Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: नऊ तासाच्या चौकशीनंतर ईडीने संजय राऊतांना घेतले ताब्यात
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

नऊ तासाच्या चौकशीनंतर ईडीने संजय राऊतांना घेतले ताब्यात

Surajya Digital
Last updated: 2022/07/31 at 5:19 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

□ राऊत ईडीसोबत जाण्यास तयार नव्हते

 

Contents
□ राऊत ईडीसोबत जाण्यास तयार नव्हतेस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा) □ थेट दिल्लीतून कारवाई

मुंबई : पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून शिवसेना नेते संजय राऊत यांची 9 तासांपासून चौकशी सुरू आहे. आता या प्रकरणी राऊतांना ईडीकडून ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, राऊतांच्या मैत्री या निवासस्थानी शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. After nine hours of interrogation, ED took Sanjay Raut into custody Shiv Sena Patrachal

पत्राचाळ प्रकरणात अटकेची टांगती तलवार असणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना अखेर आज नऊ तासाच्या चौकशीनंतर आज रविवारी (30 जुलै) ईडीकडून ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहे. संजय राऊत यांची तब्बल 25 ईडी अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात आली.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या घरावर आज (रविवार, 31 जुलै) सकाळीच ईडीने छापा टाकला. ईडीच्या अधिकाऱ्यांकडून संजय राऊत यांच्याशी संबंधित अन्य तीन ठिकाणी देखील छापेमारी सुरु होती. ईडीच्या अधिकाऱ्यांनी संजय राऊत आणि त्यांच्या परिवाराची कसून चौकशी केली. साधारण नऊ तास ही चौकशी सुरु होती. त्यानंतर आता समोर आलेल्या माहितीनुसार ईडीने संजय राऊत यांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

दरम्यान, भांडुप येथील त्यांच्या राहत्या घरी सकाळी ईडीचे अधिकारी आले होते. सकाळपासून आत्तापर्यंत त्यांची कसून चौकशी चालू होती. यादरम्यान त्यांच्या घरासमोर मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक जमले असून जोरदार घोषणाबाजीला सुरूवात केली होती. त्यानंतर, “पण तरीही मी शिवसेना सोडणार नाही.” असं ट्वीट संजय राऊतांनी केलं होतं. दरम्यान राऊतांच्या घरी सीआरपीएफच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. पण अखेर नऊ तासाच्या चौकशीनंतर राऊतांना ईडीकडून ताब्यात घेण्यात आलं आहे.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

आता राज्यभरातून प्रतिक्रिया येत आहेत. संजय राऊतांवरील कारवाईनंतर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ईडी केंद्र सरकारची गुलाम आहे. त्यातून एकएकेला ठरवून टार्गेट केले जात आहे, असा अरविंद सावंत यांनी आरोप केला आहे. राज्यपालांच्या वक्तव्यानंतर उभा महाराष्ट्र पेटून उठला होता. मग आजचा मुहूर्त साधून त्यांनी संजय राऊतांच्या घरी धाड टाकली. यामध्ये सुद्धा कपटीपणा केला आहे. भ्रष्टाचाऱ्यांच्या भ्रष्टाचाराला भाजपमध्ये आल्यानंतर पावन केले जाते, असेही अरविंद सावंत म्हणाले.

पत्राचाळ घोटाळ्यात संजय राऊतांच्या घरी पोहचून ईडी अधिकायांनी चौकशी सुरु केली. त्यांची गेल्या सहा तासापासून चौकशी सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार ईडी राऊतांना आज ताब्यात घेऊन पुढील चौकशी करू शकते. पण राऊत ईडीसोबत जायला तयार नाहीत, अशी माहिती समोर येत होती.

□ थेट दिल्लीतून कारवाई

 

राऊत दाम्पत्याच्या घरी सकाळी 7 वाजताच ईडीचे पथक दाखल झाले. ही कारवाई थेट दिल्लीतून हाताळली जात असल्याचे समजते आहे. सीआरफ जवान घराबाहेर तैनात असून ईडीचे एकूण 25 अधिकारी तपासात सक्रिय असल्याची माहिती समोर आलेली आहे.

मुंबईतील पत्राचाळ जमीन गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून संजय राऊत यांची चौकशी करण्यात येत आहे. या चौकशीत ईडीचे एकूण तीन पथक कार्यरत आहेत. मुंबईसह थेच दिल्लीतील मुख्यालयातून या सर्व कारवाईवर बारकाईने लक्ष दिले जात आहे आणि प्रत्येक क्षणाची अपडेट दिल्लीतील मुख्यालयाला दिली जात आहे.

□ काँग्रेसने केले 3 आमदारांचे निलंबन

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील हावडा जिल्ह्यात झारखंड काँग्रेसच्या 3 आमदारांकडून 48 लाखांची रोकड सापडली आहे. पोलिसांनी त्यांच्या चालकासह 5 जणांना अटक केली आहे. त्यात काँग्रेसच्या तिन्ही आमदारांचाही समावेश आहे. त्यानंतर काँग्रेसच्या तीन आमदारांना निलंबित करण्यात आले आहे, असे झारखंड कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आलमगीर आलम यांनी सांगितले.

काल शनिवारी (ता. 30) पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसच्या तीन आमदारांना त्यांच्या कारमध्ये नोटांच्या बंडलांसह ताब्यात घेण्यात आले होते. आमदारांना रोख रकमेसह पकडल्यानंतर देशभर मोठी खळबळ उडाली होती. त्यामुळे पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ही कारवाई केली. जामतारा येथील इरफान अन्सारी, खिजरी येथील राजेश कछाप आणि कोळेबिरा येथील नमन विक्षल कोंगडी या आमदारांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.

 

 

You Might Also Like

थोरात कारखान्याच्या मदतीने हायटेक बसस्थानकाची स्वच्छता

मालेगाव स्फोट प्रकरणाचा निकाल पुन्हा लांबणीवर

छत्तीसगड : चकमकीत 8 नक्षलवादी ठार, 5 जवान हुतात्मा

दोन दिवसांपूर्वी झाला विवाह अन् फौजी निघाला देशसेवेसाठी

अंगणवाडी सेविकांच्या कुटुंबासाठी मोफत आरोग्य तपासणी – आदिती तटकरे

TAGGED: #ninehours #interrogation #ED #took #SanjayRaut #custody #ShivSena #Patrachal, #नऊतास #चौकशीनंतर #ईडी #संजयराऊत #ताब्यात #शिवसेना #पत्राचाळ
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सुप्रीम कोर्टातून शिंदे-ठाकरे यांच्यासाठी मोठी अपडेट; निर्णय आता 3 ऑगस्टला
Next Article अक्कलकोटमध्ये शाळा भरण्यापूर्वी छत कोसळले; मोठी दुर्घटना टळली

Latest News

थोरात कारखान्याच्या मदतीने हायटेक बसस्थानकाची स्वच्छता
महाराष्ट्र May 8, 2025
मालेगाव स्फोट प्रकरणाचा निकाल पुन्हा लांबणीवर
महाराष्ट्र May 8, 2025
पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम नष्ट
देश - विदेश May 8, 2025
भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीममुळे पाकिस्तानी हल्ला निष्क्रीय
देश - विदेश May 8, 2025
ऑपरेशन सिंदूर’मध्ये 100 दहशतवादी ठार
देश - विदेश May 8, 2025
छत्तीसगड : चकमकीत 8 नक्षलवादी ठार, 5 जवान हुतात्मा
महाराष्ट्र May 8, 2025
दोन दिवसांपूर्वी झाला विवाह अन् फौजी निघाला देशसेवेसाठी
महाराष्ट्र May 8, 2025
अंगणवाडी सेविकांच्या कुटुंबासाठी मोफत आरोग्य तपासणी – आदिती तटकरे
महाराष्ट्र May 8, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?