Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: व्याजाच्या रकमेसाठी तरुणावर जीवघेणा हल्ला; राष्ट्रवादीच्या नगरसेवकांसह पाच जणांवर गुन्हा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूरगुन्हेगारी

व्याजाच्या रकमेसाठी तरुणावर जीवघेणा हल्ला; राष्ट्रवादीच्या नगरसेवकांसह पाच जणांवर गुन्हा

Surajya Digital
Last updated: 2020/08/18 at 9:40 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर : कर्ज घेतलेली रक्कम आणि व्याजाचे मिळून दोन लाखांची मागणी करत तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध सलगर वस्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास अण्णासाहेब पाटील शाळेजवळ घडली. यातील गुन्हा दाखल झालेला एक सावकार राष्ट्रवादीचा नगरसेवक आहे.

यात सावकार नगरसेवक किसन जाधवसह तन्मेश गायकवाड, तेजस गायकवाड, प्रेम नागेश गायकवाड, शुभम मरगु गायकवाड (सर्व रा. सोलापूर ) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. प्रवीण सिद्राम जाधव (वय-20 रा, न्यू हायस्कूल शाळेजवळ सलगरवाडी, सोलापूर) याने सहा महिन्यांपूर्वी कपडे विक्रीच्या व्यवसायाकरिता किसन जाधव याच्याकडून 50 हजार रुपये दहा टक्के प्रतिमहिना व्याजदराने घेतले होते.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

परंतु लॉकडाऊनमुळे कपड्याचा व्यवसाय न झाल्याने घेतलेली रक्कम देता आली नाही. त्यावेळी किसन जाधव याने प्रवीण यांच्याकडे जाऊन कर्ज घेतलेले 50 हजार रुपये व त्यावरील व्याज असे मिळून दोन लाखांची मागणी केली. दरम्यान प्रवीण यांनी किसन जाधव यांना साडीचा व्यवसाय बंद असल्याने पैसे नसल्याचे सांगत नंतर देण्याचे कबूल केले.

त्यावेळी किसन जाधव यांनी प्रवीण यांना मी काय करू, तुला माहित आहे ना, मी कोण आहे ते अस म्हणत दमदाटी केली. त्यानंतर प्रवीण आणि त्यांचा मित्र हे अण्णासाहेब पाटील शाळेजवळून रिक्षात बसून जात असताना किसन जाधव याने त्यांना पैसे मागण्याचा पुन्हा तगादा लावत तन्मेश गायकवाड, तेजस गायकवाड, प्रेम नागेश गायकवाड, शुभम मरगु गायकवाड यांना सोबत घेत लोखंडी रॉड, हॉकी स्टिक व बॅटने मारहाण करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. याबाबत प्रवीण जाधव यांनी सलगर वस्ती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तपास स.पो. नि. भुसनुर करीत आहेत.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #व्याजाचेपैसे #सलगरवस्ती #पोलीस #राष्ट्रवादी #नगरसेवक
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article साडेबारा लाखाचा गुटखा पकडून तीनजणांवर गुन्हा दाखल; गुन्हे शाखेची कामगिरी
Next Article फरार स्वयंभू बाबा नित्यानंदने केली घोषणा; गणेश चतुर्थीला ‘रिझर्व्ह बँक ऑफ कैलास’ची करणार स्थापना

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?