Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: 30 वर्षांनंतर पहिल्यांदाच सरस्वती देवी बोलणार; 50 किलोमीटरच्या परिसरात या अगरबत्तीचा सुवास दरवळला,
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

30 वर्षांनंतर पहिल्यांदाच सरस्वती देवी बोलणार; 50 किलोमीटरच्या परिसरात या अगरबत्तीचा सुवास दरवळला,

Surajya Digital
Last updated: 2024/01/22 at 2:14 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

वृत्तसंस्था : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होताच भारतीय हवाई दलाने हेलिकॉप्टरने अयोध्येतील श्रीराम मंदिरावर फुलांचा वर्षाव केला आहे.  Saraswati Devi will speak for the first time after 30 years; Mouni Devi spread the fragrance of this incense in the area of ​​50 km यावेळी उपस्थितांच्या ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. या सोहळ्याला देशभरातील दिग्गजांनी हजेरी लावली आहे. यावेळी मंदिराच्या गर्भगृहात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतही उपस्थित होते.

अयोध्येत प्रभू श्री रामाच्या स्वागतासाठी तब्बल 108 फूट लांब अगरबत्ती आणण्यात आली होती. ही अगरबत्ती ‘जय श्री राम’ असा जयघोष करत पेटवण्यात आली आहे. या अगरबत्तीचा सुगंध 50 किलोमीटरच्या परिसरात जाईल असा दावा करण्यात आला आहे. ही अगरबत्ती गुजरातच्या वडोदरा येथून आणण्यात आली आहे. 3610 किलो वजनाची आणि सुमारे साडेतीन फूट रूंद ही अगरबत्ती आहे. यावेळेस श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महंत नृत्य गोपाल दास यांनी 108 फूट लांब अगरबत्ती प्रज्वलित केली. ज्यावेळेस महंतांनी अगरबत्ती प्रज्वलित केली, त्यावेळेस रामभक्तांनी जय श्री राम नामाचा जयघोष केला. यावेळेस महंत दास म्हणाले की, “अगरबत्तीचा सुगंध 50 किलोमीटर अंतरापर्यंत दरवळेल आणि पुढील 45 दिवस अगरबत्ती प्रज्वलित राहील”.

अयोध्येतील ऐतिहासिक राम मंदिराचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण झाले. येथील राम मंदिरात प्रभू श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशभरातून तब्बल 2 हजार 500 हून अधिक दिग्गजांना आमंत्रित करण्यात आले आहे तसेच बॉलिवूडमधील दिग्गजही या ठिकाणी पोहोचले आहेत. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त देशभरासह परदेशातही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिराचे लोकार्पण होताच यावर आता राज ठाकरेंनी श्रीराम मूर्तीचा व्हिडिओ शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे. ‘आज कारसेवकांचे आत्मे सुखावले आणि 32 वर्षांनी शरयू नदी हसली ! जय श्रीराम ‘ असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. अयोध्येत देशभरातील दिग्गजांच्या उपस्थितीत प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. यावेळी ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट,  आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

 

22 जानेवारी राम मंदिराचे लोकार्पण करण्यासाठी सगळ्यात शुभ मुहूर्त असल्याचे ज्योतिषांचे म्हणणे आहे. या काळात नऊ पैकी सहा ग्रह आपल्या घरात अनुकूल ग्रह आहेत. 22 जानेवारीला 12 वाजून 29 मिनिट आणि 8 सेकंदांनी संजीवनी मुहूर्त सुरू होतो आणि 12 वाजून 30 मिनिट आणि 32 सेकंदापर्यंत मुहूर्त असणार आहे. असा हा 84 सेकंदाचा सुक्ष्म मुहूर्त आहे. याच मुहूर्तावर राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे.

अयोध्येत राम मंदिर निर्माण होईपर्यंत मौनव्रत पाळणाऱ्या सरस्वती देवी 30 वर्षांनंतर आज पहिल्यांदा बोलणार आहेत. आज राम मंदिराचे उद्घाटन होणार असल्याने त्या अयोध्येत पोहोचल्या आहेत. प्रभू श्रीराम यांना आपले जीवन समर्पित करणाऱ्या 80 वर्षीय सरस्वती देवी आतापासून अयोध्येत राहणार आहेत. रामजन्मभूमी ट्रस्टचे प्रमुख महंत नृत्य गोपाळ यांच्या प्रेरणेने त्यांनी मौनव्रत 1992 पासून सुरु केले होते. मंदिराचे उद्घाटन होईल त्या दिवशी मौनव्रत सोडू ही त्यांची शपथ घेतली होती. आता 22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे उद्घाटन होत आहे. त्याच दिवशी त्यांचे हे मौनव्रत संपले आहे. यासाठी तझारखंड येथून अयोध्येला आल्या आहेत.

सरस्वती देवी यांनी त्या घटनेनंतर अनेकदा अयोध्येला भेट दिली. अयोध्येत त्यांना ‘मौनी माता’ म्हणून ओळखले जाते. कुटुंबातील सदस्यांशी त्या सांकेतिक भाषेतून संवाद साधतात. लेखनाद्वारे लोकांशी बोलतात. पण, त्यात काही गुंतागुंतीची वाक्ये असतात. 2020 पर्यंत त्या दररोज दुपारी फक्त एक तास बोलत असत. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिराची पायाभरणी केली त्यादिवसापासून त्यांनी दिवसभर मौन पाळले आहे.

● ‘हे’ बॉलिवूड स्टार पोहोचले अयोध्येत

रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी बॉलिवूड जगताला आमंत्रित करण्यात आले होते. अनेक अभिनेते सकाळीच मुंबई विमानतळावरून अयोध्येकडे रवाना होताना दिसले. अभिनेत्री माधुरी दीक्षित, अमिताभ बच्चन, विकी कौशल, कतरिना कैफ, आयुष्मान खुराना, रणबीर कपूर, आलिया भट्ट, दिग्दर्शक राजकुमार हिरानी, महावीर जैन, रोहित शेट्टी हे प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येत दाखल झाले आहेत. त्यांचा फोटोही समोर आला आहे.

You Might Also Like

भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण प्रणालीची पहिली यशस्वी चाचणी

फिजीचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर; लष्करप्रमुख अल्जेरियाला रवाना

शशी थरूर यांनी श्रीलंकेच्या माजी राष्ट्रपतींच्या अटकेवर चिंता व्यक्त केली

 युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की पुतिनसोबत चर्चासाठी तयार; शांतता प्रयत्नांवर भर

“राष्ट्रीय हितांवर कोणतीही तडजोड नाही” – जयशंकर यांचा अमेरिकेशी चर्चेसंदर्भात स्पष्टीकरण

TAGGED: #30वर्षांनंतर #अयोध्या #सरस्वतीदेवी #मौनीदेवी #50किलोमीटर #परिसर #अगरबत्ती #सुवास #दरवळला, #SaraswatiDevi #speak #firsttime #30years; Mouni Devi spread #fragrance #incense #area #​​50km
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मनोज जरांगे मुंबईकडे रवाना, अन्यायाचा कळस झाला
Next Article Maratha reservation | मनोज जरांगेंना नोटीस पाठवा, कोर्टाचे पोलिसांना निर्देश, मुख्यमंत्र्यांची कळकळीची विनंती

Latest News

भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण प्रणालीची पहिली यशस्वी चाचणी
देश - विदेश August 24, 2025
फिजीचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर; लष्करप्रमुख अल्जेरियाला रवाना
देश - विदेश August 24, 2025
माझ्या पांडुरंगाला मी मटण खाल्लेले चालते” – सुप्रिया सुळे यांचा वादग्रस्त वक्तव्य
महाराष्ट्र August 24, 2025
गणेशोत्सवासाठी कोकणकडे धावपळ; रेल्वे आणि महामार्गावर प्रचंड गर्दी
महाराष्ट्र August 24, 2025
पूरपश्चात व्यवस्थापनासाठी पालकमंत्री पाटील यांनी दिले निर्देश
महाराष्ट्र August 24, 2025
नांदेडमध्ये पूरग्रस्तांसाठी खासदार गोपछडे यांनी २० लाख रुपयांची मदत जाहीर
महाराष्ट्र August 24, 2025
पालकमंत्री पाटील यांनी पूरबाधितांसाठी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले
महाराष्ट्र August 24, 2025
मुंबई-गोवा महामार्गावर लक्झरी बसला आग; सर्व ४५ प्रवासी सुरक्षित बचावले
महाराष्ट्र August 24, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?