Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कोरोनाबाधित रुग्णांच्या मृतदेहांची हेळसांड; अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे कुत्र्याने तोडले लचके
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

कोरोनाबाधित रुग्णांच्या मृतदेहांची हेळसांड; अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे कुत्र्याने तोडले लचके

Surajya Digital
Last updated: 2020/09/05 at 10:32 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सांगली : कोरोनाबाधित रुग्णांच्या मृतदेहांची प्रचंड हेळसांड सुरू आहे. अंत्यसंस्कार केल्यानंतर अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे लचके तोडणाऱ्या कुत्र्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा संतापजनक प्रकार इस्लामपूर नगरपरिषदेच्या स्मशानभूमीत घडला आहे. त्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय.

या प्रकारातून इस्लामपूर नगरपरिषद आणि जिल्हा प्रशासनाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. मृतदेहांवर योग्य पद्धतीने अंत्यसंस्कार होत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. इस्लामपूर नगरपरिषदेच्या कापुसखेड नाका परिसरातील स्मशानभूमीत कोरोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जातात. गेल्या १५ दिवसांपासून मृतांची संख्या वाढत असल्याने अंत्यसंस्कार करणाऱ्या यंत्रणा कोलमडल्या आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

इस्लामपूरमधील गंभीर प्रकार एका मृताच्या नातेवाईकानेच मोबाइलमध्ये चित्रीत करून तो सोशल मीडियात व्हायरल केला. या व्हिडिओत कुत्र्याकडून अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे लचके तोडले जात आहेत. शिराळा तालुक्यात व्हेंटिलेटरची व्यवस्था नसल्याने नातेवाईकांनी रुग्णाला इस्लामपूर शहरातील एका कोव्हिड उपचार केंद्रात दाखल केले होते. ३४ हजार रुपये भरून घेतल्यानंतरही रुग्णाला व्हेंटिलेटर मिळाले नाही. काल गुरुवारी सकाळी या रुग्णाचा मृत्यू झाला. यानंतर रुग्णालय प्रशासनाने मृतदेह अंत्यसंस्कारासाठी इस्लामपूर नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांकडे सोपवला.

* कुटुंबीयास दिसला धक्कादायक प्रकार

नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी घाईगडबडीत अंत्यसंस्काराचे सोपस्कार उरकले. यानंतर दुसरा मृतदेह आणण्यासाठी ते निघून गेले. दरम्यान, स्मशानभूमीत आलेल्या नातेवाईकांना अर्धवट जळालेला मृतदेह पाहून धक्का बसला. गंभीर बाब म्हणजे एक भटके कुत्रे अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे लचके तोडत होते. हा सर्व प्रकार पाहून नातेवाईकांनी मोबाइलवर चित्रीकरण केले.

या व्हिडिओद्वारे त्यांनी पालकमंत्री जयंत पाटील आणि जिल्हा प्रशासनाला जाब विचारला आहे. उपचाराअभावी रुग्णांना जिवंतपणी नरकयातना भोगाव्या लागत आहेत. मृत्यूनंतर त्यांचा अखेरचा प्रवास तरी योग्य पद्धतीने व्हावा, अशी अपेक्षा नातेवाईकांनी व्यक्त केली आहे. तसेच मृतदेहांची हेळसांड होण्यासाठी पालकमंत्री की प्रशासन जबाबदार आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #कोरोना #मृतदेहाची #हेळसांड #कुत्र्याने #लचके #तोडले #नातेवाईक #संतप्त
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article नाराज एकनाथ खडसेंना शिवसेनेची खुली अॉफर; शिवसेनेचे या नेत्याने दिली बाहुबलीची उपमा
Next Article आमदार अनिल बाबरांना कोरोनाची लागण; सांगलीत आतापर्यंत सहा आमदार बाधित

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?