Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: समृद्धी महामार्गावरील अपघातात १२ जणांचा मृत्यू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

समृद्धी महामार्गावरील अपघातात १२ जणांचा मृत्यू

Surajya Digital
Last updated: 2023/10/15 at 1:15 PM
Surajya Digital
Share
5 Min Read
SHARE

○ ७२९ अपघात, १०१ जणांचा मृत्यू, शरद पवारांकडून ट्विट

संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. मध्यरात्री छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर येथील जांबरगाव टोल नाक्याजवळ खासगी बस आणि ट्रक यांच्यात धडक बसल्याने दुर्घटना घडली असून यामध्ये १२ जणांचा मृत्यू झाला आहे. Sambhajinagar Sharad Pawar Tweet Nashik 12 killed in accident on Samriddhi Highway  तर अनेकजण जखमी आहेत. जवळपास १७ जखमींवर घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सर्व प्रवासी नाशिक जिल्ह्यातील आहेत. ते बुलढाणा जिल्ह्यात सैलानी बाबा दर्ग्याच्या दर्शनासाठी गेले होते. यात काही लहान बालकांचा देखील समावेश आहे.

Contents
○ ७२९ अपघात, १०१ जणांचा मृत्यू, शरद पवारांकडून ट्विटस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

छत्रपती संभाजीनगर-समृद्धी महामार्गावर रात्री झालेल्या भयंकर अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला. यात 5 पुरुष, 1 मुलगी व 6 महिलांचा समावेश आहे. हे सर्व नाशिकचे रहिवासी होते. ते बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबा दर्ग्याचे दर्शन करून परत जात होते. 23 जण जखमी असून त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यातील काहींची प्रकृती गंभीर आहे. जांबरगाव टोलनाक्याजवळ ट्रॅव्हल्सने उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली.

सैलानी येथील दर्गाला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला हा अपघात झाला असल्याचे कळत आहे. समृद्धी महामार्गाच्या वैजापूर येथील जांबरगाव टोल नाक्याजवळ ही घटना घडली आहे. सध्या घटनास्थळी स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचाव कार्य सुरू आहे. रात्री एक ते दीड वाजेच्या दरम्यान हा अपघात झाला आहे. काही लहान मुलांचा देखील समावेश असल्याचं समोर आलं आहे. तसेच काही महिला देखील या अपघातात मृत्यू झाल्याचं समोर आले आहे. तर सर्व जखमी अपघातग्रस्तांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तनुश्री लखन सोळसे ( वय 5 वर्षे, रा. समतानगर,नाशिक), संगीता विलास आठवले (वय 40 वर्षे,वणसगाव, निफाड,नाशिक), अंजाबाई रमेश जगताप (वय 38 वर्षे, रा. राजूनगर नाशिक), रतन जमधडे (वय 45 वर्षे, संत कबीर नगर नाशिक), काजल लखन सोळसे (वय 32 वर्षे, गवळाणी नाशिक), रजनी गौतम तपासे (वय 32 वर्षे, गवळाणी नाशिक), हौसाबाई आनंदा शिरसाट (वय 30 वर्ष, उजगाव निफाड, नाशिक), झुंबर काशिनाथ गांगुर्डे (वय 50 वर्षे, रा. राजूनगर नाशिक), अमोल झुंबर गांगुर्डे (वय 18 वर्षे), सारिका झुंबर गांगुर्डे (वय 40 वर्षे), मिलिंद पगारे (वय 50 वर्षे, कोकणगाव ओझर, निफाड, नाशिक), दीपक प्रभाकर केकाणे (वय 47 वर्षे, रा. बसमत पिपळगाव नाशिक) अशी मृतांची नावे आहेत. सर्वजण झोपेत होतो. अचानक काय घडले कळलेच नाही आणि जेव्हा डोळे उघडले तेव्हा रुग्णालयात होतो, अशा शब्दात समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातात जखमी झालेले अनिल साबळे यांनी आपली भावना व्यक्त केली.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 


छत्रपती संभाजीनगरच्या समृद्धी महामार्गावरील जांबरगाव टोलनाक्याजवळ एका ट्रॅव्हल्स बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, अपघातात दहा ते बारा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ट्रॅव्हल्स बसमधील प्रवासी बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबा येथील दर्ग्याचे दर्शन घेऊन परत जात असतांना त्यांच्या वाहनाचा अपघात झाला आहे. ट्रॅव्हल्स बसने ट्रकला मागून जोरात धडक दिल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. धक्कादायक म्हणजे अपघातात मृत व्यक्तींमध्ये काही लहान मुलांचा देखील समावेश आहे. हे सर्व भाविक नाशिक जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर येत आहे.

समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. ट्रॅव्हल्स बसमधील सर्व प्रवासी नाशिक जिल्ह्यातील आहे. या ट्रॅव्हल्स बसमध्ये एकूण 30 प्रवासी होते. हे सर्वजण बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबा दर्गाचे दर्शन करून पुन्हा नाशिककडे परत निघाले होते. ज्यात काही लहान मुलांचा देखील समावेश होता. तर, अपघातात 10 ते 12 जणांचा मुत्यु झाला असून, ज्यात लहान मुलांचा देखील समावेश आहे. तसेच काही महिला देखील आहेत.

समृद्धी महामार्गावर संभाजीनगरच्या वैजापूर येथे काल (शनिवारी) मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात 12 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या अपघातात मृत्यू पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. महामार्गावरील सुरक्षेला प्राधान्य देऊन प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्याच्या दृष्टीने शासनाने योग्य ती पावले उचलली पाहिजेत, असा सल्ला पवारांनी सरकारला दिला आहे. ‘समृद्धी’वरील अपघातातील मृत्यू झालेल्या प्रवाशांची आकडेवारीच पवारांनी सांगितली आहे.

“समृद्धी महामार्गावर आजवर एकूण ७२९ अपघात झाले आहेत. यात २६२ गंभीर स्वरूपाचे अपघात झाले आहेत, तर ४७ अपघातांच्या घटनेत आजवर १०१ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. यातून या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे,” असे टि्वट शरद पवारांनी केले आहे.

वैजापूर तालुक्यातील जांबरगाव टोल नाक्याजवळ झालेला भीषण अपघात अत्यंत दुर्दैवी आहे. या अपघातात मृत्यू पावलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. या अपघातात जखमी झालेल्या नागरिकांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, हीच प्रार्थना,’ असे टि्वट त्यांनी केलं आहे.

You Might Also Like

मरीन ड्राईव्ह येथे तरुणीचा मृतदेह सापडला; तपास सुरू

अकोल्यामध्ये रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शिवसंग्रामचे रास्ता रोको आंदोलन

मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस; गणेशोत्सवावर मेघांची सावट

प्ले ग्रुप, नर्सरीवर सरकारची राहणार विशेष नजर

आमदार अमित साटम मुंबई भाजपचे नवे अध्यक्षपदी

TAGGED: #Sambhajinagar #SharadPawar #Tweet #Nashik #12killed #accident #SamriddhiHighway, #समृद्धी #महामार्ग #अपघात #१२जण #मृत्यू #101मृत्यू #शरदपवार #ट्विट
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article INDvsPAK- अमित शाह मैदानात; भारताने पाकिस्तानला चारली धूळ
Next Article राष्ट्रपतींच्या हस्ते सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार अल्लू अर्जुनला, अलियाने पटकावले पाच पुरस्कार 

Latest News

मरीन ड्राईव्ह येथे तरुणीचा मृतदेह सापडला; तपास सुरू
महाराष्ट्र August 25, 2025
अकोल्यामध्ये रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शिवसंग्रामचे रास्ता रोको आंदोलन
महाराष्ट्र August 25, 2025
पंतप्रधान मोदी-फिजी पंतप्रधान राबुका यांची चर्चा; सात करारांवर स्वाक्षऱ्या
देश - विदेश August 25, 2025
देशात मुसळधार पावसाचा कहर; राजस्थानसह अनेक राज्यांमध्ये जनजीवन विस्कळीत
देश - विदेश August 25, 2025
मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस; गणेशोत्सवावर मेघांची सावट
महाराष्ट्र August 25, 2025
प्ले ग्रुप, नर्सरीवर सरकारची राहणार विशेष नजर
महाराष्ट्र August 25, 2025
आमदार अमित साटम मुंबई भाजपचे नवे अध्यक्षपदी
महाराष्ट्र August 25, 2025
अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचे लखनऊमध्ये भव्य स्वागत
देश - विदेश August 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?