Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मी जिवंत, सुखरुप आहे; संजयमामा शिंदेंचा अखेर खुलासा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

मी जिवंत, सुखरुप आहे; संजयमामा शिंदेंचा अखेर खुलासा

Surajya Digital
Last updated: 2020/10/15 at 9:05 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर / माढा : नाशिकमध्ये गाडीला लागलेल्या आगीत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संजय शिंदे यांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली. मात्र अनेक वृत्तवाहिन्या आणि वेबसाईट्सनी बातमी प्रसारित करताना करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे यांचा फोटो वापरला. मी सुखरुप असून नजरचुकीने बातमीत माझा फोटो वापरल्याची प्रतिक्रिया संजय मामा शिंदे यांनी दिली. त्यांनी या संदर्भात फेसबुकवर पोस्ट केली आहे.

मुंबई-आग्रा महामार्गावर पिंपळगाव बसवंत टोल प्लाझाजवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संजय शिंदे यांच्या गाडीला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत त्यांचा होरपळून मृत्यू झाला. संजय शिंदे हे नाशिकमधील द्राक्षांचे व्यापारी आहेत. द्राक्षांच्या बागेसाठी कीटकनाशके आणण्यासाठी ते पिंपळगावला निघाले होते. कडवा नदीवरील ओव्हरब्रिजजवळ असताना त्यांच्या गाडीत बिघाड झाला.

शॉर्ट सर्किट झाल्याने गाडीला आग लागली. कारमध्ये असलेल्या सॅनिटायझरमुळे आग आणखीच भडकली. शिवाय कारचा सेंट्रल लॉक लागल्याने त्यांना बाहेर पडता आलं नाही आणि त्यांचा होरपळून मृत्यू झाला.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

परंतु या बातमीचं वार्तांकन करताना अनेक वृत्तवाहिन्या आणि वेबसाईटनी नाव आणि पक्ष साधर्म्यामुळे मृत्यूमुखी पडलेल्या संजय शिंदे यांच्या जागी आमदार संजयमामा शिंदे यांचा फोटो वापरला. त्यामुळे संजयमामा शिंदे यांच्या कार्यकर्त्यांमध्येही चिंतेचं वातावरण निर्माण झालं. अखेर संजयमामा शिंदे यांनी फेसबुकवर या संदर्भात पोस्ट लिहून आपण सुरक्षित असल्याचं सांगितलं आणि गैरसमज दूर केला.

संजय मामा शिंदे यांनी लिहिलं आहे की, “सदर बातमी मध्ये माझा फोटो नजर चुकीने वापरला आहे.ही बातमी नाशिकमधील आहे. मी सुखरूप घरी आहे.”

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #संजयमामाशिंदे #अपघातात #फोटो #प्रतिक्रिया #सुखरुप
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सीना नदीच्या पाण्याने पीरटाकळीला वेढा; गावातील तीनशेहून अधिक व्यक्तींना हलविले
Next Article भारताचे ‘ऑस्कर’ स्वप्न पूर्ण करणा-या भानू अथैय्यांचे निधन; कोल्हापुरातील कारकीर्द

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?