मुंबई : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी संजय राठोड मंत्रिपद, आमदारकीचा राजीनामा देणार आहे, अशी माहिती पोहरादेवी येथील महंत जितेंद्र महाराजांनी वृत्तवाहिन्यांना दिली. राज्याचे वन मंत्री संजय राठोड हे आज वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे येणार आहेत. ते आपल्या मंत्रिपदासोबतच आमदारकीचाही राजीनामा देणार आहे. तसेच, यासंदर्भात पोहरादेवी येथे बैठक होणार असल्याचेही जितेंद्र महाराजांनी म्हटले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* संजय राठोड आजच देणार राजीनामा?
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन राज्यातलं वातावरण तापलंय. मंत्री संजय राठोडांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी होत आहे. यावर आज संजय राऊतांनी ट्विट केलं आहे. ते म्हणाले “महाराजांच्या हातातील राजदंड काय सांगतो? महाराष्ट्र धर्म म्हणजेच राजधर्माचे पालन”, असं लिहिलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो राऊतांनी ट्विट केला आहे. थोडक्यात मुख्यमंत्र्यांच्या वतीने राऊतांनी राठोडांना इशारा दिल्याचं बोललं जातंय.