Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मुलाचा शेअरमार्केट हव्यास जीवावर बेतला, सेवानिवृत्त पोलिस कर्मचा-याच्या कुटुंबाची आत्महत्या
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीमहाराष्ट्र

मुलाचा शेअरमार्केट हव्यास जीवावर बेतला, सेवानिवृत्त पोलिस कर्मचा-याच्या कुटुंबाची आत्महत्या

Surajya Digital
Last updated: 2021/01/23 at 11:21 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

सांगली : कर्जाला कंटाळून मिरजेच्या बेळंकी येथे एका सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याने पत्नी व एका मुलासह गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आज शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर गावात एकाच खळबळ उडाली आहे. याची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

शेअर मार्केटमध्ये गुंतवण्यासाठी मुलाने सावकारांकडून कर्ज घेतले आणि शेअर मार्केटमधून अपेक्षित पैसे न मिळाल्याने हे गव्हाणे कुटूंब संकटाच्या खाईत अडकले. मग ज्या सावकरांकडून पैसे घेतले होते त्याचा तगादा सुरू झाला आणि हा त्रास सहन न झाल्याने वडील, आई आणि त्या मुलाने मृत्यूलाच कवटाळले. सेवानिवृत्त पोलीस अण्णासो गुरसिद गव्हाणे, पत्नी मालन अण्णासो गव्हाणे आणि मुलगा महेश अन्नासो गव्हाणे अशी या आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत.

मिरज तालुक्यातील बेळंकी गावात जिल्हा पोलीस दलातील निवृत्त कर्मचाऱ्याने मुलगा, पत्नीसह आत्महत्या केल्याची घटना घडलीय. धक्कादायक बाब म्हणजे, शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी घेतलेल्या कर्जाचा आकडा कोट्यवधीच्या घरात गेल्याने आणि सावकाराचा कर्जवसुलीसाठी तगादा मागे लागल्याने संपूर्ण कुटुंबानेच आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी प्रचंड कर्ज झाल्याने मिरज, बेळंकीतील मालमत्ता विकली तरीही अद्याप दीड कोटी देणे होते. त्यामुळे हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे. मृतदेहा शेजारी सापडलेल्या चिट्ठीत देखील कर्जाच्या बाबी नमूद असल्याचे पोलिसांनी म्हटलं आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

अण्णासाहेब गव्हाणे हे सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी आहेत. तर त्यांचा मुलगा महेश हा इंजिनीअर होता. शेअर मार्केटमध्ये त्याने पैसे गुंतवणूक केली होती. हे पैसे गुंतवणूक करण्यासाठी त्याने काही सावकारांकडून कर्ज घेतले होते. अंदाजे कोटीच्या आसपास ही रक्कम असल्याची चर्चा आहे. महेश गव्हाणे याने काही दिवसांपूर्वी त्याला होणारा त्रास आणि यामुळे आत्महत्या करणारी फेसबुक पोस्ट देखील लिहली होती.

मात्र त्याच्या कुटुंबाने त्याची समजूत काढत त्याचा आत्महत्याचे विचार बदलला होता. या पोस्टमध्ये आर्थिक गोष्टींचा उल्लेख करत पैशाच्या वसुलीसाठी तगादा देणाऱ्यांच्या नावाचा उल्लेख केला होता. तसेच जे लोक त्रास देत आहेत. त्यांना राजकीय वरदहस्त असून त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी विनंती करत आई व वडील यांची आठवण करून आत्महत्या करण्याचं स्पष्ट केले होते.

दरम्यान आज शनिवारी बेळंकी याठिकाणी राहत्या घरी अण्णासाहेब गुरुसिद्ध गव्हाणे, पत्नी मालती गव्हाणे व मुलगा महेश गव्हाणे या कुटुंबाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आले आहे. सकाळी अण्णासाहेब गव्हाणे यांचे पुतणे यांना ही घटना निदर्शनास आली.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #मुलाचा #शेअरमार्केट #हव्यास #जीवावर #बेतला #सेवानिवृत्तपोलिस #कर्मचा-याच्या #कुटुंबाची #आत्महत्या
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article इंधन दरवाढीविरोधात सोलापुरात युवक काँग्रेसचे ‘बैल के आगे बिन बजाना आंदोलन’
Next Article नांदेडच्या कामेश्वर वाघमारेला पंतप्रधान बाल शौर्य पुरस्कार

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?