Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पहेलगाम अतिरेकी हल्ल्याचा संगमनेर काँग्रेसकडून तीव्र निषेध
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

पहेलगाम अतिरेकी हल्ल्याचा संगमनेर काँग्रेसकडून तीव्र निषेध

admin
Last updated: 2025/04/24 at 1:19 PM
admin
Share
3 Min Read
SHARE

अहिल्यानगर 24 एप्रिल (हिं.स.) :- वंदे मातरम, भारत माता की जय, भ्याड अतिरेकी हल्ल्याचा निषेध असो, मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद या घोषणा देत संगमनेर काँग्रेसच्या वतीने पहेलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा कॅण्डल मार्च करून तीव्र निषेध करण्यात आला. याच बरोबर या अतिरेक्यांना मृत्युदंडाची शिक्षा द्या अशी मागणी माजी आ.डॉ.सुधीर तांबे यांनी केली असून भारतीय म्हणून अशा वेळेस सर्वांनी एकत्र या असे आवाहन डॉ. जयश्री थोरात यांनी केले आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर व युवक काँग्रेसच्या वतीने पहेलगाम येथील अतिरेकी हल्ल्याचा कॅडल मार्च करून निषेध करण्यात आला यावेळी माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, डॉ.जयश्री थोरात, सोमेश्वर दिवटे, विश्वासराव मुर्तडक, किशोर टोकसे, गणेश मादास, अर्चना बालोडे ,प्रमिला अभंग, शैलेश कलंत्री, प्रा.बाबा खरात, गणपतराव सांगळे, जीवन पांचारिया, राणी प्रसाद मुंदडा, नवनाथ आरगडे, अंकुश ताजणे ,

रमेश नेहे, सुरेश झावरे, वैष्णव मूर्तडक, डॉ.विजय पवार, प्रीतम साबळे,सोमनाथ गुंजाळ, सचिन खेमनर, सुरभी मोरे, अभय खोजे, प्रदीप हासे ,किरण रोहम, अमित गुंजाळ,दीपक शिंदे, किशोर बोऱ्हाडे, आदित्य बर्गे, अलोक बर्डे,आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.या वेळी पाकिस्तान मुर्दाबाद, फाशी द्या फाशी द्या अतिरेक्यांना फाशी द्या, भारत माता की जय, वंदे मातरम, नही झुके नही झुकेंगे, अशा घोषणा देण्यात आल्या.यावेळी बोलताना डॉ. तांबे म्हणाले की, अतिरेक्यांनी केलेला हल्ला हा भ्याड आणि अत्यंत निंदनीय आहे. खरे तर सुरक्षा व्यवस्था भेदून अतिरेकी आत मध्ये आलेच कसे हा मोठा प्रश्न असून या अतिरेक्यांना मृत्यूदंडाची शिक्षा झाली पाहिजे. आतंकवाद हा जगाला लागलेली मोठी कीड असून ही संपवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने एकत्र यावे. जातिभेद आणि कट्टरतावाद हा मानव जातीसाठी धोकादायक असून या हल्ल्याचा तमाम संगमनेरकर निषेध करत असल्याचे ते म्हणाले.तर डॉ.जयश्री थोरात म्हणाल्या की, अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यांमध्ये निर्दोष लोक मारले गेले.

भारताचा कॉमन मॅन हा एक एक रुपया जमा करून काश्मीरला भेट देण्यासाठी जात असतो. किंवा त्याचे ते स्वप्न असते. आणि अशा भीतीदायक हल्ल्याने तेथे जीवन संपते. हे चिंताजनक आहे. अशा हल्ल्याच्या निषेधार्थ सर्व जाती-धर्म पक्ष यांनी एकत्रित येऊन लढा दिला पाहिजे. आता वेळ आली आहे ती भारतीय नागरिक म्हणून एकत्र येण्याची. या अतिरेकी हल्ल्यात मृत पावलेल्या नागरिकांचा काय दोष होता. 27 निष्पाप नागरिकांचा जीव गेला असून यामध्ये सहा लोक हे महाराष्ट्राचे होते. या अतिरेक्यांना पकडून मृत्युदंड देऊन या हल्ल्याचा बदला सरकारने घेतला पाहिजे असे त्या म्हणाल्या.याप्रसंगी विश्वासराव मुर्तडक, प्रा. बाबा खरात यांनीही पाकिस्तानवर टीका केली.यावेळी संगमनेर तालुका व शहर काँग्रेस, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, एन एस यु आय, जय हिंद युवा मंच, महाविकास आघाडी, पुरोगामी संघटना, व समविचारी पक्षांचे कार्यकर्ते पदाधिकारी युवक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.——————————

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article भारताने जर कुठली शत्रूतापूर्ण कारवाई केली, तर पाकिस्तान उत्तर द्यायला संकोच करणार नाही – ख्वाजा आसिफ
Next Article पहलगाम दहशतवादी हल्ला : डोंबिवलीच्या तिघांना मुख्यमंत्र्यांकडून श्रदांजली

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?