Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मोहोळ पंचायत समिती समोर हलगीनाद आंदोलन; सोलापुरात युवा खेळाडूचा मृत्यू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

मोहोळ पंचायत समिती समोर हलगीनाद आंदोलन; सोलापुरात युवा खेळाडूचा मृत्यू

Surajya Digital
Last updated: 2022/06/03 at 10:01 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मोहोळ : मोहोळ तालुका पंचायत समितीच्या आवारामध्ये बचत गटांच्या उत्पादित वस्तूंच्या विक्रीसाठी बांधण्यात आलेले गाळे ज्या प्रयोजनासाठी  दिलेले आहेत, त्यासाठी ते गाळे न वापरता झेरॉक्स व इतर उद्योगासाठी वापर करत असल्याने सदरचे गाळे बचत गटांना देण्यात यावे, व बेकायदेशीरपणे गाळे वापरणा-यांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी नागेश बिराजदार यांनी मोहोळ पंचायत समिती समोर हलगीनाद आंदोलन केले. Halginad agitation in front of Mohol Panchayat Samiti; Death of a young player in Solapur

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…□ युवा कबड्डीपटूचा दुर्दैवी मृत्यू

याबाबत आंदोलनकर्ते नागेश बिराजदार यांनी गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मोहोळ तालुका पंचायत समितीच्या आवारात बचत गटांच्या उत्पादित वस्तूंच्या विक्रीसाठी गाळे बांधण्यात आलेले आहेत, मात्र सदर गाळ्यांवर अतिक्रमण करून त्या ठिकाणी झेरॉक्स व इतर उद्योग करण्यात येत आहेत. तरी या संदर्भात योग्य ती कारवाई करून येथील अतिक्रमण काढून सदरचे गाळे बचत गटांना देण्यात यावे. या मागणीसाठी आज शुक्रवारी ( दि.३ जून) पंचायत समिती समोर आंदोलनकर्ते नागेश बिराजदार यांनी हलगी नाद आंदोलन केले.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

 

यावेळी राहुल तावसकर, संगीता पवार, मंगेश पांढरे, अनिता बळवंतराव, सुरज तलफदार, गोरख सरवदे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

याबाबत नुकताच पदभार घेतलेले पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आनंदकुमार मिरगणे यांनी सांगितले की, सदर गाळ्यांबाबत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संबंधित गाळेधारकांना नोटीस बजावण्यात आली असून याबाबत चौकशी समिती नेमून त्याने दिलेल्या अहवालानुसार पुढील योग्य ती कारवाई संबंधितांवर करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

 

□ युवा कबड्डीपटूचा दुर्दैवी मृत्यू

सोलापूर : रात्री नळाला आलेले पाणी भरत असताना विजेचा धक्का बसून सोलापुरात एका युवा कबड्डीपटूचा दुर्दैवी मृत्यू झाला.

भीमाशंकर हनमंतू जगले (वय २०, रा. धोंडिबा वस्ती) असे या कबड्डीपटूचाचे नाव आहे. ही घटना रामवाडी परिसरात घडली. बुधवारी (ता. 1) रात्री १० वाजता ही घटना घडली. बुधवारी रात्री रामवाडी परिसरात नळाला पाणी आले होते.

पाणी भरण्यापूर्वी त्याने विद्युत भीमाशंकर मोटार चालू केली. पाईपद्वारे पाणी भरत असताना अचानक विजेचा धक्का बसला आणि भीमाशंकरचा जागीच मृत्यू झाला. तो आई वडिलांना एकुलता एक मुलगा होता. तो कबड्डीपटू म्हणून ओळखला जात होता.

 

You Might Also Like

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर

भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

TAGGED: #Halginad #agitation #front #Mohol #Panchayat #Samiti #Death #young #player #Solapur, #मोहोळ #पंचायत #समिती #हलगीनाद #आंदोलन #बचतगट #सोलापूर #युवा #खेळाडू #मृत्यू
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article Hardik Patel हार्दिक पटेल ‘पावन’ झाला ! इतक्या पायघड्या घातल्या की, तो पोलिटिकल हिरो बनला…
Next Article EPF interest पीएफ – व्याजदरात घट; कर्मचाऱ्यांना मोदी सरकारचा मोठा झटका

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?