Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सरपंच परिषदेच्या विरोधामुळे सरपंच अपात्रतेची कारवाई बारगळली
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

सरपंच परिषदेच्या विरोधामुळे सरपंच अपात्रतेची कारवाई बारगळली

Surajya Digital
Last updated: 2021/12/16 at 8:20 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

बार्शी : सरपंच परिषदेने तीव्र विरोध केल्यामुळे लसीकरणात हयगय केल्याचा ठपका ठेवून जिल्ह्यातील 55 सरपंचांवर प्रस्तावित करण्यात येणारी अपात्रतेची कारवाई अखेर बारगळली आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी परिषदेच्या पदाधिकार्‍यांसोबत येथे झालेल्या चर्चेत कारवाई मागे घेण्याची घोषणा केली. त्यामुळे अजून प्रत्यक्षात न बजाविलेल्या या नोटीसामुळे जिल्ह्यात उठलेले वादळ शमले आहे.

कोरोनाला अटकाव करण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना म्हणून नागरिकांचे लसीकरण करण्यावर शासनाचा मोठा भर आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात अजूनही काही गावात लसीकरणाची टक्केवारी वाढलेली नाही. त्यामुळे सिईओ स्वामी यांंनी लसीकरणाची सर्वात कमी टक्केवारी असलेल्या जिल्ह्यातील 55 गावातील सरपंचावर राष्ट्रीय कार्यक्रमात हलगर्जीपणा केल्याबद्दल अपात्रतेची कारवाई करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार प्रशासन पातळीवर नोटीसा देण्याची तयारी सुरु झाली होती.

मात्र लसीकरणाची टक्केवारी न वाढण्यास सरपंच एकमेव जबाबदार नाहीत. कोरोनाकाळात सरपंचांनी जीवाची पर्वा न करता ग्रामस्थांची काळजी घेतलेली आहे. त्यामुळे एकट्या सरपंचांना त्यासाठी जबाबदार धरु नये व प्रस्तावित कारवाई करु नये, अशी भूमिका घेवून सरपंच परिषदेने प्रदेश सरचिटणीस ऍड. विकास जाधव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाभरात अंदोलनाची घोषणा केली. तसेच बार्शी येथे ग्रामसेवकांच्या आढावा बैठकीसाठी येणार्‍या स्वामी यांना काळे झेंडे दाखविण्याचा कार्यक्रम आखला. याची कुणकुण प्रशासनास लागताच एकच खळबळ उडाली.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

या अंदोलनाचे सावट बैठकीवर उमटले. त्यामुळे तत्पूर्वीच गटविकास अधिकारी शेखर सावंत यांच्या मध्यस्थीने परिषदेच्या पदाधिकार्‍यांना चर्चेस पाचारण करण्यात आले. तिथे ऍड. जाधव यांनी जिल्ह्यात 100% लसीकरण होणे गरजेचेच आहे. आणि त्यासाठी सरपंच परिषद पुढाकार घेत असल्याचे सांगितले. सिईओ स्वामी यांनी त्याचे स्वागत करत कारवाईचा हेतू नसल्याचे सांगितले. त्यामुळे तणावात आलेल्या सरपंचांना अखेर दिलासा मिळाला आणि पेल्यातील वादळ पेल्यातच शमले.

* व्यापारी गाळ्याचे भाडे वाढविण्यावरुन भाडेकरुला विश्वस्ताकडून मारहाण

बार्शी : व्यापारी गाळ्याचे भाडे वाढविण्यावरुन भाडेकरुला वीटाने मारहाण केल्याबाबत येथील जामा मशिदचे विश्वस्त सलीम मुनशी यांच्याविरोधात बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत जखमी राजु इसाक पिंजारी (रा. उत्तरेश्वर नाका, बारंगुळे प्लॉट, बार्शी ) यांनी फिर्याद दिली आहे.

राजू पिंजारी यांचे मंगळवार पेठेत राज गादी सेंटर नावाचे दुकान आहे.  त्यांनी गेल्या सात वर्षांपासून  मंगळवार पेठ येथिल जामा मशीदमध्ये एक गाळा भाड्याने घेतलेला आहे. त्या ठिकाणी ते गादी तयार करण्याचे काम करतात.  गाळ्याचे भाडे ते दरमहा मशिदीच्या विश्वस्ताकडे जमा करतात. ते आपल्या गाळ्यात दुपारी 4 च्या सुमारास काम करत असताना त्यांच्या गाळ्याची वीज जोडणी तोडल्याचे समजले.
त्यामुळे ते मशिदीत विश्वस्त सलीम मुनशी यांना विचारणा करण्यासाठी गेले. त्यांनी गाळ्याचे भाडे वाढवुन द्या असे सांगितले, त्यावर त्यांनी प्रथम वीज जोडून द्या, हळुहळु भाडे वाढवुन देईन असे म्हणताच सलीम मुनशी यांनी गच्चीला धरुन ढकलून दिले. नंतर जवळच पडलेल्या वीटा उचलून डोक्यात, पायावर मारल्या. त्यामुळे ते जखमी झाले.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Opposition #sarpanchcouncil #led #disqualification #sarpanch, #सरपंच #परिषद #विरोधामुळे #सरपंच #अपात्र #कारवाई #बारगळली
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article १० वी – १२ वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, ऐका काय म्हणाल्या शिक्षणमंत्री
Next Article मनसेच्या रुपाली पाटील – ठोंबरेंचा राष्ट्रवादीत प्रवेश

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?