Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पंढरपुरात रोखली ऊसतोड; संघर्ष समितीची ‘गांधीगिरी’
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsशिवारसोलापूर

पंढरपुरात रोखली ऊसतोड; संघर्ष समितीची ‘गांधीगिरी’

Surajya Digital
Last updated: 2022/10/25 at 10:22 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ विठ्ठल सहकारी साखर कारखाना दोन वर्षांनंतर सुरु□ शेतकऱ्यांसाठी खूशखबर, सरकारी योजनांचा लाभ घेणं होणार सोपं

□ दर जाहीर केल्याशिवाय ऊस तोडणी घेवू नका; हार घालून पायाही पडले

पंढरपूर : ऊस कारखानदारानी दर जाहीर केल्याशिवाय ऊस तोडणी घेवू नका, अशी विनंती करीत हार घालून पायाही पडले जात आहे. ऊसदर संघर्ष समितीने गांधीगिरी करत पंढरपुरात ऊसतोड रोखून गांधीगिरी आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे. Pandharpur Rokhli Ustod; Sangharsh Samitichi ‘Gandhigiri’ Usdar Movement Sugar Factory

 

यावर्षीच्या हंगामात ऊसाला एकरकमी पहिली उचल अडीच हजार रुपये जाहीर करावी. या मागणीसाठी सोलापूर जिल्ह्यातील ऊसदर संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी ‘जो पर्यंत ऊस दर जाहीर केला जात नाही तो पर्यंत तोडणी थांबवा’ यासाठी ऊस मालक, तोडणी कामगार व वाहतुकदारांचा ऊसाच्या फडात जावून हार घालून अक्षरशः पाया पडून विनंती करीत गांधीगिरी करीत आंदोलनास सुरुवात केली. आज दुपारी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी पंढरपूर तालुक्यातील तुंगत परिसरात सुरु असलेल्या ऊसतोड रोखल्या आहेत. दरम्यान ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर मालकांनाही सबुरीचा सल्ला देत ऊस वाहतूक करू नये; असे आवाहन केले आहे.

 

सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरु झाला आहे. परंतु जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी अद्याप ऊसाची पहिली उचल जाहीर केली नाही. यावर्षीच्या हंगामात ऊसाला पहिली उचल अडीच हजार रुपये आणि अंतिम भाव 3 हजार 100 रुपये द्यावा; अशी प्रमुख मागणी ऊसदर संघर्ष समितीने केली आहे.

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

□ आंदोलन पेटण्याची चिन्ह

पंढरपूर येथे दोन दिवसांपूर्वी ऊस परिषदेत देखील हीच मागणी केली आहे. दोन दिवसात पहिली उचल अडीच हजार रुपये जाहीर करा अन्यथा ऊस तोडी बंद पाडू असा इशारा परिषदेने दिला होता. त्यानुसार आज संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी पंढरपूर तालुक्यातील ऊस तोड बंद पाडून ऊसदर आंदोलन सुरु केले आहे. ऊसदराच्या मागणीवरुन सोलापूर जिल्ह्यात आंदोलन आणखी पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

 

□ ऊस वाहतूक करू नका

 

उसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर मालकांना देखील आज सबुरीने सांगत उसाची वाहतूक करू नका असे आवाहन करण्यात आले आहे. ऊस दर संघर्ष समितीच्या वतीने पंढरपूर येथे उसाची पहिली उचल जाहीर झाली नसतानाही ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर मालकांना हात जोडून, फुलाचा हार घालून, पाया पडून विनंती करण्यात येत आहे.

 

शेतकऱ्यांना ऊस शेती परवडत नाही, शेतकऱ्याच्या घामाला दाम मिळवून देण्यासाठी ऊस दर संघर्ष समितीने आंदोलनाची हाक दिली आहे, अनेक वेळा विनंती करूनही ट्रॅक्टर मालक ऐकायला तयार नाहीत. त्यामुळे आज पंढरपूर येथे गांधीगिरीने या ऊस तोडणी कामगार, ऊस मालक व ट्रॅक्टर मालकांना हार घालून विनंती करण्यात येत आहे, असे ऊसदर संघर्ष समितीच्या वतीने सांगण्यात आले.

 

□ विठ्ठल सहकारी साखर कारखाना दोन वर्षांनंतर सुरु

 

पंढरपूर तालुक्याचे अर्थकारणाचा कणा असलेला विठ्ठल सहकारी साखर कारखाना तब्बल दोन वर्षांनी पुन्हा एकदा सुरू करण्यात चेअरमन अभिजीत पाटील यांच्यासह संचालक मंडळाला यश आले असून तालुक्यातील शेतकरी वर्गाला त्यामुळे आनंद झाला आहे. दिगवंत आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर बंद असलेला कारखाना सुरू करण्यात नविन संचालक मंडळाला यश आल्याने पंढरपूर तालुक्याचे अर्थकारण सुरळीत होणार आहे.

 

 

□ शेतकऱ्यांसाठी खूशखबर, सरकारी योजनांचा लाभ घेणं होणार सोपं

 

देशातील शेतकऱ्यांना विशेष ओळखपत्र (unique ID) देण्याच्या प्रक्रियेत मोदी सरकार सातत्याने काम करत आहे. आतापर्यंत 11.5 कोटी शेतकऱ्यांपैकी 5.5 कोटी शेतकऱ्यांचा डेटाबेस तयार करण्यात आला आहे. त्यांना 12 अंकी ओळखपत्र दिले जाणार आहे. यामुळे विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणीशिवाय मिळू शकणार आहे. त्यांना कोणत्याही मध्यस्थाची गरज भासणार नाही.

You Might Also Like

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

सोलापूरचे महापालिका उपायुक्त लोकरेंना आ. देशमुख यांनी झापले

संजय राऊतांनाही गुवाहटीला यायचे होते; शहाजीबापूंचा मोठा गौप्यस्फोट

सोलापूर – करमाळ्यात कुंटणखाण्यावर छापा

TAGGED: #Pandharpur #Rokhli #Ustod #Sangharsh #Samiti #Gandhigiri #Usdar #Movement #SugarFactory, #पंढरपूर #ऊसतोड #ऊसदर #संघर्षसमिती #गांधीगिरी #शेतकरी #आंदोलन #साखरकारखाना
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर झेडपीच्या समाजकल्याणचे ग्रहण सुटले, मिळाला नवीन अधिकारी
Next Article दीपसुराज्य उजळत राहो; ‘३६०° सोलापूर’ आणि ‘दीपसुराज्य’ला सोलापूरची चांगलीच दाद

Latest News

इस्रायलने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याने ट्रम्प प्रचंड नाराज
देश - विदेश June 24, 2025
शिवभोजन थाळीचे सहा महिन्यांपासून अनुदान थकले; केंद्र चालविणे झाले कठीण
महाराष्ट्र June 24, 2025
फडणवीसांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदार वाढले- राहुल गांधी
राजकारण June 24, 2025
महाराष्ट्र विधिमंडळाचा इतिहास प्रेरणादायी – राज्यपाल
महाराष्ट्र June 24, 2025
नीरज चोप्रा ऑस्ट्रावा गोल्डन स्पाइक स्पर्धेत विजयासाठी प्रमुख दावेदार
देश - विदेश June 24, 2025
दाक्षिणात्य अभिनेता श्रीकांतला अंमली पदार्थ प्रकरणी अटक
देश - विदेश June 24, 2025
भारतीयांचे रक्त सांडणाऱ्यांना माफ केले जाणार नाही – पंतप्रधान मोदी
देश - विदेश June 24, 2025
crime
सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक
सोलापूर June 24, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?