मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणाला आता राजकीय वळण लागले आहे. बिहारमधील भाजपचे आमदार आणि सुशांतसिंह राजपूत याचे बंधु नीरजसिंह बबलू यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी काल ‘सामना’च्या आपल्या ‘रोखठोक’ या सदरात सुशांतच्या वडिलांवर गंभीर आरोप केले होते.
त्यांनी म्हटले होते की सुशांतच्या वडील के.के.सिंह यांनी दुसरे लग्न केलं होतं. सुशांत या लग्नाच्या विरोधात होता. यामुळेच सुशांत आणि त्यांच्या वडिलांचे संबध चांगले नव्हते. पण सुशांतचे मामा आर. सी. सिंह यांनी सुशांत सिंह यांच्या वडिलांनी दुसरे लग्न केल्याचा आरोप खोडून काढला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
संजय राउत हे खोटारडे असल्याचे आरोप त्यांनी केला आहे. या लेखातील सारी विधानं तथ्यहीन आहेत. या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप नीरज सिंह यांनी केला आहे. ‘रोखठोक’मध्ये संजय राऊत यांनी असे विधान करून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे. सुशांतच्या वडिलांनी एकच लग्न केले आहे, हे बिहारमधील सगळ्यांना माहित आहे, असे सुशांतसिंह राजपूत याचे मामा आर.सी.सिंह यांनी सांगितले.
* मुख्यमंत्र्यांच्या इशा-यावरुन कृत्य केल्याचा आरोप
उद्धव ठाकरे यांच्या इशारावरून संजय राऊत यांनी हे विधान केलं असल्याचा आरोप आर.पी.सिंह यांनी केला आहे. सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचं राजकारण करू नका, मुंबई पोलिस तपास करण्यास सक्षम आहे, असे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खासदार संजय राऊत यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितलं. ज्यांना मुंबई पोलिसांवर विश्वास नाही, त्यांच्या हेतुबद्दल शंका वाटते, असेही संजय राऊत यांनी सांगितले. सुशांतसिंह राजपूत प्रकरणी सुरू असलेला तपासाबाबत अनेक प्रश्नांना राऊत यांनी उत्तरे दिली.