Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: 205 वर्षाची परंपरा : साक्षात श्री विठ्ठल भेटीस निघाले संत सावता माळींच्या भेटीला
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

205 वर्षाची परंपरा : साक्षात श्री विठ्ठल भेटीस निघाले संत सावता माळींच्या भेटीला

Surajya Digital
Last updated: 2022/07/24 at 9:18 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

पंढरपूर :– कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी असे म्हणत शेतामध्ये विठ्ठल पाहिलेल्या संत सावतामाळींच्या भेटीला आज साक्षात परमात्मा विठ्ठल अरणकडे निघाले. आषाढीच्या सोहळ्यानंतर विठ्ठलाच्या पादुका प्रतिवर्षी माढा तालुक्यातील अरण या ठिकाणी परंपरेप्रमाणे जातात. या सोहळ्याला 205 वर्षाची परंपरा आहे. 205 year old tradition: Pandharpur Aran, Saint Sawta Mali who went to meet Shri Vitthal

 

आषाढ शुद्ध एकादशीला संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज आदी प्रमुख मानाच्या संतांच्या पालख्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पंढरपुरात येतात. यावेळी पंढरीच्या चंद्रभागेच्या तीरावर टाळावृदंगाच्या गजरात एकादशीचा अनुपम्य सोहळा घडतो. मात्र या सोहळ्याला पंढरपूर पासून नजीकच असणारे संत सावतामाळी कधीच हजर राहिले नाहीत. त्यांनी शेतीमध्ये आणि आपल्या पिकांमध्ये विठ्ठलाला पाहिले. आणि तेथेच ते शेती करत राहिले.

 

यामुळे आषाढ महिन्यातीलच वद्य एकादशीनंतर साक्षात श्री विठ्ठल भगवान सावता माळींच्या भेटीला गेले असल्याची आख्यायिका रुढ आहे. याप्रमाणे प्रतिवर्षी येथील काशीकापडी समाजाच्या मठातून पांडुरंगाच्या तालुका विठ्ठल मंदिरामध्ये जातात. यानंतर नगरपदक्षणा होते. आणि अरणकडे या पादुका मृदंगाच्या गजरात दिंडीने प्रस्थान करतात.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

 

आषाढी एकादशीच्या अगोदर संताच्या पालख्या पंढरपूरकडे प्रस्थान होतात. परंतु अपवाद फक्त संत शिरोमणी सावता माळी यांची पालखी येत नाही तर आषाढी वारी झाल्यावर पांडुरंगाची पालखी अरण येथे संत सावता माळी यांच्या हे विशेष म्हणावे लागेल. आज सकाळी काशी कापडी समाजाच्या मठातून हजारो भाविक भक्तांच्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत फुलांनी सजविलेल्या पालखीत पादुका ठेवून प्रस्थान करण्यात आले.

 

विठ्ठल मंदिरातुन मानकऱ्यांनी पादुका डोक्यावर घेऊन, विधिवत पूजा करण्यात आली. या पादुकांमध्ये विठलाचा वास येतो असे सांगितले जाते. यानंतर पादुका पालखीत ठेवून अरण कडे प्रस्थान झाले. तीन दिवसानंतर विठ्ठलाची पालखी तिथे पोहोचून संत सावता माळी यांच्या पुण्यतिथी सोहळ्यास उपस्थित राहून काल्याचा कार्यक्रम झाल्यानंतर पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होते.

 

तीन दिवसानंतर विठ्ठलाची पालखी तिथे पोहोचल्यावर संत सावता माळी यांच्या पुण्यतिथी सोहळा साजरा केला जातो. अमावस्ये दिवशी काल्याचा कार्यक्रम झाल्यानंतर पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होते.

 

यावेळी सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे, पंढरपूर काशी कापडी समाजाचे मानकरी नागेश गंगेकर, अरण ट्रस्टचे सचिव ऍड.विजय शिंदे, सावता परिषदेचे मुख्य प्रदेश संघटक संतोष राजगुरू, प्रदेश संघटक साधना राऊत, सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब माळी, माढा तालुकाध्यक्ष डॉ.भारत कुबेर, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष सयाजी बनसोडे, सावता जाधव आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

You Might Also Like

राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्दे राजकीय पक्ष व हितसंबंधांच्या पलीकडील – उपराष्ट्रपती

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणात 50 टक्के पाणीसाठा

सोलापूर-दिल्ली विमानसेवा नोव्हेंबरपासून सुरू होणार

मोहोळ तालुक्‍यातील लांबोटी येथे पोलिसांच्या चकमकीत सराईत गुन्हेगार ठार

सोलापूर – गाडीतून पडून भाजीपाला विक्रेत्याचा दुदैवी मृत्यू

TAGGED: #205yearold #tradition #Pandharpur #Aran #Saint #SawtaMali #went #meet #ShriVitthal, #205वर्षाची #परंपरा #साक्षात #श्रीविठ्ठल #भेटीस #संतसावतामाळी #भेटीला #पंढरपूर #अरण
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article हगलूर शिवारातील डान्सबारवर धाड, सहा बारबालासह 28 जणांवर कारवाई, चौदा लाखांचा मुद्देमाल जप्त
Next Article अक्कलकोट एसटी अपघात 35 पेक्षा अधिक जखमी, सहाजणांना फ्रॅक्चर

Latest News

पालखी सोहळ्यासाठी ३५०० पोलिसांचा बंदोबस्त, साध्या आणि वारकऱ्यांच्या वेशातही पोलीस
महाराष्ट्र June 18, 2025
काश्मीर मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी स्वीकारली जाणार नाही – पंतप्रधान मोदी
देश - विदेश June 18, 2025
वारकरी भक्तीयोग’कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता सर्वांनी पुढाकार घ्यावा – चंद्रकांतदादा पाटील
Top News June 18, 2025
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, इराणकडून इस्राइल विरोधात युद्धाची घोषणा
देश - विदेश June 18, 2025
‘जारण’ ने १२ दिवसांत कमावले ३.५ कोटी
महाराष्ट्र June 18, 2025
कोणताही देश दहशतवादाला पाठिंबा देत असेल तर त्याला त्याची किंमत मोजावी लागेल – पंतप्रधान मोदी
देश - विदेश June 18, 2025
भारत-कॅनडा करणार उच्चायुक्तांची पुनर्स्थापना
देश - विदेश June 18, 2025
ट्रम्प यांच्या पोस्टमुळे तेहरानमध्ये भीतीचं वातावरण, लोकांनी सोडले शहर
देश - विदेश June 18, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?