Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: गझवा-ए-हिंद’चे षडयंत्र उद्ध्वस्त करणारे सनातन राष्ट्र !
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

गझवा-ए-हिंद’चे षडयंत्र उद्ध्वस्त करणारे सनातन राष्ट्र !

admin
Last updated: 2025/05/14 at 4:23 PM
admin
Share
9 Min Read
SHARE

प्रस्तावना

भारत आज विकासाच्या, विज्ञान-तंत्रज्ञानाच्या आणि जागतिक सहकार्याच्या दिशेने वाटचाल करत असतानाच, त्याच वेळी एक अंतर्गत धोका दिवसेंदिवस गडद होत आहे, तो म्हणजे ‘गझवा-ए-हिंद’चा धोका ! ‘गझवा-ए-हिंद’ म्हणजे भारतात जिहादी राष्ट्र स्थापनेच्या दिशेने उचललेली कट्टरपंथीय पावले ! ही फक्त कल्पना नाही, तर प्रत्यक्षात अमलात आणण्याचे कट रचले जात आहेत. सध्या मोठ्या प्रमाणात चालू असलेला लव्ह जिहाद, भूमी जिहाद, हलाल जिहाद हे याच ‘गझवा-ए-हिंद’चे छोटे स्वरूप आहे. आयसिस (ISIS), अल कायदा, अन्सार-उल-इस्लाम, पीएफआय यांसारख्या संघटना सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांमध्ये विष पेरत आहेत.

त्यांचे स्थानिक समर्थन करणारे ‘स्लीपर सेल्स’ भारतात हळूहळू पाळेमुळे रोवू पाहत आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालांनुसार, भारतातील अनेक ठिकाणी, विशेषतः केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये इसिसशी संबंधित आतंकवादी कारवाया उघडकीस आल्या आहेत. शिक्षित तरुणांना लक्ष्य करून त्यांच्या विचारसरणीचा वापर करून त्यांना जिहादच्या मार्गावर नेले जात आहे. यामागे केवळ हिंसाचार नाही, तर भारतात ‘खिलाफत’ प्रस्थापित करण्याचा दुष्ट हेतू आहे. या पार्श्वभूमीवर हिंदूंनी आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे – आपण निधर्मी राष्ट्रात सुरक्षित आहोत का? त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने उभ्या राहिलेल्या हिंदवी स्वराज्याच्या पावलांवर पाऊल ठेवून, आता भारताला पुन्हा एकदा सनातन राष्ट्र, हिंदू राष्ट्र, रामराज्य बनवण्यासाठी सज्ज व्हावे लागेल. कारण ही हिंदूंच्या अस्तित्वाची, सनातन संस्कृतीच्या पुनरुत्थानाची लढाई आहे. ‘गझवा-ए-हिंद’ला ‘सनातन राष्ट्र’ हेच एकमेव उत्तर आहे’, हे हिंदूंच्या मनावर अंकित करावे लागेल.

आतंकवादाला धर्म असतो याची प्रचिती !

नुकताच पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. कलम ३७० हटवल्यानंतरही दहशतवादी हल्ले चालूच आहेत. आज पुन्हा काश्मीरमध्ये हिंदू मारले गेले, जात विचारली नाही फक्त हिंदू आहेत का? एवढेच विचारले ! २६ हिंदूंनी आपल्या प्राणांचे मोल देऊन आतंकवादाला धर्म असतो, हे सिद्ध केले आहे. मुंबईमध्ये १९९२-९३ च्या दंगलीदरम्यान ‘राधाबाई चाळ’ या घटनेने शहराला हादरवून टाकले होते. ही चाळ मुंबईतील जोगेश्वरी भागात आहे. १९९३ च्या जानेवारी महिन्यात, या चाळीत ६ हिंदू नागरिकांना जिवंत जाळण्यात आले होते. या घटनेमध्ये हल्लेखोरांनी धर्म ओळखूनच हिंदूंना लक्ष्य केले होते. अशा अनेक घटना हिंदूंवर विशिष्ट धर्माने केलेल्या अत्याचाराच्या साक्षी आहेत. आज पहलगाममध्ये जे घडलं, तेच मुर्शिदाबादमध्ये घडत आहे; सनातनी क्षेत्रांवर, सण-उत्सवांवर, मंदिरांवर, महिलांवर आणि संपूर्ण हिंदू समाजावर तसेच जगभरात अशाच प्रकारे हिंसा आणि नरसंहार चालू आहेत. पहलगाममधील आतंकवादी आक्रमणाचे दायित्व ‘द रेझिस्टन्स फोर्स’ (टीआरएफ) या आतंकवादी संघटनेने स्वीकारले आहे. वर्ष २०४७ पर्यंत भारताला गझवा-ए-हिंद बनवण्याचे मोठे षड्यंत्र ‘आय.एस्.आय.’ आणि ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ यांनी रचल्याचे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने उघड केले आहे.

आतंकवाद्यांना भारतात ‘गझवा-ए-हिंद’ आणायचे आहे

इसिस, पीएफआय आणि अफगाणिस्तानमधील ISIS-K यांनी भारताला गझवा-ए-हिंद बनवण्याचे षड्यंत्र रचले आहे. ISIS-K काश्मीरमध्ये ‘स्लीपर सेल्स’ म्हणून सक्रिय आहे, तसेच सोशल मीडिया प्रपोगंडाद्वारे भारतातील तरुणांना या संघटनांमध्ये भरती करत आहे. केरळ, पश्चिम बंगाल, कर्नाटक, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि जम्मू-काश्मीरमध्ये स्थानिक कट्टरवादी गटांशी संबंधित असलेल्या ‘स्लीपर सेल्स’चा धोका आहे. यामुळे भारताला या धार्मिक कट्टरतेपासून मुक्त करण्यासाठी सनातन राष्ट्राची स्थापना करणे अनिवार्य आहे.

इस्लामिक स्टेटची छुपी रणनीती !

इस्लामिक स्टेट (ISIS) ही आतंकवादी संघटना इराक-सिरियात अत्यंत क्रूर कृत्यांसाठी कुप्रसिद्ध आहे. १९९० मध्येच काश्मीरमध्ये “निझाम-ए-मुस्तफा” म्हणजेच इस्लामिक स्टेटची सुरुवात झाली होती. आजही ISIS चा धोका कायम आहे – २०२४ मध्ये मॉस्कोमध्ये आणि २०२५ मध्ये न्यू ऑर्लिन्समध्ये प्रेरित हल्ले झाले. जरी त्यांचे भौगोलिक नियंत्रण संपले असले तरी, त्यांच्या गुप्त सेल्स, विचारधारा आणि प्रेरणेतून होणारे हल्ले हे जागतिक सुरक्षेसाठी आणि भारतातील सामाजिक शांततेसाठी गंभीर धोका निर्माण करत आहेत. त्यांनी आपली रणनीती बदलली आहे — थेट युद्धाऐवजी छुपा घात, विचारधारात्मक प्रचार आणि स्थानिक गटांना प्रेरणा देणे हे आता त्यांच्या कारवायांचे केंद्रबिंदू आहे.

हिंदू सुरक्षित आहेत का ?

इसिस व्यतिरिक्त भारतासाठी धोका ठरू शकणाऱ्या लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद, हिज्बुल मुजाहिदीन, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया, इंडियन मुजाहिदीन, अल-कायदा इन इंडियन सबकॉंटिनेंट, स्थानिक इस्लामी कट्टर गट (केरळ, बंगाल, तामिळनाडूतील), स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया या ८ प्रमुख दहशतवादी संघटना तसेच रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरी भारताच्या सुरक्षा आणि कायदा-व्यवस्थेला धोका आहेत. अहिंदूंची वाढती लोकसंख्या ही देश आणि हिंदू धर्म यांसाठी धोक्याची घंटा आहे. याशिवाय, गेल्या वर्षभरात हिंदूंना आत्मपरीक्षण करायला लावणाऱ्या अनेक घटना घडल्या. मुसलमानबहुल मुर्शिदाबादमध्ये वक्फ सुधारणा कायद्याच्या विरोधात धर्मांधांकडून करण्यात आलेल्या आंदोलनाच्या वेळी मोठ्या प्रमाणात हिंसाचार करण्यात आला. अनेक हिंदूंची घरे, दुकाने लुटण्यात आली आणि जाळपोळ करण्यात आली. त्यामुळे घाबरलेल्या ४०० हून अधिक हिंदूंनी तेथून पलायन केले आहे. बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारात मुर्शिदाबाद, मालदा, नाडिया, दक्षिण २४ परगणा हे ४ जिल्हे अशांत झालेले आहेत. बंगाल, बिहार तसेच महाराष्ट्र राज्यांत धर्मांधांनी घडवून आणलेला हिंसाचार आता भारतातील इतर राज्यांमध्येही पसरत आहे. देशातील जिहादी गट, स्लीपर सेल्स आणि त्यांना समर्थन देणारे धर्मांध भारतासाठी मोठे आव्हान आहेत.

सनातन राष्ट्रच सर्वांचे रक्षण करू शकते !

हजारो वर्षांपासून कट्टरपंथीय भगव्या भारताला हिरवे बनण्याची वाटच पाहत आहेत. पूर्वीच्या काळातील जिहादी आक्रमकांनी केवळ भारतातील संपत्ती लुटली नाही, तर या भूमीतून हिंदू धर्म, हिंदू संस्कृती आणि हिंदूंना नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्या काळी हिंदूंनी गाजवलेल्या पराक्रमामुळे त्यांचे हे स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकले नाही. आता हेच स्वप्न बाळगून जगभरातील जिहादी, आतंकवादी आणि धर्मांध भारताला व हिंदूंना लक्ष्य करत आहेत. ‘गझवा-ए-हिंद’ हे ध्येय धर्मांधांना पहिल्यापासून दिलेले आहे, त्यामुळे ते त्यांच्या मार्गावर चालले आहेत. पण आतापर्यंत हिंदू त्यांना कोणतेही उत्तर देऊ शकले नाहीत, कारण त्यांच्या समोर कोणतीही दिशा नव्हती, ध्येय नव्हते. यासाठी पोटा, टाडा सारखे मोठे कायदे करूनही याला आळा घालता आला नाही. हिंदूंना नेहमी मार खावा लागला. यावर एकच उपाय आहे — प्रतिउत्तर देण्याचा किंवा स्वसंरक्षण करण्याचा. आणि हा उपाय ‘सनातन राष्ट्राच्या स्थापनेतूनच’ मिळू शकतो. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी सनातन संस्थेच्या स्थापनेपासून हिंदूंना हिंदू राष्ट्र, सनातन राष्ट्र हे ध्येय दिले. त्यामुळे सगळ्या हिंदूंना एक दिशा मिळाली. त्यामुळे जिहादी जे जे षड्यंत्र करत होते, त्यात लव्ह जिहाद, लँड जिहाद असेल, ती हळूहळू विफल होत आहेत. त्यामुळे ‘गझवा-ए-हिंद’ची रणनीती सनातन राष्ट्रामुळे उध्वस्त होऊ लागली आहे.

हिंदूंना ध्येय मिळाल्यामुळे सनातन राष्ट्राच्या दिशेने वाटचाल !

हिंदूंना ध्येय मिळाल्यामुळे त्या दिशेने हिंदूंची वाटचाल चालू आहे. पूर्वी सर्व हिंदू संघटना वेगवेगळ्या लढत होत्या, पण सनातन राष्ट्र हे ध्येय दिल्यामुळे या सर्व संघटना एकत्र आल्या. विचार आणि कार्य जरी भिन्न असले तरी, आता सर्वांचे ध्येय एकच आहे. त्यामुळे सामूहिक प्रयत्नातून हिंदूंच्या हिताचे निर्णय घेतले जात आहेत. लोकसभेत २ एप्रिल २०२५ रोजी वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झाले आणि अमर्याद अधिकार असलेल्या ‘वक्फ बोर्डा’च्या धर्मांध शक्तीला चाप बसला. तामिळनाडू, केरळसारख्या राज्यांत सरकारच्या ताब्यात असलेली मंदिरे मुक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मोर्चे व आंदोलनं होत आहेत. अनेक शहरांमध्ये बेकायदेशीर मशिदी, दर्गे यावर कारवाई करून जागा मोकळी केली जात आहे. काही राज्यांत लव्ह जिहाद रोखण्यासाठी कठोर कायदे लागू करण्यात आले आहेत. मथुरा आणि काशी मुक्त आंदोलनाला गती मिळाली आहे. ज्ञानवापी आणि श्रीकृष्ण जन्मभूमीवरील कायदेशीर लढ्यांमध्ये हिंदूंना सकारात्मक निर्णय मिळवण्यासाठी न्यायालयीन हालचाली सुरू आहेत. अनेक राज्यांनी समान नागरी कायदा लागू करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

गझवा-ए-हिंदच्या जिहाद विरुद्ध सनातन राष्ट्राचा शंखनाद !

जिहाद, आतंकवाद, इस्लामिक अतिक्रमण या ‘गझवा-ए-हिंद’च्या षड्यंत्राला, नॅरेटीव्हला सनातन राष्ट्रच संपवू शकते, हे वरील घटनांमधून स्पष्ट होते. ‘गझवा-ए-हिंद’ ही विकृत रणनीती उध्वस्त करण्यासाठी सनातन राष्ट्र हीच प्रभावी दिशा आहे. या हेतूने ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात ‘गझवा-ए-हिंद’च्या जिहादी विचारसरणीविरुद्ध शंखनाद होणार आहे. सनातन राष्ट्राच्या या दिव्य शंखनादापुढे ‘गझवा-ए-हिंद’चा टिकाव लागू शकणार नाही.

‘गझवा-ए-हिंद’सारख्या विचारांच्या विरोधात आपल्याला धर्माभिमान, एकजूट आणि सनातन मूल्यांची मशाल हाती घ्यावी लागेल. ‘गझवा-ए-हिंद’सारख्या विघातक प्रवृत्तींना संपवायचे असेल, तर समाजहित, न्याय आणि धर्मनिष्ठतेवर आधारलेले छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यसंकल्पनेपासून प्रेरणा घेतलेले ‘सनातन राष्ट्र’च निर्माण करावे लागेल. गझवा-ए-हिंदची सुरुवात कुठेही होऊ दे, त्याच्या शेवटाची सुरुवात सनातन राष्ट्रातूनच होईल, हे नक्की.

संकलक : श्री. अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था

संपर्क क्रमांक : 99879 22222

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मुख्यमंत्र्यांकडून छ. संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन
Next Article राज्यातील सर्व देवस्थान जमिनींच्या खरेदी विक्री व्यवहारांची नोंदणी थांबवावी – महसूलमंत्री

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?