Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सकाळचे मुख्य शहर बातमीदार विजयकुमार सोनवणे यांचे निधन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

सकाळचे मुख्य शहर बातमीदार विजयकुमार सोनवणे यांचे निधन

Surajya Digital
Last updated: 2020/07/21 at 11:06 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर : सोलापूर सकाळचे मुख्य शहर बातमीदार विजयकुमार सुरेश सोनवणे (वय 47) यांचे रविवारी राञी निधन झाले. फुप्फुसाचा संसर्ग झाल्याने त्यांच्यावर सोलापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार सोनवणे यांच्यावर आज सोमवारी सकाळी रूपा भवानी जवळील स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार झाले. त्यांची अंत्ययात्रा सकाळी आठ वाजता राहत्या घरापासून (सूर्यकांत निवास, शरदचंद्र पवार महाविद्यालयासमोर, उमानगरी) निघाली. यावेळी विविध स्तरातील लोकांची उपस्थिती होती. माजी महापौर मनोहर सपाटे, आरिफ शेख, वंचित बहुजन आघाडीचे आनंद चंदनशिवे, माजी उपायुक्त अनिल विपत, शिवसेनेचे विजय पुकाळे, महापालिकेकडून कोविड सनियंञण अधिकारी धनराज पांडे, सामाजिक कार्यकर्ते आनंद गोसंकी, ज्येष्ठ पञकार अविनाश कुलकर्णी, शिवाजी सुरवसे, प्रशांत कटारे, किरण बनसोडे, परशुराम कोकणेसह सर्व पञकार बांधवांची उपस्थिती होती.

सोलापुरातील दैनिक विश्‍वसमाचार मधून त्यांनी पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळच्या सोलापूर आवृत्तीत ते सन 2000 पासून कार्यरत होते. नगरविकास, महापालिका प्रशासन, राजकारण, शहरी भागाचे प्रश्‍न, सर्वसामान्य व हातावर पोट असणाऱ्या कामगारांच्या प्रश्‍नावर त्यांचा गाढा अभ्यास होता. सोलापूरला स्मार्ट सिटीचा दर्जा मिळावा यासाठी त्यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. राज्य शासनाच्या “राजमाता जिजाऊ स्वावलंबन जिल्हास्तरीय उत्कृष्ट पुरस्काराने 2007 मध्ये त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

सोलापूर प्रेस क्‍लबचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी कामकाज पाहिले आहे. पत्रकारितेतील उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना सोलापूर महापालिकेच्यावतीने आदर्श पत्रकार म्हणूनही सन्मानित करण्यात आले आहे. विविध संस्था व संघटनांनी त्यांच्या पत्रकारितेची दखल घेऊन त्यांना आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण सोलापुरातील दयानंद कला महाविद्यालयात झाले आहे. त्यांच्या पश्‍चात एक भाऊ, दोन बहिणी, पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे.

“सकाळचे ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार सोनवणे यांच्यामुळे एक सच्चा प्रामाणिक पत्रकार हरपला आहे. अभ्यासू, सरळ आणि सच्चा पत्रकार आपल्यातून निघून गेला. ही अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद घटना आहे.”
– सुशीलकुमार शिंदे, माजी केंद्रीय गृहमंत्री

You Might Also Like

सोलापूरच्या घटनेबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

सोलापूर : पर्समधील दहा तोळ्यांचे दागिने केले लंपास

रामराजेंच्या घरी अचानक धडकला पोलिसांचा फौजफाटा उडाली खळबळ, पुढे काय झाले?

सरकारने शाळांवर उगारली कारवाईची छडी, पण कारण तरी काय?

सोलापुरातील साठ हजार नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा

TAGGED: #सकाळ #मुख्यबातमीदार #निधन #विजयकुमारसोनवणे #सुशीलकुमारशिंदे #sakal
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मोरणा नदीत आढळला मृत बिबट्या; क्रोनिक न्यूमोनियामुळे बिबट्याचा मृत्यू
Next Article भंडाऱ्याच्या उधळणीने पिवळी होणारी सोन्याची जेजुरी यंदा मात्र कोरोनामुळे शांत; माञ केले परंपरेचे पालन

Latest News

पाकिस्तान स्वर्ण मंदिराला लक्ष्य करणार होता
देश - विदेश May 19, 2025
संभलच्या जामा मशिदीचे पुन्हा सर्वेक्षण होणार
देश - विदेश May 19, 2025
विजय शहांचा माफीनामा फेटाळला, अटकेला स्थगिती
देश - विदेश May 19, 2025
महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायमूर्ती गवई झाले नाराज
देश - विदेश May 19, 2025
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या त्यांच्या आजाराबद्दल पंतप्रधान मोदींनी दिला धीर
देश - विदेश May 19, 2025
विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर लागली आग; जीवितहानी नाही
महाराष्ट्र May 19, 2025
सोलापूरच्या घटनेबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
सोलापूर May 19, 2025
अफगाणिस्तानात ४.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप
देश - विदेश May 19, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?