Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: तब्बल ‘एवढ्या’ कोटींचे संत नामदेव महाराज स्मारक, पण कोठे अन् कधी उभारले जाणार ?
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

तब्बल ‘एवढ्या’ कोटींचे संत नामदेव महाराज स्मारक, पण कोठे अन् कधी उभारले जाणार ?

admin
Last updated: 2025/03/25 at 11:46 AM
admin
Share
2 Min Read
संत नामदेव महाराज
SHARE

सोलापूर/प्रतिनिधी पंढरपूर येथील ६५ एकराच्या समोर असलेली रेल्वेची १६ एकर जागा जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात आली आहे. या जागेत २५ कोटींच्या निधीतून संत शिरोमणी नामदेव महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी दिली.
संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या स्मारक उभारणीसंदर्भात संबधित विश्वस्त संस्थांच्या पदाधिकार्यांसमेत जिल्हाधिकारी यांनी बैठक घेतली. यावेळी त्यांच्याकडून या स्मारकासाठी आवश्यक सूचनाही जाणून घेण्यात आल्या. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याबाबत अंतिम आराखडा तयार करुन या विभागाकडूनच स्मारकाचे काम पुर्ण करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले.

पंढरपूरातील ६५ एकर क्षेत्राच्या समोर असलेल्या रेल्वे विभागाच्या जागेपैकी १६ एकर जागा रेल्वे प्रशासनाकडून महसूल प्रशासनाकडे हस्तातरीत करण्यात आली आहे. त्यामुळे ही जागा शासकीय मालकीची असणार आहे. या जागेतच संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या स्मारकासाठी आवश्यक जमिन उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले. लवकरच संत नामदेव महाराज यांचे स्मारक पंढरीत साकारणार या बैठकीस अखिल भारतीय क्षत्रिय नामदेव एकसंघचे संस्थापक अध्यक्ष महेश ढवळे, संत नामदेव शिंपी समाज पंढरपूरचे अध्यक्ष गणेश उंडाळे, नामदेव समाज उन्नती परिषदेचे अध्यक्ष संजय नेवासकर, सोलापूर शिंपी समाजाचे अध्यक्ष महेश रेळेकर, पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख प्रथमेश परांडकर, नामदेव शिंपी समाज बहुउद्देशीय संस्थेचे युवराज चुंबळकर, राजेश केकडे, गुरुनाथ पतंगे, दास पतंगे, अनिल बोंडगे, धनंजय गोंदकर, नंदकुमार कोसबतवार यांच्यासह अन्य जिल्ह्यातून आलेले समाज बांधव उपस्थितीत होते.

चंद्रभागा नदीचे प्रदूषणाची होणार ड्रोनने तपासणी नमामी चंद्रभागा योजनेच्या धर्तीवर भिमा नदीत होणारे प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी तीन कोटी रुपयांच्या निधीतून आवश्यक उपाय योजना करण्यात येत आहे. ज्या ठिकाणी प्रदूषण होते, अशा ठिकाणांचा शोध ड्रोनच्या माध्यमातून करुन याबाबत आवश्यक उपाय योजनांचे सादरीकरण एका संस्थेकडून होणार : जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद

You Might Also Like

राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्दे राजकीय पक्ष व हितसंबंधांच्या पलीकडील – उपराष्ट्रपती

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणात 50 टक्के पाणीसाठा

सोलापूर-दिल्ली विमानसेवा नोव्हेंबरपासून सुरू होणार

मोहोळ तालुक्‍यातील लांबोटी येथे पोलिसांच्या चकमकीत सराईत गुन्हेगार ठार

सोलापूर – गाडीतून पडून भाजीपाला विक्रेत्याचा दुदैवी मृत्यू

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सोन्याची अंडी देणार्‍या ‘या’ संस्थेत नवरदेवांची भाऊगर्दी, कोण कोण चढणार निवडणुकीच्या बोहल्यावर?
Next Article खतरनाकच! राञीचा थरार दोस्ताला सत्तुरने भोसकलं, पण कुठे ?

Latest News

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा
देश - विदेश June 19, 2025
इराणमधून ११० विद्यार्थ्यांची पहिली तुकडी भारतात परतली
देश - विदेश June 19, 2025
भारतीय संघाच्या मिशन इंग्लंडला उद्यापासून सुरुवात
महाराष्ट्र June 19, 2025
राज्यातील शाळांमध्ये होणार मोबाईल बंदी ? शिक्षक सुधीर केनेंचे संशोधन
महाराष्ट्र June 19, 2025
इराण- इस्रायल युद्ध पेटले, अमेरिकेचे ४० हजार सैन्य अलर्टवर
देश - विदेश June 19, 2025
‘विठ्ठल नामात होऊनिया दंग’ चा वारीमध्ये सहभागी होऊन प्रचार करणार – स्वरूप भाळवणकर
महाराष्ट्र June 19, 2025
इलॉन मस्क यांच्या स्टारशिप प्रोजेक्टच्या चाचणीदरम्यान स्पेसएक्सच्या संशोधन केंद्रात स्फोट
देश - विदेश June 19, 2025
कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस सुधारित एलएचबी डब्यांसह प्रवाशांच्या सेवेत रुजू
महाराष्ट्र June 19, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?