मंगळवेढ्यात माफियांचा धुडगूस सांगोल्यातील चौघांविरूद्ध फिर्याद दाखल टिपर,वाळू असा 50 लाखांचा मुद्देमाल जप्त
मंगळवेढा -प्रतिनिधी
मंगळवेढा-सोलापूर रस्त्यावर अवैधरित्या वाळू वाहतूक करताना महसूलच्या अधिकार्यांकडून कारवाई होत असताना वाळू माफियांनी त्यात अडथळा आणला तसेच महिला नायब तहसीलदार यांच्यासह एका कर्मचार्याला ढकलून देत वाळू पळवण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी सांगोल्यातील चौघांविरूद्ध मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.या कारवाईत सुमारे 50 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ही घटना शुक्रवारी घडली. श्रीकांत सुभाष पवार वय 34 वर्ष राहणार वाडेगाव तालुका सांगोला, गोरख राजाराम लेंडवे वय 30 वर्ष राहणार वाडेगाव तालुका सांगोला,धनाजी भाऊसो जानकर राहणार सांगोला तालुका सांगोला व एक अज्ञात इसम या चारजणांविरूद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, 21 मार्च रोजी सकाळी 11 ते दुपारी 03-30 वाजण्याच्या दरम्यान श्रीकांत सुभाष पवार,चालक गोरख राजाराम लेंडवे वय 30 वर्षे रा वाढ़ेगांव ता मंगळवेढा यांनी शासनाची कोणतीही परवानगी न घेता गौणखनिज वाळू उत्खनन करुन पर्यावरणाचा -हास होईले हे माहीत असतानाही चोरून वाळू वाहतूक करीत असताना ते सापडले. बिगर नंबरचा टिपर चालक श्रीकांत सुभाष पवार हा त्याच्या ताब्यातील वाहन हे दारूचे नशेत चालवीत असताना सापडला.
धनाजी भाऊसाहेब जानकर गोरख राजाराम लेंडवे यांनी निवासी नायब तहसीलदार श्रीमती शुभांगी जाधव, व तळसगी गावचे ग्राममहसूल अधिकारी साईनाथ रामोड यांना ढकलून दिले व त्यांच्या वाळू जबरदस्तीने घेवून शासकीय कामात अडथळा आणला.
याप्रकरणी धनंजय शिवाजी इंगोले वय 53 वर्ष व्यवसाय मंडळ अधिकारी मंगळवेढा यांनी चौघांवर फिर्याद दिली आहे.