा दिली आहे. त्यांच्या निधनानं मोठं दु:ख झालं,” असं ट्वीट पंतप्रधानांनी केलं आहे.

I had spoken to Shri Milkha Singh Ji just a few days ago. Little did I know that it would be our last conversation. Several budding athletes will derive strength from his life journey. My condolences to his family and many admirers all over the world.

— Narendra Modi (@narendramodi) June 18, 2021

‘फ्लाईंग सिख’ अशी ओळख असलेले भारताचे महान माजी धावपटू मिल्खा सिंग यांचे निधन झाले आहे. मिल्खा सिंग यांच्या जाण्यामुळे संपूर्ण क्रीडाविश्वात आणि देशात शोककळा पसरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विटरद्वारे शोक व्यक्त करत मिल्खा सिंग यांना आदरांजली वाहिली आहे.

RIp
Sprinter milkha Singh
The race of my life_an autobiography of flying sing#ripmilkasing pic.twitter.com/wtWYR1M1wV

— Kailash choudhary (@Kailash28235987) June 19, 2021

मिल्खा सिंग यांना 20 मे रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर 3 जून रोजी त्यांना पीजीआयएमईआरच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं होतं. 13 जून पर्यंत ते याठिकाणी दाखल होते. त्यादरम्यान त्यांनी कोरोनावर मात केली होती. 13 जून रोजी कोव्हिड चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरही, कोरोनामुळे निर्माण झालेल्या आरोग्याच्या इतर काही समस्यांमुळं त्यांना पुन्हा आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. पण डॉक्टरांच्या पथकानं अनेक प्रयत्न केल्यानंतरही त्यांना वाचवता आलं नाही.

गेल्या महिन्यात मिल्खा सिंग यांना करोनाचा संसर्ग झाला होता. यानंतर त्यांना मोहालीच्या फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले.

महान धावपटू,'फ्लाईंग शीख' अर्थात मिल्खा सिंग जी यांच्या निधनाची बातमी अत्यंत धक्कादायक आहे. त्यांच्या निधनाने देशाचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे. ते अनेकांचे प्रेरणास्थान होते. भावपूर्ण श्रद्धांजली!#ripmilkhasingh pic.twitter.com/JVcBiLJWGL

— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) June 18, 2021

आठवडाभर उपचारानंतर त्यांना घरीही सोडण्यात आले होते. घरी परतल्यावर त्यांची ऑक्सिजन पातळी खालावली, त्यानंतर त्यांना पीजीआयएमईआर चंदीगडमध्ये दाखल केलं होतं.

काही दिवसांपूर्वी मिल्खा सिंग यांच्या पत्नी निर्मल मिल्खा सिंग यांचे करोनामुळे निधन झाले होते. त्या 85 वर्षांच्या होत्या. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. निर्मल सिंह या पंजाब सरकारमध्ये खेल मार्गदर्शक आणि भारतीय महिला राष्ट्रीय व्हॉलीबॉल संघाच्या माजी कर्णधार होत्या.

Saddened to learn about the demise of legendary athlete, the 'Flying Sikh', Milkha Singh. He created multiple records with his speed and spirit and won laurels for our country. His name will be inscribed in gold in sports history. My heartfelt condolences to his grieving family.

— Sharad Pawar (@PawarSpeaks) June 19, 2021

* फ्लाइंग सिंग यांची कारकीर्द

फ्लाइंग शीख अशी ओळख असलेले मिल्खा सिंग हे भारताचे एकमेव असे धावपटू होते, ज्यांनी 400 मीटरच्या शर्यतीमध्ये आशियाई स्पर्धांसह राष्ट्रकुल स्पर्धांमध्येही (कॉमनवेल्थ) सुवर्ण पदक जिंकलं होतं. 1958 च्या टोकियो इथं झालेल्या आशियाई स्पर्धांमध्ये मिल्खा सिंग यांनी 200 मीटर आणि 400 मीटर शर्यतीत सुवर्ण पदक जिंकलं होतं. तर 1962 च्या जकार्ता आशियाई स्पर्धांमध्ये 400 मीटर आणि 4 बाय 400 मीटर रिले शर्यतीतही सुवर्ण पदक जिंकलं होतं.

काॅमनवेल्थ स्पर्धेत अॅथलेटिक्स मध्ये भारताला पहिले सुवर्ण पदक मिळवून देणारे महान खेळाडू, पद्मश्री सरदार मिल्खासिंग यांचे निधन झाले. त्यांना भावपुर्ण श्रध्दांजली…!
#MilkhaSingh pic.twitter.com/tc11vaZASx

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 19, 2021

1958 मधील कार्डिफ राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये मिल्खा सिंग यांनी 400 मीटर (तेव्हाचे 440 यार्ड) शर्यतीत गोल्ड मेडल मिळवलं होतं. पण त्यांना सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली 1960 च्या रोम ओलिम्पिक स्पर्धेमुळे. त्या स्पर्धेत 400 मीटरच्या शर्यतीत अगदीच सूक्ष्म फरकानं त्यांचं कांस्यपदक चुकलं होतं.

रोम ऑलिम्पिकमध्ये मिल्खा सिंग यांनी 400 मीटर शर्यत 45.73 सेकंदांमध्ये पूर्ण केली होती. जर्मनीचा धावपटू कार्ल कूफमॅनपेक्षा ते सेकंदाच्या 100 व्या भाग एवढ्या कमी फरकानं मागं राहिले होते. पण त्यांनी शर्यत पूर्ण केलेली ही वेळ त्यानंतर पुढचे 40 वर्षं राष्ट्रीय विक्रम म्हणून कायम होती.

https://twitter.com/BratinVeganPFA/status/1405980999566065664?s=19

भारतीय क्रीडा विश्वातील महान नावांपैकी एक असलेल्या मिल्खा सिंग यांच्या निधनानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याबरोबरचा एक फोटो ट्विट केला आहे, त्यात त्यांनी मिल्खा सिंग हे असंख्य भारतीय चाहत्यांच्या मनात कायम राहतील असं म्हटलं आहे.

* महान खेळाडू गमावला- मोदी

भारताचे महान ॲथलिट मिल्खा सिंग यांचं कोरोनामुळं निधन झालं आहे. त्यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दु:ख व्यक्त केले. ‘मिल्खा सिंह यांच्या निधनाने आम्ही एक महान खेळाडू गमावून बसलो. ज्यांनी देशाच्या कल्पनेवर कब्जा केला होता. करोडो भारतीयांच्या हृदयात ज्यांनी हक्काचं स्थान मिळवलं होतं. ते मिल्खा सिंग आपल्यात राहिले नाहीत, त्यांच्या निधनाने मी दुःखी आहे’, असं मोदींनी ट्विट केलं.

करोड़ों युवाओं के प्रेरणास्त्रोत, पद्म श्री #MilkhaSingh जी के निधन से अत्यंत दुखी हूं। उनको मेरी भावभीनी श्रद्धांजलि। फ़्लायिंग सिख की कहानी हमेशा ही खिलाड़ियों को प्रेरित करती रहेगी। ईश्वर दिवंगत आत्मा को शांति प्रदान करे और परिजनों को संबल दे। ॐ शांति।

— Nitin Gadkari (@nitin_gadkari) June 18, 2021

You Might Also Like

राहुल गांधींनी घेतली आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या कुटुंबाची भेट

चीनमध्ये 4.2 रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप

कर्नाटकातील १२ भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या घरांवर लोकायुक्तांनी टाकले छापे

शांतता टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला एकत्र काम करावे लागेल – लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी

जम्मू-काश्मीर: कुपवाडामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

TAGGED: #Sad! #FlyingSikh #PadmaShri #MilkhaSingh #passedaway #Corona, #दुःखद #फ्लाईंगसिंग #पद्मश्री #मिल्खासिंग #निधन
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article WTC फायनल ब्रेकिंग- पहिलं सत्र रद्द, बीसीसीआयची मोठी घोषणा
Next Article मिल्खा सिंग यांच्या निधनाने फरहान अख्तर भावूक

Latest News

बिहार विधानसभा निवडणूक: एनडीएमध्ये जागावाटपाच्या सूत्रात बदलाची शक्यता
राजकारण October 14, 2025
राहुल गांधींनी घेतली आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या कुटुंबाची भेट
देश - विदेश October 14, 2025
चीनमध्ये 4.2 रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप
देश - विदेश October 14, 2025
गडचिरोली : नक्षलवादी नेता ‘भूपती’चे 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण
महाराष्ट्र October 14, 2025
कर्नाटकातील १२ भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या घरांवर लोकायुक्तांनी टाकले छापे
देश - विदेश October 14, 2025
शांतता टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला एकत्र काम करावे लागेल – लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी
देश - विदेश October 14, 2025
धाराशिव जिल्हा परिषद गट आरक्षण जाहीर; ५५ पैकी २८ जागा महिलांसाठी राखीव
महाराष्ट्र October 14, 2025
धाराशिव : कोटक बँकेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात
महाराष्ट्र October 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?