Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: महाराष्ट्रातील मालविका बनसोडकडून सायना नेहवालचा पराभव
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsखेळमहाराष्ट्र

महाराष्ट्रातील मालविका बनसोडकडून सायना नेहवालचा पराभव

Surajya Digital
Last updated: 2022/01/14 at 12:17 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

नवी दिल्ली : स्टार बॅडमिंटनपटू (star badmintan) सायना नेहवाल (Saina Nehwal) इंडिया ओपनमधून बाहेर पडली आहे. दुसऱ्या फेरीत सायनाला २० वर्षीय मालविका बनसोडकडून २१- १७, २१-९ असा पराभव स्वीकारावा लागला. नवी दिल्लीच्या केडी जाधव हॉलमध्ये (KD jadhav hall) ही स्पर्धा सुरू आहे. मालविका २००७ पासून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन सर्किटमध्ये सायना नेहवालला हरवणारी दुसरी खेळाडू बनली. यापूर्वी फक्त पीव्ही सिंधूने (PV sindhu) सायनाला हरवले होते.

नवी दिल्लीच्या केडी जाधव हॉलमध्ये सुरू असलेल्या इंडियन ओपनच्या सामन्यात मालविकाने सायनाचा २१-१७, २१-९ अशा सरळ सेटमध्ये मात केली.
मालविकाने सायनाचा अवघ्या ३५ मिनिटांत पराभव केला. पहिल्या सेटमध्ये सायना ५-७ अशी पिछाडीवर पडली होती. याचा फायदा उचलत मालविकाने सायनाला पुनरागमनाची संधी (opportunities) न देता हा खेळ २१-१७ असा जिंकला. मालविकाने अशीच आक्रमक खेळी सुरू ठेवत दुसऱ्या गेममध्ये सायनाचा २१-९ असा धुव्वा उडवला.

या पराभवामुळे इंडियन ओपन २०२२ स्पर्धेतील सायनाचे आव्हान दुसऱ्या फेरीत संपुष्टात आले. २००७ नंतर स्थानिक किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील सायनाला दुसऱ्यांदाच भारतीय खेळाडूकडून हार मानावी लागली आहे. २०१७ मध्ये तिला याच स्पर्धेत पी.व्ही. सिंधूने पराभूत केले होते. Saina Nehwal defeated by Malvika Bansod from Maharashtra

विजयानंतर मालविकाने दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की, सायनाविरुद्ध झालेला सामना हा खूप चांगला होता. यावेळी मी तिला पहिल्यांदा भेटली आहे. ती नेहमीच माझी आदर्श आहे. हा विजय मला पुढील सामना विजयी होण्यासाठी आत्मविश्वास देईल.

Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

मालविका बनसोड  (Malvika Bansod) ही महाराष्ट्राच्या (maharashtra) नागपूर शहरातील (nagpur city) बॅडमिंटन खेळाडू आहे. तिचा जन्म १५ सप्टेंबर २००१ रोजी झाला असून ती सध्या २० वर्षांची आहे. वयाच्या आठव्या वर्षी तिने बॅडमिंटन खेळण्यास सुरुवात केली. मालविकाने अनेक पुरस्कार जिंकले आहेत. त्यापैकी उल्लेखनीय म्हणजे महाराष्ट्रातील एका  संस्थेतर्फे दिला जाणारा नागभूषण (nag bhushan) पुरस्कार, खेलो इंडिया टॅलेंट (khelo India talent) डेव्हलपमेंट ॲथलीट अवॉर्ड आणि टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम (टीओपीएस) ॲथलीट अवॉर्ड (athletes award) यांचा समावेश आहे.

राज्यस्तरीय स्पर्धेत १३ वर्षांखालील आणि १७ वर्षांखालील वयोगटात विजेतेपदे जिंकली. डिसेंबर २०१८ मध्ये काठमांडू, नेपाळ (Kathmandu, Nepal ) येथे आयोजित दक्षिण आशियाई प्रादेशिक अंडर-२१ स्पर्धेत ती वैयक्तिक आणि सांघिक गटांमध्ये विजेती ठरली. २०१९ मध्ये तिने अखिल भारतीय सिनिअर रँकिंग स्पर्धा आणि अखिल भारतीय ज्युनिअर रँकिंग स्पर्धा जिंकली. डावखुरी खेळाडू असलेली मालविका बनसोड दोन-वेळा ऑलिम्पिक चॅम्पियन आणि पाच-वेळा विश्वविजेता ठरलेला चीनचा बॅडमिंटनपटू लिन डॅन याला आदर्श मानते. २०१९ मालदीव आंतरराष्ट्रीय फ्यूचर सिरीझ बॅडमिंटन स्पर्धा आणि अन्नपूर्णा पोस्ट आंतरराष्ट्रीय मालिका या स्पर्धांंत तिने आंतरराष्ट्रीय विजेतेपदे मिळवली. मालविकाने राष्ट्रीय कनिष्ठ व ज्येष्ठ गट स्पर्धांमध्ये अनेक सुवर्णपदके जिंकली आहेत.

□ पदकांची कमाई; कारकीर्द 

सुवर्ण पदक : मार्च २०२१ युगांडा इंटरनॅशनल

सुवर्ण पदक : २०१९ ची मालदीव आंतरराष्ट्रीय फ्यूचर सिरीज, माले

सुवर्णपदक : २०१९ ची अन्नपूर्णा पोस्ट आंतरराष्ट्रीय मालिका, नेपाळ

कांस्यपदक : २०१९ ची बहरीन आंतरराष्ट्रीय मालिका

कांस्यपदक : २०१९ ची बल्गेरियन ज्युनिअर आंतरराष्ट्रीय स्पर्धा

सुवर्णपदक : २०१८ ची दक्षिण आशियाई प्रादेशिक २१ वर्षांखालील स्पर्धा, काठमांडू, नेपाळ (वैयक्तिक आणि सांघिक स्पर्धा)

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

विराट कोहलीच्या सोशल मीडियावरील पोस्टची क्रिकेट जगतात चर्चा

TAGGED: #SainaNehwal #defeated #MalvikaBansod #Maharashtra, #महाराष्ट्र #मालविकाबनसोड #सायनानेहवाल #पराभव
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article भाजपला मोठा झटका, राष्ट्रवादीचे सिद्धार्थ कांबळे मुंबै बँकेचे नवे अध्यक्ष
Next Article सुट्टी जाहीर : 18 जानेवारी रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका

Latest News

Стратегия торговли: Ретесты
Top News November 28, 2025
तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?