Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पंतप्रधान मोदी लंडनमध्ये जाऊन डॉक्टरांचा अपमान करतात, तेव्हा विरोध करणाऱ्या संघटना कुठे होत्या
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्रराजकारण

पंतप्रधान मोदी लंडनमध्ये जाऊन डॉक्टरांचा अपमान करतात, तेव्हा विरोध करणाऱ्या संघटना कुठे होत्या

Surajya Digital
Last updated: 2020/08/17 at 5:40 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांच्या डॉक्टरांवरील वक्तव्यामुळे गोंधळ निर्माण झाले असता त्यांनी आपल्याकडून डॉक्टरांचा अपमान झाला नसल्याचं म्हटलं आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लंडनमध्ये जाऊन डॉक्टरांचा अपमान केला तेव्हा विरोध करणाऱ्या संघटना कुठे होत्या अशी विचारणा त्यांनी केली आहे. सामना कार्यालयात संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मी कधीही डॉक्टरकडून औषध घेत नाही, कंपाऊंडरकडून घेतो त्याला जास्त कळतं असं विधान केल्याने वाद निर्माण झाला आहे. संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर मार्ड संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवून माफी मागावी, अन्यथा रस्त्यावर उतरण्याची भाषा केली आहे. यावर संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

“मला कोणीतरी क्लिप पाठवली. नरेंद्र मोदींनी लंडनला जाऊन डॉक्टरांचा अपमान केला होता. आमच्याकडील डॉक्टर कसे व्यापारी आहेत आणि त्यांन रुग्णसेवेत रस नसून औषधं विकण्यात आणि पैसै कमावण्यात कसा रस आहे. यासंबंधी हे विधान आहे. लंडन येथील डॉक्टरांनी त्यांचा निषेध केला होता, येथे नाही. त्यावेळी येथील संघटनांनी आक्षेप घेतला नाही, असे का , अशी विचारणा संजय राऊत यांनी केली आहे.

“कंपाऊंडर काही टाकाऊ नसतात. उलट माझं कौतुक केलं पाहिजे. डॉक्टरांनी आपला कंपाऊंडरही ताकदीचा निर्माण केला आहे हे कौतुकास्पद आहे. हे जगात कुठे नाही तर भारतातच आहे. कंपाऊंडरचा सन्मान केला म्हणून इतकं टोकाची भूमिका घेण्याची गरज नाही,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.

* माफी मागण्याआधी काय बोलले समजून घ्या

कोणाचा गैरसमज झाला असेल तर तो दूर करावा. मी त्यांच्याशी बोलायला तयार आहे. माफी मागण्याआधी मी काय बोललो ते समजून घ्या. मी अपमानच केलेला नाही. माझी भूमिका जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रश्नावर होती. बोलण्याच्या ओघात एक शब्द येतो आणि त्यावर अशा पद्धतीने राजकारण होत आहे. हे होऊ नये असं मला वाटतं,” असं संजय राऊत यांनी म्हटलं.

You Might Also Like

राहुल गांधींच्या विरोधात धमकी देणाऱ्या शिवसेनेच्या दराडेंविरोधात गुन्हा दाखल

महाराष्ट्र बनले परकीय गुंतवणूकदारांची पहिली पसंती

भारताला बौद्धिक छात्रधर्म जागविणाऱ्या शिवरायांची गरज – स्वामी गोविंददेव गिरी

घरात पाणी गेलेल्या नागरीकांना दहा हजार रुपयांची मदत – उपमुख्यमंत्री पवार

शेतकरी देताहेत शेणखताला पहिली पसंती

TAGGED: #संजयराऊत #डॉक्टरबदनामी #संघटना #कोठे #समजून
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article शुक्रवारपासून जिल्ह्यात अनेक भागात रोज भीजपाऊस; खरीप पिकांना दिलासा, मात्र शेतीकामात अडथळा
Next Article मगरीचा वावर असलेल्या देगाव नाल्यामध्ये जाऊ नका; उपवनसंरक्षक यांचे आवाहन

Latest News

राहुल गांधींच्या विरोधात धमकी देणाऱ्या शिवसेनेच्या दराडेंविरोधात गुन्हा दाखल
महाराष्ट्र May 29, 2025
तमिळ चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते राजेश यांचं निधन
देश - विदेश May 29, 2025
महाराष्ट्र बनले परकीय गुंतवणूकदारांची पहिली पसंती
महाराष्ट्र May 29, 2025
सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीत वाढ
Top News May 29, 2025
सोलापूर शहर-जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांत सरकार विरोधात खदखद
सोलापूर May 29, 2025
सोलापूर-मुंबई विमानसेवा महिन्यात सुरू करण्याचा प्रयत्न
सोलापूर May 29, 2025
भारताला बौद्धिक छात्रधर्म जागविणाऱ्या शिवरायांची गरज – स्वामी गोविंददेव गिरी
महाराष्ट्र May 29, 2025
घरात पाणी गेलेल्या नागरीकांना दहा हजार रुपयांची मदत – उपमुख्यमंत्री पवार
महाराष्ट्र May 29, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?