नवी दिल्ली : देशावर कोरोनाचं संकट अद्याप आहे. देशभरात कोरोना रूग्णांची संख्याही झपाट्याने वाढताना दिसतेय. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरूवात झाली. अधिवेशनाला उपस्थित राहण्यापूर्वी सर्वच खासदार आणि मंत्र्यांची कोरोना चाचणी करण्यात आली.
दरम्यान,करोना काळात संसदेचे ऐतिहासिक अधिवेशन आजपासून सुरु झाले आहे. राज्यसभा सकाळी 9 ते 1 आणि लोकसभा दुपारी 3 ते 7 अशा दोन सत्रांमध्ये हे कामकाज होत आहे. करोना पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच एका सभागृहाच्या कामकाजासाठी दोन सभागृहे वापरली जाणार आहेत. 14 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर असा संसदेच्या अधिवेशनाचा कार्यक्रम ठरवण्यात आला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* असे आहेत कोरोनाग्रस्त खासदार
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दोन्ही सभागृहातील 25 खासदार कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. यामध्ये 17 खासदार लोकसभेचे आणि 8 राज्यसभेचे आहेत. कोरोनाची लागण झालेल्या लोकसभेच्या 17 खासदारामध्ये भाजपच्या 12 तर शिवसेनेच्या एका खासदारास आणि वायएसआर काँग्रेसच्या 2, डीएमके आणि आरएलपी पक्षाच्या प्रत्येकी एक खासदारास कोरोनाची बाधा झाली आहे. तसेच दोन केंद्रीय मंत्र्यांचाही अहवालही पाॅझिटिव्ह आला आहे.
* संसदेच्या कँटीनमध्ये काढा देण्याचा निर्णय
पिण्यायोग्य कोमट पाणी, तुळशीची पानं, लवंग, मिरं, मोठी वेलची, आलं, गुळ, ओवा, दालचिनी यांचे मिश्रण करुन केलेला काढा रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे हा काढा संसदेच्या कँटीनमध्ये देण्याचा निर्णय झाला आहे. तसेच संसदेच्या कँटीनमध्ये हळदीचे पाणी, हळद मिश्रीत दूध, पिण्यासाठी कोमट पाणीही दिले जात आहे.
* काही कोरोनाग्रस्त खासदारांची नावे
सुखबीर सिंह (बीजेपी), हनुमान बेनीवाल (आरएलपी), मीनाक्षी लेखी (बीजेपी), सुकांता मजूमदार (बीजेपी), अनंत हेगड़े (बीजेपी), जी माधवी (वाईआरएससी), प्रताप राव जाधव (शिवसेना), जनार्दन सिंह सिग्रीवाल (बीजेपी), विद्युत बरन महतो (बीजेपी), प्रघान बरुआ (बीजेपी), एन रेडेप्पा (वाईआरएससी), सेल्वम जी (डीएमके), प्रताप राव पाटिल (बीजेपी), रामशंकर कठेरिया (बीजेपी), प्रवेश साहिब सिंह (बीजेपी), सत्यपाल सिंह (बीजेपी) आणि रोडमल नागर (बीजेपी).