Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: संजय राऊतांच्या आरोपाला संजयमामा आणि देवेंद्र भुयार यांचे प्रत्युत्तर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsराजकारणसोलापूर

संजय राऊतांच्या आरोपाला संजयमामा आणि देवेंद्र भुयार यांचे प्रत्युत्तर

Surajya Digital
Last updated: 2022/06/11 at 7:04 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

सोलापूर /कुर्डूवाडी   : राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव झाला. यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी खळबळजनक खुलासा केला आहे. यात त्यांनी आमदार संजयमामा शिंदे , देवेंद्र भुयार यांनी मतदान केले नसल्याचा आरोप करीत पाहून घेऊची भाषा केली आहे. त्यास संजयमामांनी मी घोडेबाजारतला नाही, उद्धव ठाकरेंना विचारा, असे प्रत्युत्तर दिलंय. Sanjay Mama and Devendra Bhuyar’s response to Sanjay Raut’s allegation Sanjay Shinde Politics

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…आमदार संजय शिंदे यांच्या प्रतिक्रियेसह  अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी surajya digital फेसबुक पेजला भेट द्या□ ‘संजय राऊत हे काय ब्रह्मदेव आहेत का?□ संजय राऊतांचा खळबळजनक खुलासा, सांगितली ‘गद्दारां’ची नावं

 

शिवसेनेच्या आँफर असतानाही पक्षात गेलो नाही. मी घोडेबाजारातला असतो तर मी मागेच सेनेची आँफर स्विकारली असती. पण ऊध्दव ठाकरे व आदित्य ठाकरे यांना माहित आहे की मी घोडेबाजारातला आहे का नाही. संजय राऊत यांनी लावलेले आरोप चुकीचे आहेत. महाविकास आघाडीला पाठिंबा देत माझं मतदान मी महाविकास आघाडीलाच केले आहे. राऊतांनी केलेले आरोपात काही तथ्य नाही. माझ्या नेत्यांना माझ्यावर विश्वास आहे, असे संजय राऊत यांनी केलेल्या आरोपाला ऊत्तर देत संजयमामा शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. दैनिक सुराज्यला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

आमदार संजयमामा शिंदे यांनी ,महाविकास आघाडीला पाठींबा जाहीर केला होता. मुंबईत आमदारांची झालेल्या बैठकीतही त्यांनी हजेरी लावली होती. मात्र शिवसेनेचे पवार यांना मतदान कमी झाले असल्याने आरोप- प्रत्यारोप सुरु आहेत. महाडिक यांना ४१ तर पवार यांना ३३ मते मिळाली आहेत. त्यामुळे पवार यांना महाविकास आघाडीतील काही आमदारांनी मतदान केले नाही. काही अपक्ष आमदारांनीही मतदान केले नसल्याचे बोलले जात आहे.

त्यातच शिवसेनेचे राऊत यांनी प्रतिक्रिया देताना बहुजन विकास आघाडी तसेच करमाळ्याचे अपक्ष आमदार संजयमामा शिंदे यांनी मतदान दिलें नसल्याचे , राऊत यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले .. यावर आमदार संजयमामा शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

 

आमदार संजय शिंदे यांच्या प्रतिक्रियेसह  अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी surajya digital फेसबुक पेजला भेट द्या

 

आमदार शिंदे म्हणाले, ‘संजय राऊत यांचे आरोप चुकीचे आहेत. सूचनेप्रमाणे मी मतदान केले आहे. मी कोणताही घोडेबाजार केलेला नाही. राऊत असा आरोप का करत आहेत या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे त्यांनाच विचारले पाहिजे असे सांगितले.

माझ्यावर आरोप करणे चुकीचे आहे. मी घोडेबाजारातील नाही , हे आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माहित आहे. माझ्या नेत्यांचा माझ्यावर विश्वास आहे. आमच्या नेत्यांपुढे हा विषय मांडला जाईल. विश्वास नसेल तर त्यांनी मत पहिला पाहिजे होते, असेही शिंदे म्हणाले आहेत.

 

□ ‘संजय राऊत हे काय ब्रह्मदेव आहेत का?

 

–  शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर आमदार देवेंद्र भुयार यांनी हल्लाबोल केला आहे. भुयार यांनी शब्द देऊन शिवसेनेला मत दिले नाही, असा आरोप राऊत यांनी केला होता. पण, संजय राऊत हे काय ब्रह्मदेव आहेत का ? हे ब्रह्मदेवापेक्षा मोठे आहेत असे वाटायला लागलंय. मतदान गोपनीय राहते, मी दिले नाही हे यांना कसे माहित, मी महाविकास आघाडीत सुरुवातीपासून आहे, मी कुठलाही दगाफटका केलेला नाही’, असे भुयार यांनी म्हटले.

 

□ संजय राऊतांचा खळबळजनक खुलासा, सांगितली ‘गद्दारां’ची नावं

#SanjayRaut #political #सुराज्यडिजिटल #गद्दार #surajyadigital #RajyaSabhaElections

राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव झाला. यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी खळबळजनक खुलासा केला आहे. संजयमामा शिंदे, देवेंद्र भुयार, श्यामसुंदर शिंदे या ‘गद्दार’ आमदारांनी आणि हितेंद्र ठाकूरांच्या पक्षाने आम्हाला मतदान केले नाही, असे राऊत यांनी म्हटले आहे. ज्यांनी शब्द देऊन दगाबाजी केली त्यांची नाव आमच्याकडे आहेत पण ठीके पाहून घेऊ, असाही इशारा राऊत यांनी दिला आहे.

 

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

फडणवीसांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदार वाढले- राहुल गांधी

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

TAGGED: #SanjayMama #DevendraBhuyar's #response #SanjayRaut #allegation #SanjayShinde #Politics, #संजयराऊत #आरोप #संजयमामा #देवेंद्रभुयार #प्रत्युत्तर #संजयशिंदे #राजकारण
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article Rajyasabha ShivSena court राज्यसभा निवडणूक निकाल : सुहास कांदे यांचे मत रद्द, शिवसेना कोर्टात जाणार
Next Article Sophisticated sprayer नाशिकच्या विद्यार्थ्यांनी तयार केले अत्याधुनिक फवारणी यंत्र

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?