अश्लील, बिभित्स नंगानाचाने काळवंडताहेत संगितबारी थिएटर्सच्या भिंती
डान्स बार अन् डीजेच्या दणादणाटात घुंगराची छमछम होतेय ‘अबोल’
: पांरपरिक लावणी नृत्य कलेपासून दुरावला रसिक
: खुलेआम अंगप्रदर्शन अन् नंगानाची नव्या पिढीला भुरळ
: ‘माया’ कमविण्याच्या नादात थिटर्स मालकांकडून ‘मागणी तसा पुरवठा’ अर्थशास्त्रीय तत्वाची अंमलबजावणी
शिवाजी भोसले
सोलापूर : गण गवळणी, बतावणी अन् लावणी याचे सादरीकरण संगित बारी थिएटर्समधून व्हायचे. लावणी ही तर महाराष्ट्राची लोककला. संगितबारी थिटर्समधून या लोककलेचे संवर्धन व्हायचे. सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील सर्व संगितबारी थिएटर्संनी महाराष्ट्राची ही लाडकी लोककला जपली. मात्र काळाच्या ओघात संगितबारी थिएटर्समधील लावणी नृत्याची अभिरुची रसिकांनी राहिली नाही. डान्सबारमधील वातावरणात रमणार्या आंबट शौकीनांकडून आता संगितबारी थिएटर्स यांच्याकडूनची अपेक्षा बदलली आहे.या थिएटर्समधून सादर होणारा साडीमधील नृत्यांगणांचा नृत्य कलाप्रकार त्यांना नकोय. त्यांना हवाय डीजेवर ताल धरणार्या बारबालांचा अश्लील, बिभित्स नंगानाच. संगितबारी थिएटर्स मालकांनी शौकीनांची मागणी लक्षात घेऊन बदल केलाय. संगितबारी थिएटर्समधील कलाप्रकार बाजूला ठेऊन डीजे आणि बारबालांच्या धिंगाण्याला मुकसंमती दिली आहे.
दरम्यान डान्स बार अन् डीजेच्या दणादणाटात सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील संगितबारी थिएटर्स म्हणजेच सांस्कृती केंद्रांमधील घुंगराची छमछम आता ‘अबोल’ होत आहे. अश्लील, बिभित्स नंगानाचाने संगितबारी थिएटर्सच्या भिंती अक्षरश: काळवंडताहेत. महाराष्ट्राच्या लोककलेवर जणू घाला घातला जातोय. सांस्कृतीक कला केंद्रांना डान्सबारचे स्वरुप येत आहे. लावणीनृत्यावरील छमछम ऐकू येण्याऐवजी, आता संगितबारी थिएटर्समधून ‘काँटा लगा…शिवाय छम छम करता है ये नशीला बदन…’अशा गाण्यांचा धडाकेबाज डीजे वाजतोय अन् त्यावर आक्षेपार्ह नृत्यांची बिजली कडाडली जातेय. सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील 82 पैकी 42 कला केंद्रांमध्ये डान्स बार, डीजे सुरु आहे. त्या ठिकाणी काय, काय प्रकार सुरु आहे, त्याचे धक्कादायक याचा नंगानाच राडा सुरु झाला आहे.
विशेष म्हणजे राज्यात डान्सबारला बंदी असताना सांस्कृतिक कला केंद्रात लाईव्ह ऑर्केस्ट्राच्या नावाखाली राजरोसपणे डान्सबार चालवले जाऊ लागले आहेत. पांरपरिक लावणी नृत्य कलेपासून दुरावला रसिक खुलेआम अंगप्रदर्शन अन् नंगानामध्ये सामील होताना दिसतोय. ‘माया’ कमविण्याच्या नादात थिटर्स मालकांकडून ‘मागणी तसा पुरवठा’ अर्थशास्त्रीय तत्वाची अंमलबजावणी होतेय.
राज्यातील 82 पैकी 42 कला केंद्रांमध्ये डान्स बार, डीजे सुरु आहे. त्या ठिकाणी काय प्रकार सुरु आहे, त्याचे धक्कादायक व्हिडीओ चित्रण समोर आले. त्यामुळे संगितबारी थिएटरांच्या प्रवासाने ‘लोककला टू डान्सबार’ असा ट्रॅक पकडला आहे.
फोटो सुरेखा पुणेकर लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकरांकडून पृष्टी राज्यात डान्स बारवर बंदी आहे. त्यानंतर विविध मार्गाने डान्स बार सारखा प्रकार सर्रासपणे सुरु आहे. राज्यातील अनेक संस्कृतिक कला केंद्रामध्ये डान्स बार आणि डीजे सुरु आहे, असा दावा लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी पुण्यात केला. पुणे येथे पत्रकार परिषद घेऊन सुरखा पुणेकर यांनी यासंदर्भातील व्हिडिओसुद्धा दाखवला. या व्हिडिओमध्ये सांस्कृतिक कला केंद्रामध्ये सुरू असलेला धिंगाणा दिसत आहे.
खळबळजक आरोप डान्स बारला राज्यात बंदी असल्याचा दावा केला जात आहे. परंतु सर्रासपणे अनेक संस्कृतिक कला केंद्रामध्ये खुलेआम डान्स बार, डीजे सुरु असल्याचा आरोप लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी केला आहे. सुरेखा पुणेकर म्हणाल्या, राज्यातील 82 पैकी 42 कला केंद्रांमध्ये डान्स बार, डीजे सुरु आहे. त्या ठिकाणी काय, काय प्रकार सुरु आहे, त्याचे धक्कादायक व्हिडिओ सुरेखा पुणेकर यांनी दाखवले.
काय आहे ‘त्या’ व्हिडिओमध्ये राज्यात बेकायदेशीपण सुरु असलेल्या या डान्सबारवर तत्काळ बंदी आणली पाहिजे. या डान्सबारमुळे अनेक संगीतकार, कलाकार, वाजंत्री हे देशोधडीला लागले असल्याचे मत सुरेखा पुणेकर यांनी व्यक्त केले. सुरेखा पुणेकर यांनी दाखवलेल्या व्हिडिओमध्ये साडी नेसलेली महिला डान्स करताना दिसत आहे. त्या महिलेसोबत तरुण अश्लिल चाळे करताना दिसत आहे. सुरेखा पुणेकर यांनी माध्यमांना दिलेला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.